11 फेब्रुवारी 2010 रोजी वकील शाहिद आझमी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

शाहिद आझमी चा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता.तो मुळ रूपाने आजमगढ,उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता..लहानपणी त्यांच्या वडिलांचा छत्र त्याने गमावलेला असल्याने तो व त्याचे भावंड त्याच्या आईसोबत राहत होते...शाहिद जेव्हा १४ वर्षाचा होता तेव्हा त्याच्यावर १९९२ च्या दंग्यात हिंसा करण्याच्या आरोपा लावून त्याला गोवंडी येथील पोलिसांनी अटक केली.पण त्या विरुद्ध काही पुरावे नसल्यामुळे त्याला सोडण्यात आले ..तो समाजातील द्वेष आणि जातीयवाद पाहून थोड्या काळासाठी POK मधील लढाऊ प्रशिक्षण शिबीरामध्ये शामिल झाला. पण तेथे पाहिलेल्या अतिरेकीपणामुळे तो लवकरच परत आला.
१९९४ मध्ये त्याच्यावर काही हिंदू-नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावून त्यांना (TADA )च्या अंतर्गत अटक करण्यात आली..त्याचा निर्दयपणे छळ करण्यात आला व कधीही न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास त्याला भाग पाडलं..यामुळेच त्याला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली व दिल्लीच्या तिहाड जेल मध्ये पाठवण्यात आलं. तिहाड मध्ये असतानाच शाहिदने महाविद्यालयीन अभ्यास सुरू केला आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सर्जनशील लेखनात पूर्ण केलं.
TADAच्या आरोपातून सुटल्यानंतर त्याने मुंबईत कायद्याच शिक्षण पूर्ण केलं आणि कायद्यात LLM ची पदवी मिळवली..पदवी घेतल्यानंतर काही महिने त्याने Defence Lawyer माजिद मेमन याच्याबरोबर काम केले. व नंतर त्याच्या नैतिक मूल्यामुळे मेमन ला सोडून शाहिदने आपली स्वतःची Practice सुरू केली..लवकरच त्याने मुस्लिमांवर( POTA )अंतर्गत लावलेले केसेस घेण्यात सुरुवात केली व अनेक खटले त्याने लढले. पण त्याला मोठा विजय मिळाला २००२ मध्ये घाटकोपर बस बॉम्बस्फोटच्या प्रकरणात. POTA च्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व मुख्य आरोपी समजल्या जाणाऱ्या आरिफ पानवाला या इसमास इतर ८ जणांसह पुरावे नसल्यामुळे निर्दोष सोडण्यात आले.
हे कार्य करत असताना अशातच शाहिद ला फोन वर जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या होत्या.पण याचा त्याच्यावर काही विशेष प्रभाव पडला नाही. तो (POTA) अंतर्गत वंचीत मुस्लिम आरोपींचे खटले घेतच राहिला..पिडीताकडून त्याने खूपच कमी फी आकारली ..कायद्याच शिक्षण घेण्याचं त्यांचा उद्देश्यच हा होता की त्याच्यासोबत जे घडलं ते इतरांच्या सोबत घडू नये..कमीत कमी पैसे घेऊन न्याय मिळून देणे हाच त्याचा एकमात्र लक्ष्य होता..
पुढे शाहिदने ७/११ मधील मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट,२००७ मधील औरंगाबाद Arms Haul,२००६ मालेगाव ब्लास्ट मधील आरोपींचे प्रतिनिधित्व केले..MOOCA वापर करण्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली व ..२००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या ३ ही खटल्यांना स्थगिती दिली..
जुलै २००८ मध्ये शाहिदने जनहित याचिका दाखल केली व आर्थर रोड कारागृहात आरोपींचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप केला.कोर्टाने चौकीशीचे ऑर्डर दिले व हे आरोप खरे ठरले ..त्याने बचाव केलेल्या शेवटच्या घटनांमध्ये २६/११ हल्ल्यातील आरोपी फहिम अन्सारीची होती परंतु निकाल येण्याच्या अगोदरच शाहिदची निर्घृण हत्या करण्यात आली.११ फेब्रुवारी २०१० रोजी कुर्ला येथील टॅक्सी मेन कॉलनी येथील कार्यालयात ४ बंदुकधारकांनी त्याच्या कार्यालयात घुसून त्याला गोळ्या घातल्या.जखमी शाहिदला घटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मूर्त घोषित केले ...शाहिदच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने कायद्याची पदवी पूर्ण केली आणि तो आपल्या भावाचे अभियान पुढे चालवत आहे...
१९ ऑगस्ट २०१२ रोजी काही पुरावे नसल्यामुळे फहिम अन्सारीला सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप मुक्त केले होते...व येथे सुद्धा शाहिद आझमीची मोठी जीत झाली.
शाहिद हा खूप धैर्यवान माणूस होता.त्याच्या जीवनाकडे बघून हा विश्वास होतो की खरंच माणसामध्ये माणुसकी अस्तित्वात आहे..त्याने Pota अंतर्गत १८ निर्दोष मुस्लिमांचे प्राण वाचवले..आपली जीवाची जरा सुद्धा काळजी घेतली नाही किंवा कोणाला घाबरला नाही.त्याने त्यांच्या कार्याचे खूपच कमी शुल्क आकारले ..तो नैतिक मूल्यांचे इतर वकिलांना प्रेरणा देणारा व्यक्ती होता..
आज 12 वर्षे झाले शाहिद सरांची हत्या होऊन..
त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच..

शाहिद आझमी बद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. तो एक Unsung हिरो आहे.त्याच्या एकंदरीत जीवनावर हंसल मेहता यांनी शाहिद नावाचा चित्रपट सुद्धा बनवलेला आहे.या चित्रपटात राजकुमार राव या अभिनेत्याने शाहिद आझमीची भूमिका साकारली आहे..जमलं तर नक्कीच शाहिद हा चित्रपट नक्की बघा..💜
©Moin Humanist✍️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने