विरगळी आणि स्मृती स्तंभ  परळी सज्जनगड जिल्हा सातारा

गळी आणि स्मृती स्तंभ  परळी सज्जनगड जिल्हा सातारा|sajjangad satara
गळी आणि स्मृती स्तंभ  परळी सज्जनगड जिल्हा सातारा|sajjangad sataraकेदारेश्वर मंदिर प्रांगणात जवळपास ५५ विरगळी व सती शिळा मांडून ठेवलेल्या आहेत.

वीरगळ ही स्मृती शिळा असून युध्द , गोधनाचे रक्षण किंवा धार्मिक विधीसाठी 

बलिदान देणाऱ्या वीरास मरण आले तर त्याच्यां स्मृती प्रीत्यर्थ स्मृती स्तंभ किंवा वीरगळ उभारण्यात येत असे . त्या मुळे पुढच्या पिढीलाही  लढण्याची, बलिदान देण्याची प्रेरणा मिळत असे. 

वीरगळ ही आयताकृती दगडावर चौकटी मधे कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्यामुळे योध्याला वीर मरण आले ते दर्शविलेले असते. यात मृत्यू पावलेला वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, जंगली श्वापदासी लढतांना किंवा शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरां  बरोबर  स्वर्गात घेऊन जात असल्याचे व तो स्वर्गसुख उपभोगत आहे असे दाखविलेले असते. त्या पुढील चौकटीत  वीर एकटा किंवा सपत्नी शिवलिंगाची  पूजा करतांना दाखवलेले असते 

वीर पति बरोबर सती जाणार्‍या स्त्रियांच्या स्मरणार्थ सती शिळा उभारण्यात येत असत . आपल्या कडे आढळ्णार्‍या सती शिळां मध्ये स्त्रीचा खांद्या पासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो व  हातात बांगड्या असतात. सर्वसाधारणपणे सती शिळा या मंदिर परिसरात ठेवलेल्या असतात . वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन  चौकटीत सती शिळेचे शिल्प कोरलेले असते.

या विरगळी व सती शिळेचे उन,वारा व पाऊस या पासून जतन व संवर्धन व्हायला हवे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने