पोलिस भरती Police Bharti 2019 शारीरिक क्षमता चाचणी  बद्दल संपूर्ण माहिती | Spardha pariksha || Khas Marathi

                 यावर्षी पासून जरी पोलिस भरती 2019 साठी लेखी परीक्षा आधी आणि नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार असली तरी लेखी परीक्षेइतकीच  शारीरिक क्षमता चाचणी महत्वाची होती आणि राहील देखील ! चला तर मग जाणून घेऊया शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेची तयारी कशी कराल ते!

www.khasmarathi.com
पोलिस भरती Police Bharti 2019 शारीरिक क्षमता चाचणी  बद्दल संपूर्ण माहिती | KHASMARATHI


              शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती


   #NOTE :- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.

शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

 सर्वप्रथम हे लक्षात घ्या की,  शारीरिक चाचणी देण्यासाठी देखील पात्रतेचे काही निकष काही अटी असतात !

   त्यात देखील पात्रतेसाठी पुरुष व महिला उमेदवारांसाठी वेगवेगळ्या अटी असतात, सर्वप्रथम आपण त्यांचा  विचार करुया!

   या  वरील अटी पूर्ण करू शकणारेच ही शारीरिक क्षमता चाचणी देऊ शकतील ! आता ही परीक्षा कशी असेल ते जाणून घेऊयात :-

   पोलीस भरती अथवा कोणतीही स्पर्धा परीक्षा आपली स्पर्धा ही फक्त आपल्यासोबतच असते.
     
   तर... बारकाईने विचार केल्यानंतर तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी साठी एकूण २ गोष्टी साठी तयारी आणि प्रचंड सराव करावा लागणार आहे ,


त्या म्हणजे गोळाफेक आणि धावणे....

   या धावण्यात पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे दूर पर्यंत ( 1600 मी. ) धावणे आणि दुसरा प्रकार कमी अंतर  ( 100 मी. ) मात्र शक्य तितक्या वेगात धावणे !

   तुम्ही महिला असाल अथवा पुरुष दोघांना पण दररोज  शारीरिक क्षमता चाचणीसाठी व्यायामासोबतच धावणे आणि गोळा फेक करण्याचा सराव करावाच लागेल!

   तर चला आपण या दोन्ही प्रकारांबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन घेऊ.


1. गोळाफेक :-


   खरे तर गोळाफेक हा एक वैयक्तिक प्रकारात मोडला जाणारा मैदानी खेळ आहे, सर्वप्रथम या खेळाची सुरुवात आयर्लंड मध्ये झाली. सहसा आपल्याकडे वापरला जाणारा गोळा हा लोखंडी असतो. मात्र, पितळी देखील असू शकतो.

   पुरुष गटासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याचे वजन हे 7.26 किलोग्रॅम असते. ज्याचा परीघ 110 ते 130 मिलीमीटर इतका असतो.

   तर महिला  गटासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याचे वजन हे 4 किलोग्रॅम असते. ज्याचा परीघ 95 ते 110 मिलीमीटर इतका असतो.

   7 फूट(2.135 मी.) व्यासाच्या वर्तुळातून गोळाफेक करायची असते. या वर्तुळमध्यातून 40 अंशांचा कोन असतो. या कोनातच गोळा फेकायचा असतो.
   स्पर्धकाने एकदा गोळा घेऊन वर्तुळात प्रवेश केला की तो वर्तुळातून बाहेर जाता कामा नये.

   जर तो वर्तुळाबाहेर गेला तर तो फाऊल (नियमभंग) होतो. एकदा गोळा फेकल्यावर व जमिनीवर पडल्यावर स्पर्धकाने वर्तुळाच्या मागील भागातूनच बाहेर पडले पाहिजे.

   वर्तुळातून गोळा हा विशिष्ट कोनातूनच फेकावा लागतो. त्यात गोळ्याची पकड, पायांच्या विशिष्ट हालचाली व गोळाफेक व पायांची अदलाबदल असे तीन टप्पे गोळाफेकीत असतात.
     
   पायांच्या हालचालीतही दोन प्रकार असतात. एक घसरण्याची व दुसरी लंगडण्याची क्रिया. त्यावेळी गोळा हा विशिष्ट पद्धतीने हातात धरून गळपट्टीच्या (मानेजवळ) हाडाजवळून फेकावा लागतो.

   नेमकं झटका द्यायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या मित्रानो, भरपूर लोक गोळा आऊट ऑफ फेकण्यामध्ये फेल होतात.
   
   तर सर्वप्रथम स्वतःला कमजोर समजू नका, भारभक्कमच  शरीरयष्टी असण्याची गरज बिलकुल देखील नसते.
   
   बारीक किंवा सडपातळ अगदी 50-55 किलो वजन असणारे अनेक जण देखील गोळा औटऑफ फेकू शकतात.
     
   त्या माणसाच्या शरीरामध्ये ताकद आणि झटका द्यायची क्षमता, आणि आत्मविश्वास असला पाहिजे.

   सुरवातीच्या अथवा तुम्ही नवीन असाल प्रथमच गोळा फेक करत असाल तर या  काळात गोळा फेकण्याची पद्धत स्टेपिंग माणसाला जमत नाही.  त्यामुळे अशा मित्र मैत्रिणींनी  विना गोळा पकडता काही दिवस स्टेपिंग ची प्रॅक्टिस करावी .

   त्यामुळे असे होईल कि तुमचा फाऊल कधीच होणार नाही आणि गोळा जास्त लांब जाईल .

   गोळा फेकताना हात सरळ रेषेत असल्यास 4 ते 6  गुण वाढतात.
     
   गोळा फेकण्याचा सुरुवातीला कमीत कमी 15 दिवस जागेवरून गोळा फेकावा. असे केल्याने आपल्याला गोळ्याचे वजन समजतं आणि एकदा का गोळ्याचे वजन समजलं की हळूहळू  शरीराला त्याची सवय होऊन जाते त्यानंतरच स्टेपिंग कडे वळा.

   तर अश्या प्रकारे तुम्ही गोळाफेक चा सराव करू शकता.


2. धावणे.

   धावण्याच्या सरावासाठी तुम्हाला सर्वात जास्त वेळ द्यावा लागू शकतो. अगदी भरतीच्या जाहिरातीच्या काळापासून तुम्हाला धावण्याच्या तयारीचा सराव करायला सुरुवात केली पाहिजे.

   अगदीच सुरुवातीच्या टप्प्या पासून सराव करणार असाल तर रोज घड्याळ लाऊन 100मीटर , 200 मीटर, 400 मीटर जलद रित्या धावण्याच्या सराव करावा.

   या साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमचा Stamina टिकवून ठेवण्यासोबतच हळूहळू वाढवावा लागतो!

   यासाठी मोड आलेली कडधान्या सोबत शक्य तितक्या सकस आहाराचा वापर करणे कधीपण उत्तम !

   धावण्याच्या सरावासोबत जिने चढण्याचा सराव देखील धावण्याच्या चाचणीत उपयोगी येईल.

   अनेक जणांसारखा सकाळचा सराव करणे उत्तमच, परंतू नंतर नंतर दुपारी देखील सराव करणे चालू करा, कारण धावण्याच्या चाचण्या ह्या अनेकदा दुपारीच घेतल्या जातात. यात ज्यांनी उन्हात देखील सराव केलेला असतो त्यांना ही परीक्षा सोप्पी जाते.... म्हणतात ना, "शांततेच्या काळात जितका घाम गाळाल तितकं युद्धाच्या काळात कमी रक्त सांडाव लागतं!" हे असाच प्रकार आहे!

   सराव करताना शक्य तितक्या योग्य बुटांचा वापर करावा, चाचणी दरम्यान दम वाढू नये यासाठी सरावात चढावर तसेच गोलाकार मैदानात धावण्याचा देखील समावेश असावा.

   थकवा जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

   अशात पण शारीरिक क्षमता वाढवू व टिकून राहावी याकरिता 30-40 मिनिटे जलद चालणे, 11 सूर्यनम्कार, 30 दंड व 50 बैठका हा पूरक व्यायाम देखील तितकाच आवश्यक आहे.

   पुरुषांना चाचणी दरम्यान 1600 मी. तसेच 100 मी. अंतर पूर्ण करताना लागणाऱ्या वेळेनुसार गुण दिले जातात.

   1600 मीटर अंतर 5 मिनिटे 10 से. किंवा त्यापेक्षा कमी वेळात पूर्ण केल्यास उमेदवाराला पूर्ण गुण देण्यात येतील, म्हणून तुमचं टार्गेट हे 5 मी. 10 से. च्या आत च ठेवा.

   सर्वात महत्त्वाचा व खडतर भाग 100 मिटर अंतर 11.50 सेकंदात पूर्ण करणाऱ्यांना पूर्ण गुण देण्यात येतील. हे 11.50 सेकंद तुम्हाला तब्बल 10 गुण देऊन जातील! त्यामुळे दोन्ही प्रकारची तयारी मन लावून करा!!

   महिलांना 800 मिटर अंतर 2 मी. 40. से. जीव त्यापेक्षा कमी वेळात पूर्ण केल्यास पूर्ण गुण देण्यात येतील.

   तसेच 100 मिटर चाचणीत पूर्ण गुण मिळवण्यासाठी महिलांना 14 सेकंदाच्या आत 100 मिटर अंतर पूर्ण करणे आवश्यक राहील.

 
     सरावा सोबत आहार व आराम हे देखील तितकंच महत्त्वाचं, चाचणीच्या आदल्या दिवशी शरीराला आराम द्या व चाचणी दिवशी चाचणी सुरू होण्या अगोदर एकदा वॉर्म अप सराव नक्की करा.

   शारीरिक चाचणी ही जिल्हा केंद्राच्या ठिकाणी घेतली जाते, त्यामुळे उमेदवार 2-3 तास किंवा त्याहून जास्त प्रवास करून आलेले असतात.
 
   अश्या वेळी पाण्याची सोय खोळंबण्याची शक्यता लागून राहते. म्हणून सोबत पाणी, ग्लूकोज, फ्रूट ज्यूस सोबत ठेवावे.
 
   तसेच आपल्याला मिळालेली चाचणीची वेळ व प्रत्यक्ष वेळ यात काही तासांचा फरक पडू शकतो यामुळे सोबत खाण्यासाठी कायतरी ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते.
 
   कारण चाचणीची वेळ येईपर्यंत भूक तीव्र लागलेली असते. चाचणीच्या परिसरात खाण्याची व्यवस्था असणे व ती व्यवस्था चांगली असणे याची शक्यता खूप कमी असते अश्यात उपाशीपोटी धावल्याने चक्कर येणे, बेशुद्ध होणे असे प्रकार सर्रास होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने