अयोध्येत भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे जाणार का ? | धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यास चालना देण्यास टाळावे : माजिद मेमन || Marathi news


          पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असून सध्या संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे. तरी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून आता नवीन राजकारण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. एनसीपीचे शरद पवार यांनी राम मंदिर बाबत वक्त्यव्य केले जसे " मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही.  " यानंतर सर्वत्र खळबळ माजली. शरद पवारांना काही जणांनी प्रत्युत्तर दिले. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता ? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात राष्ट्रवादीला त्रास होण्यासारखं काय? असा प्रश्न भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यास चालना देण्यास टाळावे : माजिद मेमन

          शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार की नाही. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी अशी माहिती दिली , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील.“शिवसेनेचं राम मंदिर विषयी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


          याच मुद्यावर बोलताना माजिद मेमन यांनी ट्विटर वरून प्रतिक्रिया दिली ती अशी " उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित आहेत. ते त्याच्या वैयक्तिक क्षमतेतील कोविड 19 निर्बंधांचा आदर ठेवून सहभाग घेऊ शकतात. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यास चालना देण्यास टाळावे." यावरून आता सारे लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होतात कि नाही याकडे सर्व लक्ष आहे हे सुरु असतानाच राजकारणात आणखी काही घडामोडी होताना दिसतील .

Majeed Memon यांचे ट्विट :


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!Post a Comment

Previous Post Next Post