' नया है वह ' : छगन भुजबळ || Marathi news


मुंबई -      पार्थ पवार यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी  केली होती. त्यानंतर पार्थच्या या मागणीवर शरद पवार यांनी बोल सुनावले. ते म्हणाले मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही  त्यानंतर, भाजपा नेत्यांनी यावरुन राजकारणात खळबळ व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणेंनी पार्थ लंबी रेस का घोडा असल्याचं वक्तव्य केले .तसेच , पार्थ यांच्या मागणीवर अजित पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसत आहे. आता, मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते यांनी मी त्यावर काय बोलणार म्हणत हिंदीतही मत मांडलं.


          शरद पवार मुंबईत, पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून अपरिपकव् आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं सांगत पवारांनी पार्थचं नाव न बोलणे केले. त्यावर मला पवार साहेबांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचं नाही असे पार्थ पवार म्हणाले. त्यानंतर, राजकीय रणांगणात हा विषय चांगलाच गाजत आहे.

' नया है वह ' : छगन भुजबळ || Marathi news
' नया है वह ' : छगन भुजबळ || Marathi news

          छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी टीका पार्थबाबत केली. 'शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह,' असं भुजबळ म्हणाले. 'आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावलं गेलेलं नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं, समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात. ' 


          भाजपा नेत्यांकडून आणि विरोधकांकडून पार्थ पवार यांचं कौतुक करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थ पवार लंबी रेस का घोडा असल्याचे म्हटले आहे. काही सोशल मीडियावर भाजपा समर्थकांनी जय श्रीराम म्हणत पार्थ यांना समर्थन दर्शवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही फेसबुक पोस्ट लिहून पार्थ यांचं कौतुक केलं. 'आपण उस्मानाबादचे आहोत, कसं लढायचं हे आपल्याला माहित आहे. तुम्ही जन्मापासूनच योद्धे आहात, हे मी लहानपणीपासूनच पाहत आलोय,'' असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचं समर्थन दिले.


          बुधवारी रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडलीअसून या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले  "काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही" याचबरोबर, ही बैठक कालच ठरली होती. यात पार्थ पवार संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. इतर महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली. पार्थ पवार यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण याबाबत पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत.


          राजकीय वर्तुळात झालेल्या अशा घडामोडीमुळे मात्र सोसिअल मीडिया वर नेते मंडळींना खालच्या पातळीवर ट्रोल केले जात आहे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने