केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय || आरोग्यम || खासमराठी ||
               बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील वाढलेल्या प्रदुषणामुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. वृद्धांमध्ये असणारी समस्या आता तरुणांमध्ये पण दिसत आहे, केस पांढरे होणे केस गळणे केसामध्ये कोंडा होणे, अशा अनेक समस्या सध्या अनेक लोकांना दिसत आहेत. मात्र, तुमचे केस गळत असतील आणि तुमचे टक्कल  पडत असेल तर बिल्कुल घाबरू नका. कारण  आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत की  त्याने तुमची केस गळती थांबेल.                       

  सर्वप्रथम या समस्येबद्दल थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊ !  १) केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे केस गळती ही  अनेक कारणांमुळे होऊ शकते.

२) मोठी शस्त्रकीया किंवा गंभीर संक्रमण यांसारख्या प्रमुख शारीरिक तणावानंतर दोन ते तीन महिन्यांत केस गळू शकतात.

३) ठराविक औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील केस गळू शकतात.

४) बुरशीमुळं टकलावर संक्रमण होतं त्यामुळं केस गळून चट्टे पडतात.  मुलांमधे असे केस गळून चट्टे पडणं सामान्य आहे.

५) पुरुषाच्या आयुष्यात कोणत्याही वयात त्याची सुरुवात होऊ शकते, अगदी त्याच्या पौगंडावस्थेत देखील.
प्रामुख्याने  तीन घटकांच्या आंतरक्रियेमुळं टक्कल पडण्याची सुरुवात होत असते   :-

          अनुवांशिक धारणा.

          पुरुषी संप्रेरक.

          वाढतं वय.

६) सामान्य व्यक्ती  दररोज टकलावरचे 50 ते 100 केस गमावत असतो.  केस यापेक्षा अधिक प्रमाणात गळत असतील तर त्याला केस गळती आहे असे मानले जाते.

७) सामान्य पणे तणाव कमी करुन, चांगला आहार घेऊन आणि विचारपूर्वक हेयरड्रेसींगचं तंत्र वापरुन, आणि केसगळती न होऊ देणारी औषधं घेऊन काही प्रकारची केसगळती ही टाळता येऊ शकते.

८) अनुवांशिक पध्दतीनं येणारं टक्कल देखील काहीवेळा औषधांनी टाळता येऊ शकतं.

९) बुरशीच्या संक्रमणापासून होणारी केसगळती ही केस स्वच्छ ठेवून आणि आपली टोपी, कंगवे किंवा ब्रश इतरांसोबत न वापरुन टाळता येऊ शकते.

आता थोडसं अधिक प्रमाणात असे घरगुती उपाय जाणून घेऊयात जे कोणालाही करता येतील  :-

१. तुमचा आहार  चांगला असला पाहिजे. शक्य तितके जास्त  प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा.

२.  केव्हाही ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतरच  त्यावर कंगवा फिरवा.

३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.

४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास देखील याचा प्रचंड लाभ होतो.

५. तेल जास्ती गरम नसावे. कोमट असावे.

६. कांद्याचा रस लावावा आणि अर्ध्या  तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

7. शिर्षासन करावे .शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.

8. मुल्तानी माती लावावी. यामुळे केसांची चमक वाढते.

9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घालून दोन दिवसांनी काढूण वाटून घ्यावे . त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.

10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.

11. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.

12. अळशीच्या बिया खा.

13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय || आरोग्यम || खासमराठी ||
केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय || आरोग्यम || खासमराठी ||


14. केस कधी कधीच  धुतल्यावर  कमी गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने           तो पुसून टाका.

16. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.


    बाकी, योग्य व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप याने प्रत्येक आजारापासून दूर राहता येतच. हे सांगण्याची गरज नसतेच.


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने