खासमराठीचा खास ब्रेकफास्ट एकदा बनवून बघाच | Marathi Special || खासमराठी 

खासमराठीचा खास ब्रेकफास्ट एकदा बनवून बघाच || खासमराठी स्पेशल || खासमराठी ||
खासमराठीचा खास ब्रेकफास्ट एकदा बनवून बघाच || खासमराठी स्पेशल || खासमराठी ||


                     आपला आजचा विषय रोज सकाळी उठल्या उठल्या " आज नाष्ट्याला काय करू ?"  या प्रश्नाने त्रस्त असणाऱ्या प्रत्येक ताईसाठी आहे. खासमराठी स्पेशल मधील या खास आणि तितक्याच खमंग पदार्थाला ब्रेड पोटैटो बॉल्स असे म्हणतात .

खास ब्रेकफास्ट ब्रेड पोटैटो बॉल्स बनविण्यासाठी बघा खालील साहित्य लागते .

साहित्य :


४ ब्रेड

६ - ७ बटाटे

१ हिरवी मिरची

१ चमचे लाल तिखट

१/२ चमचे जिरे

१/२ चमचे बडीशेप

१/२ चमचे कोथिंबीर

आता सर्व साहित्य घेतल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे ते जाणून घेऊ.

कृती :


१) सर्व प्रथम बटाटे उकडून घ्या .

२) ब्रेड मिक्सर ला लावून बारीक करून घ्या .

३) एका बाउल मध्ये बटाटे कुस्करून घेऊन त्यामध्ये जिरे ,
     चवीपुरते मीठ आणि बडीशेप टाका .

४) हिरवी मिरची , लाल तिखट टाकून व ब्रेड चा चुरा मिक्स
     करून चांगलं मिश्रण करा .

५) एक गोष्ट लक्षात ठेवा यात पाणी घालायचे नाही .
खासमराठीचा खास ब्रेकफास्ट एकदा बनवून बघाच || खासमराठी स्पेशल || खासमराठी ||
खासमराठीचा खास ब्रेकफास्ट एकदा बनवून बघाच || खासमराठी स्पेशल || खासमराठी ||


६) कढईत तेल गरम करून घ्या .

७) आता मिश्रणाचे गोळे बनवून तळून घ्या .

८) चटणी आणि सॉस सोबत खाण्यास तयार
     ब्रेड पोटॅटो बॉल्स .


                    आम्ही हे करून पाहिले आहेत आणि खरेतर म्हणूनच तुम्हालाही हा चविष्ट आनंद मिळवता यावा म्हणून इथे सर्व सविस्तरपणे आम्ही सर्व प्रक्रिया सांगितली आहे... मग एकदा स्वतः करा व कसे वाटले ते आम्हालाही comment च्या माध्यमातून नक्की कळवा ! सोबतच ही सर्व माहिती आपल्या प्रत्येक मैत्रिणी सोबत share करायला विसरू नका ! कारण , आज न उद्या त्या तुम्हाला विचारतीलच की इतका खास पदार्थ बनवायचा तरी कसा !


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !



📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने