पोलिस भरती Police Bharti 2019 बद्दल संपूर्ण माहिती | Spardha pariksha || Khas Marathi
बहुप्रतिक्षित असलेल्या महाराष्ट्र विभागाच्या सर्व जिल्ह्यात आता महाराष्ट्र पोलिस भरती 2019 ची सुरुवात शासनातर्फे अखेर सुरू करण्यात आली आहे.

         या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई आणि कारगृह शिपाई पदासाठी एकूण 3450  जागा उपलब्ध आहेत.

        ऑनलाईन अर्ज 3 September सप्टेंबर 2019 पासून ते  23 सप्टेंबर 2019 करायचे होते.

       ही पोलिस भरती महापरिक्षेअंतर्गत घेण्यात येणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज महापरिक्षेच्या पोर्टलवर भरले असतीलच.


     खासमराठी या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक व लेखी चाचणी अशा परीक्षे संदर्भात सर्व एकूण एक माहिती व मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत ..... !

2019 पोलिस भरती सविस्तर माहिती

विभाग :-          महाराष्ट्र पोलीस विभाग

रिक्त पदे :-  

शिपाई जागा
पोलीस शिपाई 3357 जागा
कारागृह शिपाई 93 जागा


वेतनश्रेणी :-
5200 ते 20200 रु.(ग्रेड पे – 2000 रु.) विशेष वेतन 500 रु. व इतर.

अर्ज भरण्याची पद्धत :-  ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ :-   mahapolice.gov.in

आवश्यक सूचना :-

एका उमेदवाराने एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करणे याची तरतूद केलेली असल्यामुळे दोन वेळेस रजिस्ट्रेशन करून दोन जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये, असे आढळल्यास दोन्ही अर्ज बाद केले जातील.
अर्ज करताना मात्र तुम्ही पोलिस शिपाई व कारागृह शिपाई या दोन पदांसाठी वेग वेगळ्या जिल्ह्यांची निवड करू शकता.

परीक्षा शुल्क :-
उमेदवार शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवार 450 ₹
मागासवर्गीय उमेदवार 350 ₹

आवश्यक शारीरिक क्षमता :-

लिंग उंची छाती
पुरुष 165 सेमी (कमीत कमी) छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला 155 सेमी (कमीत कमी) लागू नाही
शैक्षणिक पात्रता :- 12वी पास.

वयोमर्यादा:- 
वर्ग वर्ष
खुल्या प्रवर्गातील उमेदवार 18 ते 28 वर्ष
मागासवर्गीय उमेदवार 18 ते 33 वर्ष


लेखी परीक्षा :-

सर्वप्रथम सर्वप्रथम उमेदवारांची मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.
100 गुणांच्या लेखिपरिक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.

विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण

शारीरिक चाचणी :-

शारीरिक चाचणी देण्याकरिता लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असणार आहे.


शारीरिक चाचणी (पुरुष)

कृती गुण
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण

शारीरिक चाचणी (महिला)

कृती गुण
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने