देशाचे नाव ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ होईल का ? || Marathi news


          India’ हा शब्द भारतीय राज्यघटनेतून काढून टाकावा आणि केवळ ‘भारत’ (Bharat) हे नाव ठेवावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात  (Supreme court ) हजर करण्यात आली होती. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती . तरी सर्व जनतेचे लक्ष या गोष्टीकडे लागून राहिले आहे कि आता सर्वोच्च न्यायालय यावर काय सुनावणी करते .

देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ होईल का ? || Marathi news
देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ होईल का ? || Marathi news

          याचिकाकर्त्याचं म्हणणं असं आहे कि , घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा . संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याची  मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे तरी यामध्ये बदल करून इंडिया नावाऐवजी भारत नाव वापरावं, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे .


          सरन्यायाधीश शरद बोबडे हजर नसल्याने सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आले. त्यानंतर आज (दि.२) सरन्यायाधीश शरद बोबडे , न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. दिल्लीतील एका व्यक्तीने ही याचिका केली आहे. देश एक आहे तर नाव एक का नाही? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.


          तर या सुनावणी बद्दल असे सांगण्यात येत आहे कि देशाचे नावे "इंडिया" वरून "भारत" असे ठेवण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे , पुढील तारीख न देता. या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आव्हान असलेले सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आज रजेवर होते, त्यामुळे हे प्रकरण तहकूब करण्यात आले.         भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी या प्रकरणात मागील दिवसांपूर्वी ट्विटर वर ट्विट केले. उमा भारती त्यामध्ये म्हणतात , एका देशाची किंवा व्यक्तीची दोन नावं नसतात उदा.  'सूर्यप्रकाश that is सनलाइट, कोणाचे नाव असणार नाही. अशाच प्रकारे इंडिया that is भारत असं नाव असणं हे हास्यास्पद आहे.          'इंडिया हे इंग्रजी नाव हटवल्यानं राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल. येणाऱ्या पिढ्यांवर भारत/हिंदुस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. भारत शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल,' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. आपल्या देशाचे नाव इंडिया बदलून भारत होईलच अशी आशा जनतेतून पाहायला मिळत आहे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने