मराठ्यांचा  खरा इतिहास आणि शूरवीर छत्रपती संभाजी राजे || Marathi Special


          प्रौढ प्रताप पुरंदर , घोडदळ - पायदळ , अंगात दहा हत्तीचं बळ . रयतेचा कैवारी तो सूर्यासारखा तेजस्वी शिवपुत्र , पराक्रम ऐसे कि शत्रू थर थर कापे. मावळ्यांचा आधार तो राजा अमुचा मराठी मातीचा , अरे दिल्लीचे हि तख्त राखतो महाराष्ट्र माझा . जय जय शंभू राजे आपणास मानाचा मुजरा. मराठ्यांचा इतिहास वाचताना अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाहीत तर रक्त सळसळते तोचि खरा मावळा ओळखावा.

मराठ्यांचा खरा इतिहास आणि शूरवीर छत्रपती संभाजी राजे || Marathi Special
मराठ्यांचा खरा इतिहास आणि शूरवीर छत्रपती संभाजी राजे || Marathi Special  (source:Twitter)

          महापराक्रमी शूरवीर असे छत्रपती संभाजीराजेंचा जन्म जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला . हा किल्ला पुण्यापासून जवळ जवळ ५० किलोमीटर दूर आहे. शिवपुत्र Sambhaji maharaj हे शिवाजी महाराजांचे पहिले पुत्र  तसेच त्यांच्या आई सईबाई होत्या. Saibai ह्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत. अवघे दोन वर्षाचे असताना संभाजी राजेंवरचे मायेचे छत्र हरवले म्हणजेच सईबाई यांचे निधन झाले . आज्जी जिजाबाई यांनीच त्यांचे पालनपोषण केले.  भावी स्वराज्याचे छत्रपती व पालनहार म्हणून Shivaji maharaj नी त्यांना घडवण्यास सुरुवात केली . शिवाजी महाराज मोहिमेवर जात असताना संभाजी राजेंनाही सोबत नेत असत. शिवाजी महाराजांचा एकच हेतू होता कि त्यांनी स्वतःला एका महान राजा व पराक्रमी योध्या सारखं बनवावं .


          औरंगजेबासोबतच्या भेटीचा क्षण हा संभाजी राजेंच्या आयुष्यातील कठीण प्रसंग होता. औरंजेबाने शिवाजी महाराजांच्या भेटीचा खलिता पाठवला होता त्यावर शिवाजी महाराजांनी तो स्वीकारलाही होता. औरंगजेबाची कटकारस्थाने सुरु झाली तशी संभाजी महाराज त्यांना न घाबरता सामोरे गेले. आग्र्यात बंदीत असताना संभाजी राजेंनी शत्रूच्या सहवासात राहून खूप साऱ्या गोष्टी शिकल्या. आग्र्याहून निसटता पाय घेणे , स्वराज्यापासून दूर राहून हेरगिरी करणे - वेषांतर करणे , वेगवेगळ्या परिस्थीचा आढावा घेत त्यावर मार्ग काढणे या गोष्टींची त्यांना पूर्ण पने समज आली. भावी होणारे छत्रपती म्हणून त्यांना हे सर्व करणे भाग्य होते . वयाच्या अवघ्या १४ वर्षात त्यांनी बुधभूषणम, नखशिखांत, नायिकाभेडा आणि सतटक अशी तीन संस्कृत ग्रंथ लिहिली होती. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ते 13 भाषा शिकले होते.


ऍबे कँरे नामक एका फ्रेंच प्रवाश्याने १६७२ च्या सुमारास संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन असे . 


          “ युवराज हे लहान आहे, तरी धैर्यशील व आपल्या वडिलांच्या कीर्तीस साजेल असेच शूर आहेत. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून ते युद्धकलेत तरबेज झालेले असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतके ते समर्थ बनले आहेत .सैनिकांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीराजांसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीराजेंच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. "


          शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजी राजेंनी अनेक मोहिमा हाताळल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. संभाजीराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी झाला. आपल्या पित्याप्रमाणे स्वराज्याचे पालनहार आणि रयतेमध्ये पसरलेलं गैर समज त्यांना दूर करायचे होते. एक महान राज्यकर्ता व पराक्रमी योद्धा म्हणून त्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते. शस्त्रविद्या, विद्याभ्यास, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले व अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले. ते रयतेचे कैवारी बनले.

मराठ्यांचा खरा इतिहास आणि शूरवीर छत्रपती संभाजी राजे || Marathi Special
मराठ्यांचा खरा इतिहास आणि शूरवीर छत्रपती संभाजी राजे || Marathi Special (Source-Twitter)

          कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक संभाजी राजेंनी मोडून काढली व बाटलेल्या हिंदूंना स्वराज्यात एकत्र आणले . रयतेपुढे एक महान राजा असे त्यांचे चित्र निर्माण झाले. संभाजी राजेंनी औरंगजेबाला चिंता करण्यास भाग पडले होते , राजेंच्या सततच्या कारवायांमुळे औरंगजेब चिडून होता . संभाजी महाराजांनी जगातील सर्वात पहिला तरंगणारा तोफखाना तयार केला होता . जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार दल वाढविले. प्रथमच स्वराज्याचा स्वतंत्र दारुगोळा कारखाना सुरु केला . चार नव्या किल्यांची भर स्वराज्यात घातली. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत एकही किल्ला शत्रूच्या हाती लागू दिला नाही .


          स्वराज्याच्या सीमा दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. आणि दुसरीकडे औरंगजेबाची डोकेदुखी वाढत चालली होती. औरंजेब कोणतेतरी मोठे पाऊल उचलणार हे संभाजी राजेंनी जाणले होते. ते खरेही ठरले ५ लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला अवघ्या ७० हजार मावळ्यांसह सामोरे जात राजेंनी स्वराज्याचे रक्षण केले. इथेच आपल्या ला प्रचिती येते कि संभाजी महाराज किती शूरवीर योध्ये होते. कुठे पाच लाख आणि कुठे ७० हजार . हे जाणून संभाजी महाराजांविषयी ची भावना अधिकच उंचावते. मुघलांना सळोकीपळो करून सोडणारे मराठे उगाच म्हणत नाहीत हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल.


स्वराज्याचा अमुल्य रत्न आपले छत्रपती संभाजी महाराज १६८९ साली फितुरांमुळे शत्रूच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्यापुत्राने बलिदान दिले.


मराठ्यांचे स्वराज्य आणि खोटा इतिहास


          आपल्या समाजात अशा काही विकृती निर्माण झाल्या आहेत कि ते खुशाल स्वराज्याचा खोटा इतिहास पसरवताना दिसतात . इतिहासाचे लेखन जणू मद्यपान करूनच  लिहत असावे असे वाटते. कोणताही संदर्भ नाही कि पुरावा नाही खुशाल आपले मत मांडून द्यायचे. साधारण १० वर्षांमागे इयत्ता ४ थी चे पुस्तक वाचले तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. या सर्व गोष्टीवर सरकारने कठोर कायदा आणावा असे सूचित करायचे आहे. हे घाणेरडे राजकारण सुरूय ते फक्त आणि फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी , आजकाल नवीन ट्रेंडच आलाय जणू तुम्ही फक्त सांगेल तसे लेखन करायचे बदल्यात बक्कळ पैसे मिळवता येतात . असो या विषयावर खोलात नाही जायचं . पण ज्या शूरवीरांनी मराठी मातीसाठी रक्त सांडले त्यांच्याबद्दल विकृत लोकांचे कलम उठते तरी कसे हि खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.


          मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने