त्रिकालदर्शी शक्ती Third Eye : त्राटक-Trataka || Psychology


          अज्ञाचक्र, किंवा Third Eye याबाबत तुम्ही ऐकलं वाचलं असेलच. मानवी मनाच्या रहस्यमयी शक्तींपैकी एक शक्ती म्हणजे 3rd Eye. असं म्हणतात की पारलौकिक अनुभव  अज्ञाचक्रच तुम्हाला देऊ शकतं. पण नुसते अनुभवच मिळतात, की आणखी ही काही मिळू शकतं?  आज्ञाचक्राची जागृतावस्था यायला लागली की, तुम्हाला अनुभवाव्यतिरिक्त एक अशी शक्ती मिळते ज्याद्वारे तुम्ही असं बरंच काही करू शकता जे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं असतं.


 चमत्कारिक वाटतंय ना ! चला जाणून घेऊया.. त्रिकालदर्शी शक्ती 3rd Eye : Trataka

त्रिकालदर्शी शक्ती Third Eye : त्राटक-Trataka || Psychology
त्रिकालदर्शी शक्ती Third Eye : त्राटक-Trataka || Psychology


◾ त्राटक :

          त्राटक एक ध्यानाचा प्रकार आहे. ज्याद्वारे आपल्या अज्ञाचक्रावर प्रभाव पडून आपल्याला बरेच फायदे मिळण्यास सुरुवात होते. काही ठळक फायद्यांबाबत माहिती घेऊ..1.समरणशक्तीत वाढ :

          त्राटक सुरू केल्यावर सर्वांत आधी तुमच्या समरणशक्तीत वाढ होणे सुरू होते. तुमची एकाच ठिकाणी ध्यान करण्याची सवय वाढू लागते आणि त्यामुळे एकाग्रता वाढून तुम्ही जे काही वाचाल किंवा समजून घ्याल ते साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वृद्धी होते.2. विचारांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता :


          त्राटक सुरू केल्यावर तुमची विचारांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढू लागते. म्हणजे तुमच्या मनात येणारे Negative विचार किंवा ज्या विचारांनी तुम्हाला त्रास होतो असे सर्व विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी त्राटकाचा वापर होतो.3. इच्छाशक्ती :


          त्राटकामुळे तुमची इच्छाशक्ती वाढण्यास मदत मिळते. एकदा तुमची इच्छाशक्ती वाढायला लागली की बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही सहजच पूर्ण करू शकता.  4. संमोहन :


          त्राटकाचा सर्वात जास्त फायदा संमोहन शिकताना होतो.संमोहनाच्या बाबतीत सर्वात जास्त Mind Control लागतं. म्हणून त्राटक करतांना या शक्तिमध्ये सुद्धा वृद्धी व्हायला लागते आणि हळूहळू त्याचे फायदे दिसायला लागतात.5. दृष्टी :


          त्राटक नियमित केल्याने डोळ्याचे विकार बरे होण्यास मदत मिळते. आजकाल Mobile आणि Computer Screen चा अतिवापर होतो त्यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. पण त्राटक केल्याने त्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
त्रिकालदर्शी शक्ती Third Eye : त्राटक-Trataka || Psychology
त्रिकालदर्शी शक्ती Third Eye : त्राटक-Trataka || Psychology

          असे एक ना अनेक फायदे त्राटक केल्याने होतात. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे करावं तरी कसं? तर त्राटक करणं अगदी सोप्पं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला अलौकिक असं काही अनुभवायला मिळणार नाही पण हळूहळू प्रगती होत जाईल आणि एक दिवस असाही येईल की तुम्हाला ते अलौकिक असे अनुभव मिळणं सुरू होईल.


आता हे करायचं कसं त्याबाबत थोडी माहिती घेऊ..


 Point Method :


त्राटक सुरू करण्यासाठी सुरुवातीला ही पद्धत खूप फायदेशीर ठरते. याची Step by Step माहिती पुढीलप्रमाणे -1. एका शांत खोलीमध्ये बसा.


2. आपल्या डोळ्यापासून 200 ते 250 cm अंतरावर एक काळा बिंदू ठेवा.


3. हा काळा बिंदू तुम्ही एखाद्या भिंतीवर किंवा एखाद्या कागदावर काढून तो त्या विशिष्ट अंतरावर ठेऊ शकता.


4. नंतर या Point ला तुम्हाला तोपर्यंत बघायचं आहे जोपर्यंत तुमच्या डोळ्यांत पाणी येणार नाही.


5. डोळ्यात पाणी आलं म्हणजे डोळे बंद करा. त्या वेळेसाठी तुमचं ध्यान संपलं.


6. थोडावेळ तसंच बसून रहा आणि मग डोळे थंड पाण्याने धुवून घ्या.


7. पुन्हा हीच प्रक्रिया सुरू करा. ही प्रक्रिया रोज तुम्हाला 3 वेळा तरी करायची आहे.


8. ह्याची Practice तुम्हाला 28 दिवस तरी करायचीच आहे.          एकदा तुम्हाला याची सवय झाली, की मग तुम्हाला याचे अनुभव मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या मेंदूमध्ये तुम्हाला याच्या संवेदना जाणवायला लागतील. तुमच्या डोळ्यांची शक्ती सुद्धा वाढणं सुरू होईल. हळूहळू तुमच्या मध्ये एक बदल घडून येण्यास सुरुवात होईल. आता तुम्हाला वाटेल की फक्त एका बिंदू कडेच बघून इतकं सगळं कसं काय शक्य आहे तर, यासाठी ही प्रक्रिया कशी काम करते हे समजून घेऊ.          उदाहरणार्थ  Gym.... Gym मध्ये एखादा व्यक्ती 50kg वजन उचलत असेल तर त्याने ते उचलण्यासाठी आधी सराव केलेला असतो आणि तेच वजन जर एखाद्या सामान्य व्यक्तीला उचलायचं असल्यास, त्याला ते जमणार नाही. कारण त्याचा सराव नसतो.          त्राटक करताना जेव्हा तुमचा सराव नसतो तेव्हा तुम्हाला काही विशेष वाटणार नाही पण एकदा तुमचा सराव सुरू झाला की मग हळूहळू तुम्हाला याचे बदल दिसण्यास सुरुवात होईल. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी धैर्य ठेऊन प्रयत्न करणं गरजेचं असतं, म्हणून एकदा तुम्ही निश्चय केलात की त्यानुसार प्रयत्न करणं सुरू करा, म्हणजे एक ना एक दिवस तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने