Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला || Psychology


          नमस्कार मंडळी.. !! निसर्गात असणारी प्रत्येक गोष्ट मग ते ऋतू असोत अथवा जीवसृष्टी सर्व एका निश्चित घटनेवर अवलंबून असून एखाद्या System सारखं सुरळीत चाललेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा जेव्हा आपण जीव सृष्टीचा विचार करायला लागतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांच्यामध्ये असणारं एक Balance ( संतुलन ) दिसून येतं.


          माणूस म्हणून जगताना आपल्यालाही असंच निसर्गाच्या संतुलनासारखं आपलं आयुष्य जगता आलं तर, किंवा रोजच्या जीवनात एक Balance ठेवता आलं तर ? त्रास च होणार नाही ! नेमकं हे Balancing कसं करावं आणि आनंदी आयुष्य त्यातून कसं निर्माण करता येईल या साठीचा हा एक विचार.. Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला..
Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला || Psychology
Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला || Psychology

Balanced Life चं महत्व :


          आजच्या या धकाधकीच्या जीवनात कुठंतरी थांबून थोडा वेळ स्वताला देणं गरजेचं असतं, कारण जीवनभर आपली, आपल्या अस्तित्वाची, आणि त्यातील लोकांच्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण धडपड करतच असतो. अशावेळी काय होतं की आपल्या नैसर्गिक जीवनमानाचं चक्र बिघडतं, मग अनेक प्रकारचे रोग मागे लागतात, आयुष्यात समस्यां उदभवायला लागतात आणि आपल्याला समजत नाही की आपलं कुठे चुकतंय..


          जेव्हा असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात समस्यां निर्माण होतायेत तेव्हा कुठेतरी आपल्या आयुष्याचा समतोल बिघडलाय असं समजावं, अशावेळीच खरं तर तुम्हाला गरज असते ती एका Balanced Life ची आणि ते कसं करावं याबद्दल थोडं जाणून घेऊ..Balanced Life करण्यासाठी काही टिप्स :


          तसं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या वेळेनुसार आणि Lifestyle नुसार Life Balancing करता येतं. व्यक्तिपरत्वे ही संकल्पना बदलत जाते पण पुढे काही tips देत आहोत ज्यामुळे तुम्हाला मदत होईल..


1. स्वताची काळजी घ्या :

           तुम्ही नेहमीच हे ऐकलं असेल पण ही गोष्ट एक आनंदी आणि संतुलित आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेणं सुरू करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेणं सुरू करता म्हणून नेहमी चांगलं Healthy अन्न घ्या, चांगला व्यायाम करा आणि जेव्हा ही कधी ताण येईल तेव्हा थोडा वेळ काढून स्वतः कडे लक्ष देणं सुरू करा.


2 . वेळापत्रक बनवा :

          याचा अर्थ असा नाही की एक विशिष्ट Timetable बनवून तसंच करा...खरं तर तुम्ही तुमचा वेळ कुठं घालवताय आणि रोजच्या वेळेत काय काय करताय याचं थोडं भान ठेवा शारीरिक त्रास होत च आहे आणि तरीही तुम्ही काम करताय किंवा Stress येतोय आणि तुम्ही कामे करतच जाताय असं न करता थोडं गोष्टीना Organize करून कामं सुरू करा म्हणजे आपला वेळ कुठे जास्त जातोय हे आपल्या लक्षात येईल.


3. ध्येय ठरवा :

          काही ध्येय असलं तर आपल्याला त्या दिशेने काम करणं सोप्प जातं. ध्येय हे कुठलंही असू शकतं, जसं की तुम्ही सध्या घरीच असाल तर लवकर उठण्याचं आणि लवकर झोपण्याचं एक ध्येय ठेवा, Exercise करत असाल तर कालच्या पेक्षा आज थोडं जास्त Workout करू असं आपल्या प्रत्येक कामात एक ध्येय ठरवून काम करा म्हणजे एक दिशा निर्धारण होऊन त्या दिशेने काम करणं सोप्प जाईल.


4. चांगलं खा :

          आता तुम्ही म्हणाल आम्ही चांगलंच खातो, पण सांगण्याचं तात्पर्य हे की जे तुमच्या शरीराला Strong बनवेल असं काही खा. आपण ती म्हण ऐकलीच असेल "जैसा खाओ अन्न वैसा होये मन" तर आपल्या जिभेच्या आनंदासाठी नाही तर आपल्या शारीरिक बळकटी साठी अन्न घ्या.


          वरील गोष्टी या तुम्ही कुठेतरी वाचल्या, ऐकल्या असतीलच.. पण त्या समजून घेऊन अंमलात आणनं गरजेचं असतं. जेव्हा ततुम्ही या सर्व गोष्टींचा वापर करून एक संतुलन निर्माण करणं सुरू करता तेव्हा काही फायदे तुम्हाला ठळकपणे दिसून येतात, ते बघूया..
Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला || Psychology
Life Balancing : आनंदी आयुष्य जगण्याची कला || Psychology


Balanced Lifestyle चे फायदे :1. ताण तणाव कमी :

          जेव्हा तुम्ही एक आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणं सुरू करता तेव्हा त्याचा सर्वात आधी तुमच्या Stressful Mindset वर परिणाम होतो आणि ताण तणावात कमी होण्यास सुरुवात होऊन तुम्ही आनंदी आयुष्य जगण्याची सुरुवात करता.


2. सुदृढ शरीर :

          जेव्हा आपल्या आयुष्यात एक Balance निर्माण व्हायला लागतं तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसुन यायला लागतो अर्थातच व्यायाम केल्यावर शरीर सुदृढ बनते तसंच Overall Life Balancing तुम्हाला सुदृढ शरीर प्रदान करण्यास मदत करते.


3. सकारत्मक मानसिकता :

          चांगल्या गोष्टी केल्याने तुमच्यातील Negativity कमी होत जाते आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होण्यास सुरुवात होते एकदा सकारत्मक मानसिकता निर्माण झाली की त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होऊन तुम्ही एक सकारत्मक व्यक्तिमत्व म्हणून पुढे येऊ लागता.


4. शारीरिक ऊर्जा वाढते :

          जेव्हा सर्व काही संतुलित व्हायला लागतं तेव्हा शारीरिक आणि मानसिक अस्तरावर या सर्व गोष्टींचा परिणाम व्हायला लागतो जेणेकरून शारीरिक ऊर्जा वाढते आणि तुम्ही अधिक जोमाने कामं करू शकता.


          आयुष्य म्हटलं की त्यात समस्या आल्याच, पण त्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही सुदृढ असणं गरजेचं असतं आणि शारीरिक मानसिक सुदृढता आणायची असेल तर आयुष्याच्या प्रत्येक भागात संतुलन असणं गरजेचं असतं. एकदा स्वतःची समस्या लक्षात आली की  तुम्हाला त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी Life Balancing ची मदत होऊ शकते. म्हणून एकदा तरी आत्मचिंतन करून Life Balancing चा प्रयत्न करा आणि सुरू करा प्रवास एका आनंदी आयुष्याचा..!

लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98Instagram :
@gtushar111 सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 

या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने