तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । Technology ।। खास मराठी. 


तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । तंत्रज्ञान ।। खासमराठी.
तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । तंत्रज्ञान ।। खासमराठी. 


     ROM चा फुलफॉर्म ( Read only Memory ) रीड ओन्ली मेमरी आहे. ही एक मेमरी आहे जी केवळ वाचली जाऊ शकते आणि काढली जाऊ शकत नाही. मल्टीमीडिया ऑडिओ, व्हिडिओ, चित्रे आणि बर्‍याच प्रकारचे अनुप्रयोग आणि  महत्त्वपूर्ण डेटा फायली मोबाइल किंवा संगणकात संचयित करण्यासाठी रोम चा उपयोग केला जातो.याचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे आपण जेव्हा एखादा संगणक किंवा मोबाइल वापरतो तेव्हा अचानक वीजपुरवठा बंद झाल्यामुळे त्याचा डेटा अदृश्य होत नाही.रॉम आपला डेटा कायमचा किंवा आजीवन संचयित करू शकतो.त्याला कायमस्वरुपी स्टोरेज डिव्हाइस देखील म्हणतात. ही एक नॉन-अस्थिर मेमरी आहे जेणेकरून संगणक बंद झाल्यानंतरही आपला डेटा सुरक्षित राहतो आणि ते हि बर्‍याच काळासाठी.रॉम चीप रॅमपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि रॉम हा सीपीयूचा एक भाग आहे. रोम हे कायमस्वरूपी स्टोरेज डिव्हाइस आहे.

     रोम हि फक्त कॉम्पुटर मध्येच वापरली जात नाही तर खूप अशी यंत्रे आहेत ज्यामध्ये रोम चा उपयोग केला जातो जसे कि  टेलिव्हिजन , एसी , मोबाइल फोन्स , वॉशिंग मशीन आहे . रोम हि नॉन वोल्टाइल मेमोरी आहे याचा अर्थ असा होतो कि , ती कधीही पुसली ( delete ) जाऊ शकत नाही जेव्हा संगणक बंद होतो तेव्हा ह्या मेमरी ला काहीच होत नाही ती पूर्णपणे चिप मध्ये साठवलेली असते.  तुमचा संगणक जेव्हा स्टार्ट, बूटिंग प्रोसेस होत असतो. तेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स ची गरज असते त्या सर्व इंस्ट्रक्शन्स रोम मध्ये साठवलेल्या असतात त्याचा उपयोग करून संगणकाची बूटिंग प्रोसेस पूर्ण होते .

रोम चे काही प्रकार :- 


1) MROM ( मास्केबल रीड ओन्ली मेमरी ) :

     मास्केबल रीड ओन्ली मेमरी केवळ रीड मेमरीचा सर्वात जुना प्रकार आहे म्हणून आजच्या जगात कुठेही वापरले जात नाही. हे एक हार्डवेअर मेमरी डिव्हाइस आहे ज्यात उत्पादकाद्वारे उत्पादनाच्या वेळी प्रोग्राम आणि निर्देश संग्रहित केले जातात म्हणून ते बनवण्याच्या  प्रक्रियेदरम्यान प्रोग्राम केले गेले आहे आणि नंतर अपडेट , पुनर्प्रक्रमित किंवा मिटविणे शक्य नाही.

2) PROM ( प्रोग्रामबल रीड ओन्ली मेमरी ) :

     प्रोग्रामबल रीड ओन्ली मेमरी यामध्ये आपण याला फक्त एकदाच बदलू शकतो. एकदा अपडेट केल्यानंतर त्याला आपण बदलू शकत नाही. वापरकर्ता रिकामी प्रोम विकत घेऊन त्यात माहिती संचयित करून ठेवू शकतो पण त्या माहितीला पुन्हा अपडेट करू शकत नाही म्हणून इथे माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी लागते . एकदा संचयित केलेली माहिती पुसता हि येत नाही. ( Delete )


तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । तंत्रज्ञान ।। खासमराठी.
तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । तंत्रज्ञान ।। खासमराठी. 

3) EPROM  ( इरेसबल आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी ) :

      इरेसबल आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी अशा प्रकारची मेमरी आहे जी आपल्याला इरेस करता येऊ शकते व पुन्हा संचयित करून ठेवता येते . ते करण्याची प्रकिया जरा वेगळी आहे त्यासाठी या मेमोरीला ४० मिनिटे अल्ट्राव्हायोलेट लाईट मधून पास केले जाते त्यामुळे ती मेमरी नष्ट होवून रिकामी होते .
त्यानंतर आपण पुन्हा त्या मेमरीमध्ये माहिती संचयित करून ठेवू शकतो.

4) EEPROM  ( इलेकट्रीकली इरेस आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी ) :

      टेकनॉलॉजीच्या नव - नवीन शोधांमुळे रीड ओन्ली मेमरी ला बदलणे आणि पुन्हा संचयन करण्याची गरज भासत होती त्यामुळे या इलेकट्रीकली इरेस आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरीचा शोध लागला . या मेमोरीचे असे हि वैशिष्ट्य आहे कि तिला आपण १० हजार पेक्षा जास्त वेळा इरेस  व अपडेट करू शकतो. या मेमरी मधील विशिष्ट अश्या ठिकाणी साठवलेली ( Memory Location ) मेमोरीसुद्धा तिथल्या तिथेच इरेस  व अपडेट करू शकतो , त्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती इरेस करायची गरज नसते.


रोम चे फायदे : 


१) रोम मधील माहिती स्वतःहून बदलली जावू शकत नाही , जोपर्यंत आपण बदलत नाही.

२) रोम मधील माहिती कधीच नष्ट होऊ शकत नाही.

३) RAM मेमरीपेक्षा ROM मेमरी अधिक विश्वासू असते कारण संगणकाचा पॉवर सप्लाय बंद केल्यास RAM  मधील माहिती पुसली जाते. ( Delete )

४) हि एक स्थिर मेमरी आहे पुन्हा पुन्हा रिफ्रेश करायची गरज नसते.

५) ROM मध्ये डेटा काळजीपूर्वक साठवणे गरजेचे असते कारण तो पुन्हा बदलता येत नाही.


    मित्र - मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख कसा वाटला व काही प्रश्न असतील तसेच रोम बद्दल आणखी खोल माहिती हवी असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून सांगू शकता, अशी हि माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर हि करू शकता. धन्यवाद.

      📌🚩  खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp  वर मिळवण्यासाठी आजच  📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे  संपूर्ण नाव पाठवून " JOIN ME " असा  WHATSAPP MESSAGE पाठवा. !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने