अंतिम सत्य : मृत्यू ( Death ) || Psychology


          मृत्यू ( Death )... एक अशी संकल्पना जी सर्व प्राणीमात्रांत लागू होते. ज्याने जन्म घेतलाय तो कधीतरी मरणारच, ज्याची सुरुवात झाली त्याचा अंत हा असतोच असं म्हणतात. पण खरंच मृत्यू म्हणजे The End ! असं आहे का? आपण आपला Consciousness घेऊन पुनर्जन्म घेऊ शकतो ? हा खरंच अंत आहे की सुरुवात ? असे प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडले असतीलच, मानसशास्त्र ( Psychology ) या भागात आपण अंतिम सत्य : मृत्यू यावर प्रकाश टाकणारा हा एक विचार पाहणार आहोत ...
अंतिम सत्य : मृत्यू ( Death ) || Psychology
अंतिम सत्य : मृत्यू ( Death ) || Psychology


Concept of birth :  


          जेव्हा दोन Energies एकत्र येतात तेव्हा एका नवीन जीवाची उत्पत्ती होते, त्यालाच आपण जन्म म्हणू शकतो. आता भौतिक जगातलं उदाहरण घेतलं तर एक नर आणि मादा एकत्र येते तेव्हा त्यांच्या संयोगाने एक नवीन Cross Breed तयार होते ज्यात दोघांचाही अंश असतो आणि जेव्हा ते तयार होऊन या जगतात येतं तेव्हा त्याला जन्म म्हणता येईल. ही संकल्पना जगातील प्रत्येक प्राणीमात्रांना लागू होते.


          जन्म झाला म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, एक जीव या जगाच्या संपर्कात येतो आणि त्याचा एक प्रवास सुरु होतो, Evolution चा एक भाग म्हणून त्याला दोन्ही जीवांकडून काही गुण मिळतात जे कालांतराने Develop होत जातात आणि त्यांच्या साह्याने तो जीव आपलं जीवन जगू लागतो. त्याला या जगताचे अनुभव मिळण्यास सुरुवात होते. त्याच्या जीवनाशी Related ज्या काही बाबी असतील त्या बाबी तो समजून घ्यायला लागतो, त्याच्या सभोवतालची परिस्थिती, त्याचं अस्तित्व अशा सर्वच गोष्टी तो समजून घ्यायला लागतो आणि सुरू होतो एक असा प्रवास..ज्याला आपण आयुष्य म्हणतो.Journey of Life


          आयुष्य सुरू होतं तसं प्रत्येक प्राणी आपल्या आपल्या स्थिती प्रमाणे तो प्रवास पूर्ण करू लागतो. फक्त प्राणीच नाही तर या पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येक जीव तेच करतो आणि एक Particular वेळ आली की तो, त्याचं अस्तित्व आणि त्याचा प्रवास हे सर्व संपतं.


          माणसाच्या बाबतीतही हेच आहे. आपण जन्म घेतो, अनुभव घेतो, त्या अनुभवातून आपली एक Personality बनते आणि तोच प्रवास आयुष्यभर करत करत एक वेळ अशी येते की जेथे हे सर्व संपून जातं. प्राणी आणि मानव यांच्या या प्रवासात बरंच काही Common असलं, तरी एक गोष्ट माणसाला त्यांच्यापासून विलग करते, ती म्हणजे आपले विचार.विचार करण्याची शक्ती ही फक्त माणसाकडे आहे.काही जीव असतीलही, पण प्रामुख्याने विचार केला तर मानव हा पृथ्वीतलावर एकमेव असा प्राणी आहे जो स्वतंत्र विचार करू शकतो. त्यामुळेच की काय स्वतःच्या अस्तित्वाविषयी मानवाला वारंवार प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न तो करत असतो.


Death: the end


          आपण जन्म घेतो, एक प्रवास करतो आणि अंततः तो प्रवास संपतो प्रत्येक गोष्ट, जी तुम्ही कधीतरी तुमची म्हणत होतात ती गोष्ट तुमची राहत नाही तिचा अंत होतो आणि शेवटी तुमचाही.. पण खरंच तो अंत आहे? की सुरुवात याबद्दल थोडंसं..


          जन्माबद्दल तर आपल्याला अनेक Explanations दिसतात, पण मृत्यू? याबाबत बऱ्याच कल्पना, विचार कधी कधी भ्रामक वाटतात. कारण त्यावेळी नेमकं काय घडतं हे प्रत्यक्षात कोणीच सांगू शकत नाही.


          तुम्ही कुठल्याही संस्कृती चे असाल, तुमच्या मान्यता काहीही असू देत, ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्यावर संपूर्ण मानवजात एक मत मांडते, ते म्हणजे जे आलं ते जाणार! पण याबाबत प्रत्येक विचारधारा काहीतरी सांगते त्या विचारधारा काय हे जाणून घेऊ..


◾ अध्यात्म :


             मृत्यू हे शाश्वत सत्य आहे ! असं प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू.. असं बऱ्याच ठिकाणी सांगितलंय.. यात चेतनेला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. जिवाची चेतना अनंतात विलीन होते तेव्हा मृत्यू होतो अशी व्याख्या हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिस्ती अशा अनेक धर्मात  केलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक विचारधारा आपलं आपलं मत मांडते.


विज्ञान


          विज्ञान सुद्धा याबाबत संशोधन करत असून आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आपल्या शरीराच्या Cells जेव्हा काम करणं बंद करतात तेव्हा तुमचे शारीरिक अवयव निकामी होतात आणि त्यामुळे सर्व अवयव बंद पडून तुमचा मृत्यू होतो अशी एक Basic व्याख्या आपल्याला विज्ञान सांगतं.


          या दोन्ही विचारधारा आपल्याला मृत्यूबद्दल बरंच काहीं सांगत असतात आणि आपण एक मनुष्य म्हणून ते सर्व ज्ञान आत्मसात करत असतो. पण कधी कधी काही विचार आपल्याला येतात, जसं की चेतना अनंतात विलीन होते म्हणजे नेमकं काय होतं ? किंवा जर Cells काम करणं बंद करतात तर त्या Replace करू शकता येतील का? एक ना अनेक प्रश्न डोक्यात येतात पण नेमकं उत्तर मिळणं कठीणच !
अंतिम सत्य : मृत्यू ( Death ) || Psychology
अंतिम सत्य : मृत्यू ( Death ) || Psychology

          अशातच काही वैज्ञानिक याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले आणि आपल्या अस्तित्वाविषयी ते आज बरंच काही Explain करत आहेत. त्यांनी अनेक प्रयोगाअंती निष्कर्ष काढणं सुरू केलंय आणि कदाचित या न उलगडणार्या रहस्याचं एक ना एक दिवस ते उत्तर शोधतील अशी अपेक्षा आहे. भविष्यात काही असे तंत्र विकसित होऊ शकते ज्यामुळे आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मानव शोधून काढेल. भविष्यात येणाऱ्या संभावना काय असतील त्याचा अंदाज काढणं कठीण आहे पण आज जे काय शोध सुरू आहेत त्यानुसार काही गोष्टी भविष्यात Possible होतील याचा एक आढावा..◾ भविष्याचा वेध : 


          भविष्यात आज आपल्याला चमत्कारिक वाटणार्या गोष्टींची उकल होऊ शकते. कारण आज मानवता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः अशा एका वळणावर येऊन पोहोचलीय की एक ना एक दिवस आपल्या अस्तित्वाविषयी पडणारे प्रश्न.. प्रश्न राहणार नाहीत आणि कदाचित त्यावेळी आपण स्वतः एक विकसित Civilization होऊ. पण त्याआधी काही अशा गोष्टी आहेत ज्या आज सुरू आहेत आणि भविष्यात त्या विकसित होतील त्याबाबत जाणून घेऊ.Resurrection


          भविष्यात जे व्यक्ती आज काळाच्या आड गेलेत त्यांचा पुनर्मजन्म कदाचित Possible होईल.

विज्ञान आज यावर संशोधन करत आहे. त्यासाठी इतिहासातील काही  महत्वाच्या व्यक्तीचं शरीर, मेंदू जे काय Preserve करता येईल ते करून ठेवण्यात आलेलं असून त्यांच्या DNA पासून पुन्हा त्यांची निर्मिती करता येईल का यावर संशोधन सुरु आहे.


Consciousness Transferation :


          आपण जेव्हा मरतो तेव्हा basically आपला मेंदू बंद पडतो आपले अवयव बंद पडतात आणि  Consciousness  निघून जातो. म्हणजे आपण आयुष्यभर जो काय अनुभव घेतलाय तो अनुभव त्या भावना , सर्व एकदम संपतं. पण जर तो Consciousness एखाद्या दुसऱ्या शरीरात Transfer करता आला तर? याबाबत आज प्रयत्न सुरू आहेत. आता स्वतःच्या अस्तित्वाची ओळख मानव करून घेतोय त्यामुळे ते अस्तित्व जर त्याला Control करून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी निर्माण करता आलं तर कदाचित मानवच ईश्वर बनू शकेल..!


Immortality and cyborgs :


          मानवाच्या उत्पत्ती पासून मानव अमरत्व मिळवता येईल का याचा विचार करतोय आणि त्यामुळेच मानवाने अनेक प्रकारचं साहित्य देखील निर्माण केलंय, पण खरंच अमरत्व मिळवता आलं तर ?


          यावर आज संशोधन सुरू असून Artificial Intelligence चा वापर करून मानव आणि Machine यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडक्यात काय तर जो शारीरिक अवयव निकामी झाला त्याच्या जागी Artificial अवयव बसवला तर मानवाचं जीवनमान वाढेल आणि हेच जर Complete Physical Body च्या बाबतीत करता आलं तर Cyborgs तयार करता येतील आणि हे एकप्रकारच अमरत्वच असेल.


          भविष्यात काय होईल याचा आपण आज फक्त एक  अंदाज लावू शकतो. पण कदाचित आज जी काय संभावना वाटतेय ती उद्या खरंच अस्तित्वात येईल तेव्हा ती एक नव्या युगाची सुरुवात असेल जेथे मानवता Limitless  होईल. तोपर्यंत मृत्यू म्हणजे नेमकं काय हे जाणन्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे साक्षात मृत्यू ! आता तो अंत आहे की सुरुवात हे काळानुसार कळेलच!
लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने