सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर || Marathi news 

         सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोजच काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे ! सोबतच समोर येणारी ही माहिती या प्रकरणाला वेगळचं वळण देत आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला आहे! त्यामुळे 15 सदस्यांची सीबीआय ची एक टीम या प्रकरणातील संपूर्ण माहिती आणि तपास करण्यासाठी काल मुंबईत दाखल झाली.
सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर || Marathi news
सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर || Marathi news

         दरम्यान सुशांत चे घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट सोबत केलेला व्हाट्सअप्प चॅट समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक नवेच वळण लागण्याची शक्यता आहे!8 जून रोजी रिया चक्रवर्तीने महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅप मेसेज केलेला होता.  या चॅटिंगमध्ये रिया चक्रवर्तीने स्पष्टपणे मूव्ह ऑन झाल्याचं लिहिलं आहे. तिने पुढे लिहिलं आहे की, जड अंतकरणाने मी पुढे जात आहे.....

          रियाने या चॅट मधील पहिला मेसेज 'आयशा मूव्ह ऑन' असा केला आहे. 'जिलेबी' या चित्रपटातील एक पात्र असलेल्या रिया चक्रवर्तीच्या भूमिकेचं नाव 'आयशा' आहे. आज तक या  न्यूज चॅनेल ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रियाच्या या मेसेजवर महेश भट्ट यांनी आता तुझे वडील या निर्णयाने खूश होतील, अशी प्रतिक्रिया दिली होती.
सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर || Marathi news
सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर || Marathi news

          महेश भट्ट यांनी तिला केलेल्या मेसेजस मध्ये पुढे असं ही लिहिलं आहे की, आता मागे वळून पाहू नकोस..या दरम्यान सुशांत सिंग प्रकरणातील तपासाने सीबीआय मुळे वेग घेतला आहे. सीबीआयचे अधिकारी काल (दि. 20 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने  एका एसआयटीचं गठन केलं आहे.

         या एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि ऍडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा सर्व तपास करतील. या टीम मध्ये एकूण 15 सदस्य आहेत! लवकरच या प्रकरणाचा सर्व उलगडा होईल अशी सुशांत सिंग च्या प्रत्येक चाहत्याची आशा आहे !

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने