बलुतं -दया पवार । BALUT BOOK REVIEW 

बलुतं -दया पवार । BALUT BOOK REVIEW

                 बलुतं -दया पवार । BALUT BOOK REVIEW



12 वीत असताना मी सर्वप्रथम दलित साहित्य वाचायला घेतलं होतं.(मला साहित्याचे वर्गीकरण करणे आवडतं नाही.)त्यामध्ये उपरा,कोल्हाट्याच पोरं, आमचा बाप आणि आम्ही,अक्करमाशी,उचल्या आणि बलुतं इत्यादी काही पुस्तके प्रामुख्याने होती.तेव्हा माझी वैचारिक प्रगल्भता म्हणा किंवा समजून घेण्याची कुवत म्हणा एवढी नव्हती.पण तरीही मला या साहित्याने आतून हेलावून सोडलं होतं..
जेव्हा मी सर्वप्रथम "बलूतं" वाचलं होतं तेव्हा यातील " दगडू " आजूबाजूला बघितलेला आणि अनुभवलेला मला वाटतं होता आणि आतासुद्धा तो मला जाणवत असतो..
यामुळेच की काय आता परत एकदा बलुतं चाळावं आणि दगडू ला भेटून यावं असं वाटलं..
पु.ल देशपांडे म्हणतात :-
ह्या पुस्तकाला अनेक ठिकाणी फाटलेल्या आणि ठिगळा-ठिगळांनी जोडलेल्या गोधडीचे वेष्टनचित्र आहे. अन्न, वस्त्र, निवारा या बाबतींतच नव्हे, तर क्षणोक्षणी भावनांच्या सुद्धा चिंध्या चिंध्या होत जाणारे आयुष्यच जिथे ठिगळा-ठिगळांनी जोडत जावे लागते, अशा जीवनाची ही सत्यकथा आहे. असली ही जीवनपोथी उत्तम भोजनोत्तर किंवा उत्तम भोजनाची खात्री असल्यामुळे श्रवणसौख्यात भर घालणाऱ्या देव-देवतांच्या, लीलामृतांच्या धार्मिक पोथ्यांना असतात, तसल्या रेशमी सोवळ्यात कशी बांधली जाणार? तिला गोधडीबांधणीतच गुंडाळणे शक्य आहे. वेष्टनावरची ती गोधडीच पहिला धक्का देऊन जाते. स्वत:ला स्पृश्य किंवा सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या मानवी जीवनाच्या किती प्रकारांनी चिंध्या करीत असतो, याचे या वेष्टनापासूनच सूचक दर्शन घडायला लागते. पण हे दर्शन घडवणारा दगडू कुठेही स्वत:बद्दल अनुकंपा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत नाही. हे ह्या कहाणीचं सर्वात मोठं यश आहे, हे सुरुवातीलाच नमूद करून ठेवायला हवं. दगडू पवार शिष्ट समाजाच्या करूणेची भीक मागायला उभा राहिलेला नाही. उलट, ही कथा वाचून संपल्यावर आपण देश, धर्म, संस्कृती, समाज, सुधारणा, प्रबोधन वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो, याचाच पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही, आणि आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते.



 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने