Viral : मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान || Marathi news 


          सोसिअल मीडिया (Social Media) वर नेहमीच चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो त्यात जातीभेद , द्वेष , टीका , सरकार विरोधी पोस्ट पाहायला मिळतात . तसे असले तरी काही अश्या गोष्टी हि समोर येताना दिसतात ज्याचं अनुकरण करणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे ठरते. करोनाच्या (Corona) या संकटकाळात देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात परस्परभेदाच्या बातम्या येत असतानाही दोन्ही धर्मियांमधील बंधुत्वाचे नाते सांगणाऱ्या घटनाही देशात घडत आहेत. तसेच देशातील विविध भागांमध्ये हिंदू-मुस्लिमांनी परस्परांना एक जात होऊन मदत केल्याची अनेक किस्से आपण अनुभवले असतील.
Viral : मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान || Marathi news
Viral : मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान || Marathi news 

          अशातच आता हिंदू मुलीचं मुस्लिम मामानं कन्यादान केल्याचा फोटो फेसबुक (Facebook) सारख्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होताना दिसत आहे. माणुसकी आजून जिवंत आहे, माणुसकी जपणारा धर्म , लॉकडाउनमध्ये हिंदू मुस्लिम एकता यासारख्या कमेंट करत अनेकजणांनी हा फोटो मोठ्या प्रमाणात सामायिक केला आहे. आपल्या व्हॉट्सअँप स्टेट्सलाही (WhatsApp) ऐक्याचं दर्शन करणारा हा फोटो नेटकऱ्यांनी ठेवला आहे.


          या फोटो मध्ये आपल्याला पाहायला मिळते , एक मुस्लिम मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींचं कन्यदान कतो. लग्नानंतर सासरी जाताना त्या मुली मामाच्या गळ्यात पडून रडत आहेत. हे पाहून आनेकजन भावनावश झाले आहेत. या भावनिक फोटोला पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. आपल्या भारताचं हे खरं चित्र आहे…असे ब्लॉगर (Blogger) आणि लेखक समीर गायकवाड (Smeer Gaikwad) यांनी या लग्नातील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटल.


➤ सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर


          जाणकारांकडून असे समजत आहे कि ,अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील हा प्रसंग आहे. गावातील सविता भुसारी या शेतकरी (Farmer) कुटुंबातील असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गावखेड्यात मेहनत ,कष्ट करत सविता भुसारी यांनी दोन्ही मुलींना मोठे केले. सविता यांना भाऊ नसल्यामुळे घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना त्यांनी भाऊ मानले होते. बाबा पठाण यांनी देखील जात-पात न बाळगता माणुसकीचा धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली.हे एक माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.


➤ पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ?


          "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या साने गुरुजींच्या उक्तीचा अर्थ सर्वांना कळेल तो सुदिन असेल..बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.नवऱ्या मुलींची आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.. भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली..मानवता, प्रेम आणि विश्वास जिथे एकदिलाने नांदतात तिथे व्यवहारातल्या भौतिक बाबी गौण ठरत जातात." असे समीर गायकवाड यांनी आपल्या सोसिअल मीडिया वर सामायिक केलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे.
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने