Pan Card बद्दल संपूर्ण माहिती Online Apply कसे करावे ? || Infotainment


                 व्यक्तीचा जन्म झाल्यापासून त्याचा मृत्यू झाल्या नंतर देखील प्रत्येकाची नोंद शासकीय पद्धतीने फक्त कागदपत्रामुळेच होत असते. जन्म मृत्यू दाखल्या पासून ते Aadhar Card पर्यंत कित्येक कागदपत्र महत्त्वपूर्ण असतात. मात्र, या सगळ्यात सर्वात विशेष कागदपत्र म्हणजे Pan card . या लेखात आपण online pan card application कसे करावे ? आवश्यक असणारी pan card documents कोणती ? पॅन कार्ड म्हणजे काय व त्याचा उपयोग ह्या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Pan Card बद्दल संपूर्ण माहिती Online Apply कसे करावे ? || Infotainment
Pan Card बद्दल संपूर्ण माहिती Online Apply कसे करावे ? || Infotainment

                  PAN , अर्थात पर्मनन्ट अकाउन्ट नंबर ( Permenent Account Number ) हा फक्त एक साधा क्रमांक नसून ती प्रत्येक  भारतीय नागरिकाची ओळख आहे. या १० अंकी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षरे असतात. भारतीय आयकर कायदा, १९६१ अंतर्गत पॅन प्रत्येक भारतीयाला  दिला जातो. पॅन आयकर विभाग देतो. यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळांतर्गत देखील  तरतूद आहे. भारतीयांप्रमाणे पॅन परदेशी नागरिकांनाही देण्यात येतो. मात्र, त्यासाठी वैध व्हिसा आणि काही शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असते. खासकरून आर्थिक व्यवहार करताना पॅन असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा पॅन ही केवळ त्या विशिष्ट व्यक्तीचीच ओळख असते.

पॅनकार्डाचा उपयोग


                    आयकर विवरण (रिटर्न) भरताना, टीडीएस दाखवताना, टीडीएसचा परतावा मागताना, आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन लिहिणे गरजेचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडायचे झाल्यास, टेलिफोनची नवी जोडणी हवी असल्यास, मोबाइलचा नवा नंबर हवा असल्यास, परकीय चलन खरेदी करताना, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी जवळपास प्रत्येक व्यवहारासाठी आता पॅन असणे जरुरी आहे.

पॅनकार्ड दिसते कसे


                      २००१ पूर्वी देण्यात आलेली पॅनकार्ड हे  पांढऱ्या रंगाची  दिसत असत. त्यांना लॅमिनेशन करून घ्यावे लागे. ही कार्ड  अजूनही वैध आहेत. परंतु आता देण्यात येणारी पॅन कार्डे ही बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डांप्रमाणे प्लॅस्टिक कार्डच्या स्वरूपात असतात. या कार्डावर कार्डधारकाचा फोटो असतो, त्याची जन्मतारीख, पॅनकार्ड दिल्याची तारीख, पॅन क्रमांक आणि हॉलोग्राम स्टिकर असते. हॉलोग्राम स्टिकरमुळे या कार्डाला अतिरिक्त सुरक्षा प्राप्त होते. पॅन कार्डवर कधीही धारकाचा पत्ता दिलेला नसतो. परंतु, पॅनकार्डसोबत देण्यात येणाऱ्या पत्रावर मात्र संपूर्ण पत्ता छापलेला असतो .

Pan Card बद्दल संपूर्ण माहिती Online Apply कसे करावे ? || Infotainment
Pan Card बद्दल संपूर्ण माहिती Online Apply कसे करावे ? || Infotainment

                     अज्ञान किंवा १८ वर्षांखालील व्यक्तीला पॅनकार्ड घ्यायचे झाल्यास ते यूटीआय-आयटीएसएलकडून दिले जाते व त्यावर धारकाचा फोटो आणि जारी केल्याची तारीख नसते .

वरील माहिती तुम्हाला कोणीतरी सांगितली असेल अथवा माहिती असेलच मात्र खालील माहिती ही अजूनही अनेकांना माहिती नाहीये म्हणून ओपन चॅलेंज पॅन कार्ड बद्दल तुम्हाला हे माहितीच नसणार !पॅन कार्डचे पूर्ण नाव परमनंट अकाउंट नंबर असे आहे .

 पॅन कार्ड 10 अंक व  अक्षरांचा मिळून बनलेला (अक्षर + अंक) कोड आहे .

जो आयकर किंवा प्राप्तिकर, विभागाने जारी केला आहे .


 १) पॅन कार्डद्वारे तुमच्या सर्व व्यवहारांची माहिती आयकर विभागाला मिळते .

 तुमच्या बँकांमध्ये किती खाती आहेत याची पर्वा न करता पॅनकार्डाचा क्रमांक अनन्य आहे .

 एका व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड नंबर असू शकत नाहीत .


 २) टॅक्स ( कर ) ची चोरी रोखण्यासाठी आयकर विभागाने पॅनकार्ड अनिवार्य केले आहे .

 पॅन कार्ड क्रमांक " SIBDG3456K " असा असू शकतो .

यातील प्रत्येक अंक आणि अक्षराला त्याच्या स्थानानुसार विशिष्ट असा अर्थ खालीलप्रमाणे आहे :-


 ३) पॅन  कार्ड क्रमांकाचे पहिले पाच अल्फाबेट्स ( अक्षरे ) असतात तर त्यांनतर चार अंक व शेवटी एक अल्फाबेट असते.


४) पहिल्या ५ अल्फाबेट पैकी पहिले तीन अल्फाबेट A ते Z यांपैकी कोणतेही असू शकते .


५) ४ थ्या क्रमांकावरील अल्फाबेट हे

➤  कंपनी च्या नावासाठी
 " C ",

➤  कोणत्याही व्यक्तीसाठी " P ",

 फर्म साठी " F ",

➤  Hindu Undevided Family साठी "H",

 Association of Persons साठी "A" ,

➤ गव्हर्नमेंटसाठी "G".
इत्यादी.

  ६) पाचवा अल्फाबेट हे व्यक्तीच्या आडनावाचे आद्याक्षर असू शकते .


 ७) यानंतरचे आकडे हे ०-९ मधील (०००१ ते ९९९९) असतात .


 ८) पॅनकार्ड नंबरचे शेवटचे अल्फाबेट हे पहिल्या ९ ( अंक + अक्षर )  मिळून सूत्र वापरून काढलेले अक्षर असते .

चला आता हे pan card application / पॅनकार्ड मिळवावे कसे हे पण जाणून घेऊयात :-

पॅन क्रमांक घेणे हे ऐच्छिक आहे.
यासाठी एनएसडीएलच्या ( nsdl pan ) वेबसाइटवर online pan card application करता येतो.


NSDL च्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा - Pan card apply online 


pan card documents आवश्यक असणारी कागद पत्रे  :


1) या अर्जाबरोबर अर्जकर्त्याचे २ रंगीत फोटो 

2) ओळखीचा पुरावा ,

3) पत्त्याचा पुरावा 

4) जन्मदिनांक आणि शुल्क इत्यादी द्यावे लागतात.           याखेरीज यूटीआयच्या केंद्रांवरही छापील अर्ज भरून व त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून, योग्य ती फी देऊन online pan card application करता येतो. अर्ज केल्यापासून १० ते १५ दिवसांत पोस्टाने पॅनकार्ड घरी येते .

         मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण पॅन कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहिली तसेच ऑनलाइन एप्लिकेशन कसे करावे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे जाणून घेतले . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने