The Power of Now : वर्तमानात जगण्याची कला || Psychology


          नमस्कार मंडळी... !! Hollywood चा एक Movie Kungfu Panda मध्ये एक संवाद आहे जो काळाची व्याख्या करतो. तो म्हणजे Past is a History , Future is a Mystery, but Today is a Gift, That is why it is Called Present !  किती काही सांगून जातो तो या वाक्यातून... म्हणजे बघा ना आयुष्य जगायचं असेल, तर The Power of Now वर्तमानातच जगा असं त्यातून समजतं, पण खरंच वर्तमानात जगतांना आपण वर्तमानात कधी जगतच नाही. आता तुम्ही म्हणाल "वर्तमानात जगतांना वर्तमानात नाही ?" हे कसं शक्य आहे, आणि जर तसं असेलच तर वर्तमानात जगण्यासाठी तरी काय करावं लागेल ?

याच प्रश्नाची उकल करण्यासाठी जाणून घेऊया वर्तमानात जगण्याची कला..
The Power of Now : वर्तमानात जगण्याची कला || Psychology
The Power of Now : वर्तमानात जगण्याची कला || Psychology


वर्तमानात जगण्याची कला :


          एकदा एका रस्त्याच्या कडेला कधीकाळी एक काळ गाजवलेला कबड्डी चा खेळाडू भीक मागत एका लाकडी पेटीवर बसलेला होता. त्याला त्याची निवृत्ती म्हणून त्याच्या एका Fan असलेल्या माणसाने एक पेटी दिलेली पण त्याने आयुष्यात ती पेटी कधी उघडली नाही. तो निवृत्त झाला कारण त्याचा पाय मोडला होता आणि त्याला पुन्हा कधीच खेळता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. काळ जायला लागला तसा तो अधिकाधिक कमजोर व्हायला लागला, जवळचे पैसे संपून गेले , खायला काही मिळेना, वय सुद्धा वाढलेलं आणि तो एकटाच असल्यामुळे त्याला घरही मिळत नव्हतं.असेच दिवस जात होते . तो हळूहळू पैसे नसल्याने आणि काही शारीरिक कामही करता येत नसल्याने भीक मागू लागला.


          आज त्याला भीक मागता मागता 20 वर्षे झाली होती, असाच रस्त्याच्या कडेला भीक मागत असताना एक संत त्याच्या जवळ गेले. त्याने नेहमी प्रमाणे त्यांना सुद्धा भीक मागितली, पण ते संत बोलले की "मी तुला पैसे तर नाही देऊ शकत पण मला सांग की तू ज्यावर बसला आहेस ते काय आहे?" त्याने सांगितलं की ही बस एक लाकडी पेटी आहे तेव्हा ते संत म्हणाले, "कधी आत बघितलंस की काय आहे?" तो भिकारी उत्तरला "काही फायदा नाही ती फक्त एक पेटीच तर आहे",  "पण एकदा बघ तरी त्यात काय आहे?" संत बोलले, त्याने शेवटी ती पेटी उघडली आणि त्यात बघतो तर काय? ती पेटी चक्क सोन्याने भरलेली होती. 


          ही कथा आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगते, म्हणजे बघा ना, आपण नेहमी आपल्या त्रासाचा उपाय बाहेरच शोधतो , पण वास्तविकतेत त्याचं उत्तर आपल्या अंतरंगात असतं. होतं काय की, आपले विचारच आपले शत्रू बनून जातात आणि त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. या त्रासाची कारणं दोन प्रकारात विभागली जातात. त्यांच्याबद्दल थोडसं जाणून घेऊ.



1. भीती ( Fear ) :


          भीती ही नेहमी भूतकाळाची असते, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो ना तेव्हा तेव्हा आपलं मन हे भूतकाळात जातं. याचं एक साधं उदाहरण बघू,
तुम्हाला एखादा भूतकाळात आलेला वाईट अनुभव आठवला की भीती वाटायला लागते. तो अनुभव तुम्ही आधी घेतलेला असतो पण पुन्हा पुन्हा तोच विचार आला की, आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो.



2. दुःख ( Pain ) :


           दुःख हे कायम भविष्य काळाशी निगडित असतं. म्हणजे बघा, जी गोष्ट आज नाहीये तीच गोष्ट तुम्ही विचारात घेता आणि त्याची Overthinking सुरू होते.
 एकदा का हे चक्र सुरू झालं की मग ते थांबायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला दुःख व्हायला लागतं.


          Basically भीती आणि दुःख या बाबी वर्तमानात नाहीत आणि कायम आपलं मन एकतर भूतकाळात जातं किंवा भविष्यकाळात जातं. भूतकाळात गेलं तर वाईट अनुभवांचे विचार आणि भविष्यात गेलं तर काय होईल याची चिंता, यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. मन विचलित होतं आणि एकवेळ अशी येते की एकदाची सुटका करून टाकावी असं वाटायला लागतं.


 पण त्यावर हा उपाय नाही. उपायच जाणून घ्यायचा असेल तर तो म्हणजे विचार करणं बंद करा असं सांगता येईल, पण खरंच ते इतकं सोप्पं आहे का?

यासाठी तुम्ही आताच एक प्रयत्न करून बघा, आपले विचार थांबवण्याचा प्रयत्न करा. बघा जमतंय का?

उत्तर नाही असंच येईल. कारण आपला mind हा कधी विचार करणं थांबवूच शकत नाही.

मग अशावेळी प्रश्न पडतो की हे विचार करणं थांबवावं तरी कसं? याबद्दल थोडं जाणून घेऊ..

विचार बंद करण्यासाठी हे आधी समजून घ्या की तुम्ही विचार नाही, किंवा असंही म्हणता येईल की, तुम्ही फक्त एक मेंदू नाही. तुम्ही त्या मेंदूच्या व्यतिरिक्त एक फार मोठं अस्तित्व आहात.


The Power of Now : वर्तमानात जगण्याची कला || Psychology
The Power of Now : वर्तमानात जगण्याची कला || Psychology


◾ Ego ची संकल्पना :


          बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जे आहोत ते अस्तित्व म्हणजे आपला मेंदू आणि आपले विचार आहेत. पण वास्तविकतेत असं नसतं, तुम्ही जे तुमचं अस्तित्व समजता तो फक्त तुमचा Ego असतो. Ego हे एक असं Mechanism आहे जे तुमचं व्यक्तिमत्व  तयार करतं, म्हणजे जे तुम्ही स्वतःला समजता, ते सर्व काही Ego ने तयार केलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल जर हे सगळं Ego ने केलेलं आहे तर मग मी कोण?

          येथे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची ओळख होणं गरजेचं असतं आणि तुमचं अस्तित्व ओळखण्यासाठी एक प्रयोग करावा लागतो तो प्रयोग म्हणजे -



◾ Brain Listening :


तुम्ही तुमचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मेंदूचं म्हणणं काय आहे हे समजणं सुरू करा.

स्वतःला येणाऱ्या विचारांपासून विलग करण्याचा प्रयत्न करा.

जे काय विचार येत जात असतील त्यांना जाऊद्या. तुम्ही ना त्यांचा सोबत जायचं आहे ना त्यांना अडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बस ते येतात तसे येऊ द्या आणि फक्त त्यावर लक्ष द्या.

जेव्हा तुमच्या लक्षात येईल की येणारे विचार आणि तुम्ही वेगवेगळे आहात तेव्हा तुम्हाला तुमचं अस्तित्व समजणं सुरू होईल.

तुम्हाला कळायला लागेल की, तुम्ही या प्रक्रियेच्या बाहेर आहात. 

          प्रेम, सुरक्षिततेची भावना, सृजनशीलता या सर्व गोष्टी आपल्या विचारांच्या ही पलीकडच्या आहेत हे तुमच्या लक्षात यायला लागेल आणि अशावेळी तुम्ही, तुमचं खरं स्वरूप समजण्यास सुरुवात कराल.



◾ Being in Now :


          एकदा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव झाली की मग तुम्हाला वर्तमानात जगणं काय असतं ते समजायला लागेल. 

          हे समजण्यासाठी एक उदाहरण बघूया, जेव्हाही तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तेव्हा ती गोष्ट Feel करा.

          जसं की, जर एखाद्या खुर्चीवर बसले असाल तर त्या खुर्ची च लाकूड कसं आहे. तुमची त्या खुर्चीवरची Position कशी आहे, ती खुर्ची थंड लागतेय की गरम लागतेय, त्याचा स्पर्श कसा वाटतोय हे सर्व Feel करण्यास सुरुवात करा.

          एखाद्या बागेत गेला असाल तर तिथले वृक्ष कसे आहेत , त्यांचा स्पर्श कसा आहे, त्यांचे आवाज कसे येतात हे सर्व Feel करणं सूरु करा.

          समजून घ्या की तुमच्याकडे जे काय आहे ते आज आत्ता आहे. ते एकदा गेलं की पुन्हा येणार नाही. वास्तविकतेत भविष्य ही नाही आणि भूतकाळही नाही. आहे तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे असलेला क्षण,  A Present Moment !

          म्हणून पुढच्या वेळी, जे काय कराल किंवा अनुभवाल ते मनापासून आणि Consciously अनुभव करणं सुरू करा. प्रत्येक गोष्ट, नेहमीच feel करून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

          जे काय आहे ते आत्ता आहे असा विचार कायम राहील असा Mind Set करा आणि एकदा ते जमायला लागलं की मग तुम्हालाही जमेल वर्तमानात जगण्याची कला.


लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने