शून्यातून जग निर्माण करता येते..... !






वाळूचे कण रगडता तेल हि गळे.... !

       हो मित्रांनो हे अगदी खरे आहे पण याचा शब्दशः अर्थ वास्तवाशी जोडू नका . या जगात अशक्य असं काहीच नाही . वरील म्हणीत एक अनमोल संदेश दडला आहे , तो आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्यात लागू करता आला पाहिजे आणि तस झालं तर त्याहून सफल काहीच नसेल . काहीजण या म्हणीचा अर्थ वास्तवाशी जोडून विचार करतील कि ,"वाळूचे कण रगडल्यावर तेल ही गळते ? " आणि हसून सोडून देतील ,खर तर त्या म्हणीतील अनमोल विचार आपल्याला सांगतोय किती ही अपयश आले तरी खचून जाऊ नका ,वारंवार प्रयत्न करा ,प्रयत्न करत राहिल्याने तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल ,आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्ही अपयशाला हारवाल व विजेते बनाल ...!

        माणूस आपल्या आयुष्यात खूप स्वप्न पाहतो पण त्या स्वप्नांच्या मागचा पाठलाग करताना कधीच दिसत नाही आणि मग नशिबाला दोषी ठरवून साधं त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न देखील करत नाही इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती अशी कि ,स्वप्न बघणारे सर्वच लोक विजेते बनत नसतात पण  विजेत्या लोकांनी स्वप्ने पाहिलेली असतात. इथून असं कळत कि माणसाने स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे , त्यासाठी अहोरात्र झटल पाहिजे आणि तुम्ही हे जेव्हा कराल ना तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही विजेते बनण्यापासून , तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल आणि तुम्ही सर्वांना गर्वाने सांगू शकाल " हो मी करून दाखवलं .....! " 

         खूप अशी लोक आहेत जी आपल्या परिस्थितीला दोष देतात खर तर त्यांना दोष देऊन काहीच निष्पन्न होणार नाहीये . चीन मधील अलीबाबा ग्रुप चे संस्थापक जॅक मा यांनी खूप अनमोल विचार मांडलेत ते सांगतात कि , माणसाकडे पैशाची कमी कधीच नसते , कमी असते ती आत्मविश्वास आणि ध्येयपूर्ती साठी नेहमी झटत राहणॆची .

          गुजराती लोकांबद्दल खूप काही सांगितलं जात जस कि  , एक गरीब मुलगा फारच थोडे पैसे घेऊन मुंबई ला काही तरी काम मिळेल या उद्धेशाने येतो . एका कंपनीला भेट देतो तेथील अधिकारी त्याला त्याचा ई-मेल विचारतात आता हा घाबरतो कारण ई-मेल हा शब्द त्याने पाहिल्यांदाच ऐकलेला असतो तो म्हणतो ई-मेल नाहीये मग अधिकारी सांगतात काढून आणा . तो तिथून बाहेर पडतो सर्वाना विचारतो कि ई-मेल कुठे राहतो लोक त्याला खुळ्यात काढतात पण एक विद्यार्थी त्याला सांगतो. तो त्या नेट कॅफे मध्ये जातो पण आता पैशे खर्च झालेले असतात त्यामुळे त्याला ई-मेल काढता येत नाही , तो पुढे चालत राहतो एक भाजी मंडई येते व त्याला एक युक्ती सुचते . तो त्या पैशाची भाजी खरेदी करतो व घरोघरी जाऊन विकतो पुढे भाजी मंडईत त्याला स्थान मिळत . दिवस रात्र परिश्रम करु लागतो .काही काळानंतर भाजीमंडईचा दलाल बनतो असे करत करत बिजनेस उभा होतो . एक कंपनी त्याचाशी बिजनेस मीटिंग करायला येते , कंपनीचे अधिकारी त्याचाकडे ई-मेल मागतात तेव्हा तो म्हणतो " साहेब जर मी ई-मेल बनवला असता तर आयुष्यात इतका सफल कधीच झालो नसतो ....शून्यातून जग निर्माण करता येते ....! "

           शून्याला (०) फार किंमत आहे फक्त तुम्हाला त्या पुढचा एक (१) बनायचे आहे. जगातील सर्वात यशस्वी कंपनी म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या 'गुगल'  कंपनीचे खरे नाव गुगोल असे होते .गुगोल हि गणितातील संज्ञा असून तिचा असा अर्थ होतो कि एका (१) मागे शंभर (१००) शून्य . आपणांस जन्म दुसर्याने दिला ,पालन पोषण दुसर्याने केले ,शिक्षण दुसर्याने दिले तर मग या जीवनाचा काय उद्देश असावा ? खऱ्या जीवनाचा उद्देश हा आहे कि आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे . स्वतःची एक ओळख बनवली पाहिजे आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावरून जाताना हार कधीच मानली नसली पाहिजे .चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो , संयम पाळा, विजय तुमचाच आहे.

           प्रेरक वक्ते 'संदीप माहेश्वरी ' यांनी देखील जगनिर्माण करण्याच्या म्हणजेच सफल होण्याचे  काही मार्ग सांगितले आहेत. जसे कि ,जसा तुम्ही विचार करता तस तुम्ही घडत असता त्यामुळे नेहमी स्वतःला सकारात्मक विचारांशी जोडून घ्या .आयुष्यात खूप चढउतार आहेत त्याचा अनुभव घ्या ,छोट्या अपयशाने खचून जाऊ नका , प्रत्येक वेळी जिद्द आणि चिकाटीने लढा द्या . कोणतंही काम करताना अंतर्मनातून आवाज आला पाहिजे ,"किती सोप्प आहे ,तुला हे जमेल , मागे वळून पाहू नको ,तुला जिंकायचे आहे .... ! "

            जर शून्यातून जग निर्मांण करता आले तर आयुष्याचे सोने झाल्यासारखे आहे . फार अशी लोक आहेत  ज्यांनी गरिबीतून वाट काढली आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या जिथे दोन वेळच्या खाण्यासाठी काबाडकष्ट करावे लागते अशी गरीबी असणाऱ्या घरापासून ते भारताचे राष्ट्रपती बनण्या पर्यंतचा खडतर प्रवास म्हणजे शून्यातून जग निर्माण करणे होय. 


          

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने