डियर तुकोबा ।  DEAR TUKOBA -Vinayak Hogade।BOOK REVIEW 


डियर तुकोबा
जगतगुरु तुकोबा माझ्यासाठी खरे मोटिवेशनल स्पिकर आहेत.तुकोबाच्या प्रत्येक अभंगात ऊर्जा आणि प्रेरणा असते.म्हणूनच मी वेळोवेळी तुकाराम बावांच्या अभंगाची गाथा व तात्यांनी लिहलेलं विद्रोही तुकाराम चाळत असतो.यातून मला कायम जगण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा आणि हिम्मत मिळत असते..शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महान विभूतीचे विचार आज सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत, जेवढे त्याकाळात होते..
म्हणूनच "तुका आकाशा एवढा" आणि "तुका आशेचा किरण "म्हणतात ते उगाच नाही.
तर हे सर्वकाही सांगायचं कारण हे की,
मी काही दिवसांपूर्वी विनायक दादा लिखित
"डियर तुकोबा"या एका आगळ्या वेगळ्या आणि शानदार पुस्तकाचा प्रवास पूर्ण करून आलो.आणि नेहमीप्रमाणे या पुस्तकाच्या सुद्धा प्रेमात बुडालो.(यावेळी अपेक्षेप्रमाणे जास्तच.)
काहीतरी सुंदर आणि अप्रतिम वाचल्याची प्रचिती हे पुस्तक वाचून मला आली..जणू मी 'तुकोबाच्या' सानिध्यात वावरून आलोय असं मला वाटतंय.यामध्ये रेखाटलेल्या अप्रतिम अश्या चित्रांतून मला तुकोबा डोळ्यांनी बघून आल्यासारखं वाटतंय.पहिल्या 'पृष्ठापासून तर शेवटच्या पृष्ठापर्यत' खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकाच्या प्रत्येक पानात व शब्दांत गोडवा आहे.
वाचकाच्या मनावर भारुड करून जाणाऱ्या या पुस्तकातून खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळतं.
जगतगुरु तुकाराम महाराजांबद्दल आतापर्यंत खूप काही लिहलं गेलं आहे.पण "डियर तुकोबा" या पुस्तकातून विनायक दादांनी ज्या वेगळ्या दृष्टीकोनातून आणि कमालीच्या निरिक्षणातून तुकाराम महाराज वाचकांसमोर मांडले आहेत ते खरंच भन्नाट आहे.माझ्यासारख्या तरुणांना तुकोबांच्या अजूनही फार जवळ आणण्याचं आणि तुकारामांना खऱ्या अर्थाने समजून,उमजून घेण्यासाठी प्रेरित करण्याचं महत्वपूर्ण काम या पुस्तकाने केलं आहे,यात मात्र तिळमात्र शंका नाही.अगदी साध्या, सोप्या भाषेत ज्यापद्धतीने डियर तुकोबाला वाचकांसमोर मांडण्यात आलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे.21 व्या शतकातील एका तरुणाने जगतगुरूंना "डियर तुकोबा"या प्रेमळ नावाने हाक मारून,एकूण तीन भागात साधलेला हा संवाद वाचकांना अंतर्मुख करणारा आहे तर विचार सुद्धा करायला भाग पाडणारा आहे.तुकोबांचे विशाल आणि अफाट व्यक्तिमत्त्व या पुस्तकातील पानापानातून अधोरेखित होते.

रंगनाथ पठारे सर म्हणतात :-
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात लेखकांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे.
रंगनाथ सरांनी नेमकं आणि मोजक्या शब्दांत या पुस्तकाचं वर्णन केलेलं असून जे प्रत्येक वाचकाला हे पुस्तक वाचायला प्रवृत्त करणारं आहे.♥️
नक्की नक्की वाचा...♥️🌿
©️Moin Humanist✍️
सतिश काळसेकर सर लिखित वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तकावरील पुस्तके (Books on Books) या प्रकारात मोडणारं पुस्तक आज दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.काही पुस्तके अशी असतात जी एकदा वाचून मन भरत नाही तर ती परत परत वाचावी लागतात.त्या पुस्तकाच्या यादीत हे पुस्तक मला आवर्जून ऍड करावं वाटतं.  पूर्ण  वाचण्यासाठी क्लीक करा :-https://www.khasmarathi.com/2022/12/vachnaryachi-rojnishi-book.html

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने