स्टनगनचा वापर करून झाला सुशांत चा खून ?  डॉक्टरच्या दाव्याने खळबळ || Marathi news


मुंबई, 13 ऑगस्ट :      लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी दिनांक 14 जून 2020 रोजी त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये देखील सुशांत सिंगच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच आहे असे सांगण्यात आले होते. त्या आधी आणि नंतर देखील मात्र अनेक नवनवीन दावे सुशांतच्या मृत्यूबाबत करण्यात येत आहेत. यात भर म्हणून सुशांतला स्टनगनने (Stungun) मारण्यात आले असा दावा देखील केला जात आहे.


          या दाव्याला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी देखील पाठिंबा दिल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेतील इंटर्नल मेडिसीन डॉक्टर राजू बाधवा यांनी यासंदर्भात हा दावा केला आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी सोशल मीडिया माध्यमातून असा दावा केला आहे !
स्टनगनचा वापर करून झाला सुशांत चा खून ?  डॉक्टरच्या दाव्याने खळबळ || Marathi news
स्टनगनचा वापर करून झाला सुशांत चा खून ?  डॉक्टरच्या दाव्याने खळबळ || Marathi news

          या अहवालानुसार राजू बाधवा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ' सुशांतच्या प्रकरणात स्टनगनचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या गळ्यावर जळाल्याच्या खुणा होत्या. त्याची एक बाजू पॅरलाइज झाली होती. हाय वोल्टेजमुळे एक भाग पॅरलाइज होतो. चेहऱ्याचा डावा भाग पॅरलाइज झाल्यामुळे त्याचा डावा डोळा उघडा होता. शॉकमुळे हा डोळा बंद नव्हता '


          सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणातील सर्व पक्ष लेखी युक्तिवाद सादर करतील. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलीस यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची तसेच त्याच्या तमाम चाहत्यांची इच्छा आहे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने