The Mysterious Power of the Human Mind : इच्छाशक्ती || Psychology


          नमस्कार मंडळी !! मानवी उत्पत्ती झाली तसं मानवाने निसर्गाला आव्हान देत अनेक अशा गोष्टी करून दाखवल्यात, ज्यामुळे आज मानवी अस्तित्व सर्व प्राणीमात्रांत अग्र स्थानावर आहे. हे सर्व त्याने एका शक्तीच्या जोरावर केलंय ! काय आहे ती शक्ती ? मानसशास्त्र च्या ( Psychology ) या लेखात आपण  मानवी मनाची रहस्यमयी शक्ती ( The Mysterious Power of the Human Mind - Will Power ) : इच्छाशक्ती बाबत जाणून घेणार आहोत. 
The Mysterious Power of the Human Mind : इच्छाशक्ती || Psychology
The Mysterious Power of the Human Mind : इच्छाशक्ती || Psychology


◾ 
जीवतत्वाची उत्पत्ती :


          कुठल्यातरी एका अज्ञात काळी आपल्या या ब्रम्हांडाची निर्मिती झाली. आपली ग्रहमाला तयार झाली आणि त्या ग्रहमालेत एक असा ग्रह होता जो लाखो वर्षे थंड होत चक्कर मारत होता, जे अजूनही होतच आहे आणि एक काळ असा आला की त्यावर जीवतत्वाची निर्मिती झाली तो ग्रह म्हणजे आपली पृथ्वी.
 या ग्रहाची विशेष बाब म्हणजे याची महाकर्षण शक्ती, ज्याला Gravitational Force असं म्हणतात. हा भाव पृथ्वीच्या कणाकणात सामावलेला आहे. पण या पृथ्वीवर एक विलक्षण घटना घडली, ती म्हणजे लाखो वर्षांपासून या पृथ्वीच्या तप्त धातूंमधून एक असा कण वर आला ज्यामुळे पृथ्वीवर ची पूर्ण System बदलली, त्याला जीवतत्व असं म्हणतात. यामुळे पृथ्वीवर एक अशी शृंखला सुरू झाली ज्यामुळे आज मानवी अस्तित्व निर्माण झालं आहे.



◾ जीवतत्वाचा विकास :


         जीवतत्व निर्माण झालं आणि पृथ्वीवर निसर्गाने प्रयोग करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी अणू रेणू ची निर्मिती झाली आणि त्यापासून अनेक Complex Creations व्हायला लागले. विविध प्रकारचे जीव जंतू तयार होऊ लागलेत आणि ही एक प्रकारची शृंखला तयार झाली. अनेकाविध प्रयोगातून निर्सगाने आपलं शेवटचं Creation तयार केलं आणि ते म्हणजे मनुष्य.


         मनुष्य ही नैसर्गिक प्रयोगाची सर्वांत शेवटची परिणती आहे. मनुष्य तयार होण्याआधी निसर्गाने असे अनेक प्रयोग केलेत जे आज तुम्ही आम्ही समजण्याचा प्रयत्न करत आहोत. निसर्गाची सर्वात Complex आणि Balanced Design म्हणजे मानव. या नंतर अनेक अशा गोष्टी घडायला लागल्यात ज्यांचा आज उलगडा होत आहे आणि भविष्यातही होईल... 



◾ इच्छाशक्ती चा उगम :


          मानवाची उत्पत्ती झाली आणि निर्सगाचं चक्र बदलायला लागलं. मानवाच्या आधी निर्सगाचं एक चक्र सुरू असायचं.  ते जसं आहे तसच लाखो वर्षापर्यंत सुरू होतं पण जेव्हा मानव आला, तेव्हा त्याला या गोष्टींबाबत कुतूहल वाटायला लागलं, अनेक प्रश्न पडायला लागले आणि त्यामुळे मानवाने निसर्गाच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर शोध सुरू केला. आणि जेव्हा हे सगळं व्हायला लागलं तेव्हा त्याच्या Senses मध्ये वाढ व्हायला लागली. तो विचार करायला शिकला. मानवी अस्तित्व, मन, काय असतं हे त्याला कळायला लागलं.त्यामुळे प्रकृतीच्या कार्यकारण भावाला तडा देऊन मानवाने एक नवीन रचना करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हे सर्व करण्यासाठी त्याला एका अशा शक्ती चा शोध लागला, जी इतर कोणत्याच जीवाकडे नव्हती आणि त्याचा उपयोग करून मानव आपली प्रगती करू लागला,त्याच शक्तीला इच्छाशक्ती असं म्हणतात. 


          याच इच्छाशक्ती च्या जोरावर मानव निसर्गाला स्वतःच्या आवश्यकतेनुसार वापरू लागला. मानवाच्या आधी "जसं आहे तसं" असा प्रकृतीचा भाव होता, पण मानवाने या भावाला तडा दिला आणि जसं आहे तसं न मानता "जसं व्हायला पाहिजे तसं" हा नवीन सिद्धांत सुरू केला. त्यामुळे निर्सगापुढे न झुकता निसर्ग कसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येईल हे मार्ग तो शोधू लागला. हळूहळू मानवाला त्या गोष्टी उमजू लागल्या आणि त्याने प्रकृतीवर विजय मिळवला. 


         आता तुम्हाला वाटू शकते की ही जर इतकी भारी शक्ती आहे तर आज आपल्याला याचा वापर करून  आपल्या आयुष्यात काही बदल करता येईल का? त्याबद्दल आधी थोडं जाणून घेऊ..



◾ इच्छाशक्ती आणि आधुनिक मानव :


          जेव्हा मानवाच्या अस्तित्वासाठी कठीण काळ होता तेव्हा मानवाने इच्छाशक्तीचा वापर करून आपलं अस्तित्व टिकवलं; पण आधुनिक काळात काय झालंय, की आपण आपल्या या शक्तीचा वापर करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. आज आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई वगैरे करायची गरज पडत नाही. आजचा काळ हा पुरातन काळाशी Compare केला तर लक्षात येईल की आपला काळ हा आरामदायक काळ आहे. आपल्याकडे आज अशा सर्व सुविधा आहेत ज्यांचा वापर करून आपण आपलं आयुष्य सुखदायी बनवू शकतो. आणि आपण तसं केलं सुद्धा.. पण म्हणतात ना "Good Times Create Weak People !" असंच काही आज झालंय.


          आज आपल्याकडे असलेल्या गोष्टींमुळे आपण इतके Dependant झालोत की आपल्याला आपले Instinct वापरण्याची गरज च पडत नाही. त्यामुळे आज दिवसेंदिवस आपल्या समस्यां देखील वाढायला लागल्या आहेत. थोडक्यात काय आपली इच्छाशक्ती आपल्याकडे असूनही तिचा आज फारसा वापर होत नाही. पण याला अपवाद काही असे लोकं असतात जे असं काही करतात जे तुम्ही आम्ही फक्त विचारच करू शकतो, आणि ते हे सर्व फक्त इच्छाशक्ती च्या जोरावर करू शकतात. 

The Mysterious Power of the Human Mind : इच्छाशक्ती || Psychology
The Mysterious Power of the Human Mind : इच्छाशक्ती || Psychology

          आता अरुणीमा दासचं च उदाहरण बघा, एका पायाने अधू झाल्यावरही तिने एव्हरेस्ट सर केला.. Indian क्रिकेट Team चा खेळाडू युवराज सिंग च उदाहरण बघा..Cancer सारख्या आजारावर मात करून पुन्हा तो आज Cricket खेळतोय हे आपल्याला माहीतच आहे. हे सर्व त्यांनी इच्छाशक्ती च्या जोरावरच शक्य करून दाखवलंय...


          जर ते करू शकतात, तर आपणही आपल्या आयुष्यात याचा वापर करू शकतो आणि आपल्याला हवा तो बदल घडवून आणू शकतो. आता नेमकं काय करावं याबद्दल जाणून घेऊ..


          इच्छाशक्ती चा वापर करून हवा तो बदल घडवण्यासाठी काही ठळक मुद्दे महत्वाचे ठरतात, ते मुद्दे पुढील प्रमाणे -


1. समस्या ओळखा. -
          तुमच्या आयुष्यात कोणती समस्या आहे ती आधी ओळखा. कोणत्या Life Aspect मध्ये बदल करायचा आहे ते ठरवा.


2. वेळ नियोजित करा. -

          कोणत्या समस्येला किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि त्यानुसार एक वेळ नियोजित करून त्यानुसार आपल्या Priorities ठरवा.


3. System तयार करा. -

          Life च्या कुठल्याही भागात प्रगती साधायची असेल तर एक System तयार करा. त्यामुळे तुम्हाला एका न एका गोष्टीवर Focus करायला सोप्प जाईल.


4. Goal Set करा. -

          आपल्याला जे काय करायचं असेल त्याचं मनन करा आणि एक Goal Set करा.


5. Decide What You Want ! -

          तुम्हाला जे काय मिळवायचं आहे त्याचा पक्का निर्णय घ्या आणि त्यानुसार काम करणं सुरू करा.


6. एकाग्रता वाढवा. -

          एकाग्रता आणि इच्छाशक्ती चा जवळचा संबंध आहे. जी गोष्ट करायचीय त्या गोष्टीवर मन एकाग्र केलंत की त्याचा result लवकर मिळतो. म्हणून एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करा.


7. चांगल्या सवयी लावा. -

          चांगल्या सवयी लावल्याने इच्छाशक्तीचा विकास होतो म्हणून तुमच्या फायद्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यांच्या सवयी लावा. उदाहरणार्थ वाचन, चिंतन इत्यादी.


          या सर्व गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला इच्छाशक्ती चा वापर करून हवं ते मिळवता येऊ शकतं. मानवाने निसर्गाला Challenge केलं ते फक्त आणि फक्त इच्छाशक्ती च्या जोरावरच.. जर निसर्गाला नियंत्रीत करण्याचे मार्ग आपण शोधू शकतो तर आपल्या आयुष्याला आपण स्वतः नियंत्रीत करणं इतकं कठीण नाहीये. सर्व प्राण्यांमधून इच्छाशक्ती च आपल्याला वेगळं बनवते. इच्छाशक्ती च्या जोरावरच आज अनेक अशक्य वाटणारी कामे मानवाने करून दाखवली आहेत. पुढेही होतीलच, म्हणून तुम्हीं देखील तुमच्या इच्छाशक्ती चा वापर करा आणि सुरू करा प्रवास एका यशस्वी आयुष्याचा ! 




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने