आत्मोन्नती चा मार्ग : वैराग्य (Asceticism) || Psychology


          नमस्कार मंडळी !! आध्यत्मिक साधनाभ्यास करताना तुम्ही वैराग्य ( Asceticism ) या संज्ञेबद्दल ऐकलं वाचलं असेलच.. जर तुम्हाला आत्मोन्नती ( The Path to Self-Realization ) करायची असेल तर या सांसारिक मोह मायेतून विरक्त होऊनच ती साध्य करता येते अशी ती एक संकल्पना आहे. पण सांसारिक राहूनही वैराग्य मिळवता आले तर? अर्थात कुठेही न जाता आपण आध्यत्मिक आणि मानसिक प्रगती साधू शकलो तर ? मानसशास्त्र च्या ( Psychology ) लेखातून आपण आत्मोन्नती चा मार्ग : वैराग्य या बद्दल जाणून घेणार आहोत , चला तर मग जाणून घेऊया..


          वैराग्याबद्दल अनेक लोकांची धारणा असते की, वैराग्य म्हणजे एक असा प्रवास, ज्यात सांसारिक गोष्टी सोडून जंगलात जाऊन साधना वगैरे करावी लागते आणि बरीच मंडळी तर ती कल्पना करूनच " नको रे बाबा तसलं काही ! "
आत्मोन्नती चा मार्ग : वैराग्य (Asceticism) || Psychology
आत्मोन्नती चा मार्ग : वैराग्य (Asceticism) || Psychology

          असं म्हणून आधीच Give Up करतात. पण आपलं Culture आणि आपल्यातले अनेक साधू संत सांगतात की अध्यात्मिक साधनेत ज्ञान प्राप्तीसाठी वैराग्य महत्वाचे आहे, आपल्याला ते ज्ञान अवगत करण्याची जिज्ञासा तर आहे, पण ते सर्व सोडून वगैरे जाणं म्हणजे जरा Complicated च वाटतं.


          मग आलेला विचार हा फक्त एक विचारच राहतो आणि परिणामी आपल्याला हवं ते मिळवता येत नाही. कारण कोण घरदार सोडून जंगलात जाईल? मग अशावेळी प्रश्न पडतो की खरंच हे इतकं कठीण असतं का? तर हे समजण्यासाठी आधी वैराग्य म्हणजे काय? हे समजून घेणं महत्वाचं ठरतं.



◾ वैराग्य म्हणजे काय ?


वैराग्य म्हणजे अशी मानसिक स्थिती, ज्यात तुम्ही काहीही झालं तरी मन आणि विचार शुद्ध ठेऊन एक स्थितप्रज्ञ व्यक्ती बनू शकता.

         तुम्ही बुद्ध, महावीर, राजा गोपीचंद यांच्याबद्दल ऐकलं असेलच..सर्व प्रकारचं सुख Available असूनही या लोकांनी गृहत्याग केला आणि एक विशिष्ट प्रकारची ज्ञानप्राप्ती करून घेतली, म्हणजे ते लोकं अशा एका मानसिक पातळीवर गेलेत की ते स्थितप्रज्ञ झालेत. पण घाबरू नका तुम्हाला हे काहीही करायची गरज नाहिये, कारण त्यांनी जरी सर्व सोडलं तरी त्यांना जे काय हवं होतं ते मिळवल्यानंतर त्यांनी यातला च एक मध्यम मार्ग सांगितलाय, जो प्रत्येक व्यक्ती वापरून पाहिजे तशी आध्यत्मिक आणि मानसिक प्रगती करून घेऊन शकतो.


          आपलं मन प्रत्येक गोष्टींमध्ये आसक्ती शोधत असतं. आपलं अस्तित्व, आपलं शरीर, आपलं घर, आणि असं बरंच काही असतं ज्यात आपण गुंतलेले असतो आणि त्या गुंतलेल्या अवस्थेमुळे आपल्याला कायम ती गोष्ट निघून जाईल, त्या गोष्टीचा ह्रास होईल ही चिंता कुठेतरी असतेच.. आता बघा, आयुष्यात दुःखद घटना असतील तर त्या कधीतरी निघून जातील आणि सुखद घटना असतील तर त्याही कधीतरी निघून जातील, पण त्या लवकरच जातील किंवा नंतर पुन्हा काहीतरी होईल अशी चिंता सतत आपल्या मनात असते.


          बरं हे जाऊद्या, आताचं उदाहरण घेतलंत तर बघा, आपल्याला Mobile शिवाय करमत नाही आणि कुठेतरी Mobile हरपेल म्हणून कायम एक चिंता असते त्यामुळे आपण आपल्या Mobile ची खूप काळजी घेतो.  Basically काय होतंय की, आपण कायम कुठल्या ना कुठल्या चिंतेत असतो. त्यामुळे आपली Personality च चिंताग्रस्त झालीय.


          आता तुम्ही म्हणाल याचा आणि वैराग्य चा काय संबंध ? तर वैराग्य म्हणजे एक अशी अवस्था जेथे तुम्ही चिंतामुक्त असता. म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही तुमचा Mindfulness गमावत नाही. आणि ती अवस्था आणायची असेल तर तुम्हाला चिंतामुक्त जीवन कसं जगावं हेच फक्त समजून घ्यावं लागेल. आताच्या भाषेत समजून घ्यायच झालं तर Stress Free Life म्हणजे वैराग्य, अशी साधी Concept आहे.


         आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींच्या इतके आहारी गेलो आहोत की त्या गोष्टी नसतील तर आपलं तर जगणंच कठीण होऊन जातं. जसं की एखाद्या Metro City मधल्या लोकांच्या Lifestyle चं उदाहरण घ्या, पुणे मुंबई मध्ये लोकांची Life इतकी Fast झालीये की त्यांना त्या Lifestyle ची सवय झालीये, त्यामुळे लोकं आज Lock Down मध्येही बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायेत. हेच सम्पूर्ण जगभरात तुम्ही बघू शकता,


◾ प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा Addict झालाय.

◾ आता हेच बघा,  एखादा व्यक्ती Mobile चा इतका Addict असतो की, थोडा जरी Mobile नजरेआड झाला तरी त्या व्यक्तीला एक Discomfort सुरू होतो.


          आपल्या सर्वाना माहीतच आहे की Mobile हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्यासोबतच त्यात असणारा Social Media ,त्यावरचे मित्र हे सर्व एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्वाचे असतात की, जर कधी त्याला Mobile पासून दूर केलं तर त्याला ते शक्य होत नाही, कारण ते एक प्रकारचं Addiction झालेलं असतं. आध्यत्मिक भाषेत सांगायचं झालं तर त्याला ती आसक्ती असते आणि त्याच आसक्ती मुळे त्याला कायम एक प्रकारची चिंता असते. आणि चिंता ही त्रासाचं कारण असते. म्हणजे होतं काय, तो कायम Stress मध्ये राहू लागतो आणि आजकाल Mobile मुळे होणारे दुष्परिणाम तर आपल्याला माहीतच आहेत...


          " आध्यत्मिक प्रगतीचा मार्ग स्वीकारायचा असेल तर  आसक्ती सोडा ! " असं प्रत्येक Spiritual गुरू सांगत असतात. पण ही नेमकी "आसक्ती " काय हे आपल्याला कधी कधी कळत नाही आणि बऱ्याचदा हे सर्व वैराग्य वगैरे Confusing वाटायला लागतं. पण तुम्ही जर तुमच्या आयुष्यात या term चा विचार केलात तर लक्षात येईल की Mindfulness किंवा Mind Peace मिळवायचा असेल तर तुम्ही वैरागी होणं गरजेचं आहे. आता थोडक्यात जाणून घेऊया..


1. Mental Stability साठी वैराग्य :

          तुम्हाला तुमचं आयुष्य Stress Free जगायचं असेल आणि Mental Stability हवी असेल तर, तुम्ही जे कारणं तुम्हाला त्रास देतात त्यापासून वैराग्य घेणं गरजेचं आहे.


2 . Addiction सोडवण्यासाठी वैराग्य :

          आपण बऱ्याच गोष्टींचे Addict आहोत हे समजून घेऊन ज्या गोष्टी आपल्याला खरंच त्रासदायक ठरू शकतात त्यांच्यापासून वैराग्य घेणं महत्वाचं आहे.


3 . आत्मोन्नती साठी वैराग्य :

          तुम्ही जेव्हा शांत डोक्याने कामं करायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही प्रगती करून तुम्हाला हवं ते मिळवू शकता, म्हणजे वैराग्य तुमची Development करू शकते.


          थोडक्यात काय वैराग्य ही अशी Concept आहे जी तुमचे आसक्ती चे कारणं शोधून त्यापासून विरक्त करून तुम्हाला Mindfulness आणि Peace मिळवायला मदत करते म्हणून आसक्ती सोडून वैराग्य मिळवणं गरजेचं असतं आणि ते केलं तर तुमची अध्यात्मिक, मानसिक प्रगती होते म्हणजे थोडक्यात काय.. तर तुम्ही अशा गोष्टींपासून विरक्त होता, ज्यामुळे तुमची Development थांबली आहे. आता तुमच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या शोधून तुम्ही त्यावर मात करण्यासाठी असे वैरागी बना की तुम्ही सुद्धा एखाद्या महापुरुषासारखे तुम्हाला हवं ते मिळवू शकाल..एकदा असं वैराग्य घेऊन तर बघा !




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने