मुतखडा किंवा किडनीस्टोन असेल तर नक्की हे वाचाच || आरोग्यम || खासमराठी

मुतखडा किंवा किडनीस्टोन असेल तर नक्की हे वाचाच || आरोग्यम || खासमराठी
मुतखडा किंवा किडनीस्टोन असेल तर नक्की हे वाचाच || आरोग्यम || खासमराठी


       अत्यंत वेदनादायक असलेला आजार म्हणजे मुतखडा. अर्थातच किडनी स्टोन.वैद्यकीय भाषेत याला 'युरीनरी कॅल्कुलस' असे म्हटले जाते . लघवीसाचून राहिल्याने खडे बनतात व तेच नंतर त्रासाचे कारण बनतात , वेळेवर उपचार न केल्यास त्याचा आकार व संख्या वाढण्याची शक्यता असते.

       मूतखडा म्हणजे स्फटिकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक एसिड, ऑक्झॅलीक एसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व त्यांच्या मूत्रमार्गात अडथळा येतो .

किडनीस्टोनची लक्षणे :-


१) प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीवाटे रक्त पडते. लघवीला जळजळ होते .


२) पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या तीव्र वेदना होतात. मूत्राशयात आग होते  हि त्याची लक्षणे आहेत .

तपासणी :-


1)  मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते तर आर.एफ.टी. ही तपासणी किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताद्वारे केली जाते .


2) किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करणे महत्त्वाचे असते. तसेच गरजेनुसार एक्सरे, आय.व्ही.पी. सिटीस्कॅन, रिनल बायॉप्सी तपासण्या कराव्या लागतात .

धोका :-


1) किडनी स्टोन मुळे लघवी जाण्यास अडथळा होऊन साचून राहते त्यामुळे किडनीला इन्फेकशन होण्याची संभावना असते .

उपचार :-


1) मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच दररोज आठ ते १२ कप पाणी पिणे आवश्यक आहे .


2) प्रतिबंधात्मक व प्रभावी किडनी स्टोनवरील होमिओपॅथिक औषधोपचार अनेक रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत .


3) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे .


     तंत्रज्ञानाच्या बदलामुळे किडणीस्टोन बद्दल आधुनिक उपचार पद्धती देखील आल्या आहेत. त्यांचा देखील कमीत कमी त्रासामध्ये रुग्णांना लवकरात लवकर आराम देण्यासाठी मदत होत आहे ! अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मुतखड्याच्या शस्त्रक्रियांची उपचारपद्धती अत्यंत सोपी झाली आहे .


मुतखडा किंवा किडनीस्टोन असेल तर नक्की हे वाचाच || आरोग्यम || खासमराठी
मुतखडा किंवा किडनीस्टोन असेल तर नक्की हे वाचाच || आरोग्यम || खासमराठी

आधुनिक उपचार पद्धती : 1) लिथोट्रिप्सी पद्धत : 

     रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनिकंपनाने शॉक देऊन त्याचा चुरा केला जातो . हा खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यामुळे उपचारानंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगतात . या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज भासत नाही तसेच शरीरातील कोणत्याही अवयवावर जखम केली जात नाही .

2) परक्युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी :

     या उपचारपद्धतीमध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढतात. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी योग्य आहे .

3) युरेटेरोस्कोपी : 

    मूत्रवाहिनीत साचलेले खडे युरेटेरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे काढता येतात.  पण हि उपचार पद्धती त्रासदायक असते .


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने