‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ : नितेश राणे || Marathi news


          अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला तसेच सर्व पुरावे सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिला आहे. मुंबई पोलिसांकडे पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सुपूर्द करा, अशी मागणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने आदेश दिले .
‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ : नितेश राणे || Marathi news
‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ : नितेश राणे || Marathi news

          सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास (SSR Case) सीबीआयने करावा असा निकाल कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालानंतर ट्विट (Twitter-Tweet) करत भाजपा (Bhartiy Janata Party)आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane)अब तो बेबी पेंग्विन गयो’ असं म्हटलं आहे.


          “ सुशांतच्या मृत्यू प्रकरणी जी काही लपवालपवी होत होती, पुरावे नष्ट करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जात होते, त्या सगळ्यांना आता चाप बसेल. आता खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही थेट घेतलं नाही. तरीसुद्धा त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं. त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं याबद्दल चौकशी झाली पाहिजे. ” नितेश राणे याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

नितेश राणे यांचे ट्विट :



          नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे निलेश राणे यांनी हि महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत " सुप्रीम कोर्टाने SSR केस CBI कडे दिल्यापासून महाराष्ट्र सरकारची धावपळ जोरात सुरू झाली. आज दिवसभरामध्ये बांद्रा डीसीपी (DCP) आणि मुंबई कमिशनर मुख्यमंत्र्यांना का भेटले हे विचार करण्यासारखे आहे. एका केस साठी मुख्यमंत्री कार्यालयाची इतकी धावपळ का आणि कोणासाठी ? हे वेगळे सांगायची गरज नाही." असे ते ट्विटर च्या माध्यमातून म्हणाले.


          राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मागितला पाहिजे. आंधळा आणि भैरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसात कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे. असेही निलेश राणे म्हणाले.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने