पावनखिंड मराठी मुवि रिव्हिव्ह | Pavankhind marathi movie review


pavankhind marathi movie review
pavankhind marathi movie review


हे शीर्षक प्रामुख्याने द्यायचं कारण म्हणजे - *पावनखिंड*
दिगपाल लांजेकर लिखित दिग्दर्शित व चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, प्राजक्ता माळी व मृणाल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला हा प्रदीर्घ काळापासून तयार असलेला पण आता योग्य वेळेला प्रदर्शित झालेला असा *पावनखिंड* (Pavankhind marathi movie )शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आलेला हा चित्रपट सध्या महाराष्ट्र भर धुमधडाक्यात हॉउसफ़ुल्ल च्या बोर्ड सहित चालू आहे हे पाहून खरंच मनापासून आनंद होतोय आणि खरं सांगू? आता सिनेमा पाहून आल्यावर जरा जास्त च आनंद होतोय ..
फर्जंद, फत्तेशिकस्त व आता पावनखिंड. दिगपाल सरांनी त्यांच्या या series मधील चित्रपटांचा आलेख प्रामुख्याने उंचावत ठेवला आहे. या सिनेमाचे पूर्वीचे नाव होते - *जंगजौहर*, त्याचे नाव बदलून पावनखिंड ठेवण्यात आले. खरेतर नावाचा फारसा फरक या सारख्या कमाल कलाकृतीला नाही पडायला हवा, पण मला वाटतंय या नावामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आणखी जवळचा वाटायला लागला, निदान मला तरी..
एक सच्चा रसिक, सिनेमा वेडा, नाटक वेडा कलाकार म्हणून मी नेहमीच प्रत्येक सिनेमा/नाटक पाहून झाल्यावर यातून मला काय घेता येईल हे पाहत असतो, ते नकळत च हल्ली होतंच म्हणा.. पण हा सिनेमा पाहतांना मी एका क्षणाला सिनेमाची गणितं, technicalities angles सर्व काही विसरून थक्क होऊन पाहात होतो, प्रामुख्याने सिनेमाचा दुसरा भाग. त्यामुळे त्याबद्दल काही बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखा होईल..
एकतर चित्रपटाचा screenplay प्रचंड powerful लिहिण्यात आलेला आहे आणि त्याला तोडीस तोड याचा दिग्दर्शन 🙏 व या हि सगळ्याच्या वर जाऊन यातील प्रत्येक छोट्यातील छोट्या कलाकाराचा अभिनय हि भट्टी अतिशय अफलातून जमली आहे 🙌
काय होते आणि कोण होते हे अचाट मावळे? आणि त्याहीपेक्षा जास्त ज्यांच्यासाठी आपला जीव अगदी ओवाळून टाकायची हि सगळी अद्भुत लोकं ते छत्रपती शिवाजी महाराज हे पाठ्यपुस्तकातील लहानपणीच्या त्या इतिहासाच्या पलीकडे आपल्याला एवढे कधीच माहिती नसतात. आपण गड किल्ल्यांवर जातो, चर्चा करतो, जयंती साजरी करतो. पण ते म्हणावा तेवढं आपल्याला समजलेलं असतं खरंच ? अर्थात हे व्यक्ती सापेक्ष आहे म्हणा, इथे मी स्वतःला तिथे धरून बोलतोय. प्रत्येक मावळा, त्याच स्वराज्याप्रती असणारं निस्सीम प्रेम, छत्रपतींना विठ्ठल, देव मानणे हे केवळ दैवी होतं. त्यांचापण संसार होता, त्यांनापण मोह व्हायचाच. पण स्वराज्यावर संकट आला कि हि सर्व लोक भरल्या ताटावरून उठून जायची. काय प्रतीचा dedication असेल याचा मी केवळ विचार च करू शकतो.
काही काही प्रसंग इतके सुंदर आणि हेलावून टाकणारे घेण्यात आले आहेत कि मी स्वतःला एक माणूस म्हणून, एक रसिक म्हणून व एक कलाकार म्हणून अश्रू येण्यापासून थांबवूच शकलो नाही..
शिवाचं राजेंचा वेष परिधान करून पालखीत बसण्याचा आधीचा क्षण व ते संवाद, नाईकांनी राजेंना विठ्ठलाच्या जागी मानणं, हरप्याचं एक संदेश देण्यासाठी वाटेल तो रस्ता शोधत राजेपर्यंत पोचणं, रायजीवर मागून जेंव्हा वार होतो तेंव्हाच ते दृश्य व त्याला त्या दिव्याशी relate करणं, हाताला साप चावलेला असूनही राजेंचा प्रवास थांबला नाही पाहिजे म्हणून ते लपवून प्रसंगी त्या विषाचा उपयोग स्वतःला बेचिराख करून राजेंसाठी जीव देणं, बाजीप्रभू व त्यांच्या मोठ्या भावाचा तो संवाद व त्यातून खूप कल्पकतेने - लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे याचा उत्तम संदर्भ येणं, आणि बाजीप्रभूंचं ते केवळ थक्क करून टाकणारं शौर्य, रात्रभर पाऊस पाण्यात प्रवास करून, थकलेले असून, जखमी झालेले असूनही, गोळी लागलेली असूनही जेंव्हा रायजी व आपल्या मोठ्या भावाला गेलेलं पाहून - *मी लढणार* हे वाक्य बाजींच्या तोंडून येतं ना तेंव्हा मी सांगू शकत नाही केवढं शिकण्यासारखं सांगून जातं ते. जिद्द, चिकाटी आणि चिवट वृत्तीचा अभेद्य संगम म्हणजे बाजीप्रभू देशपांडे ♥️ केवळ आणि केवळ थक्क व्हायला होतं सिनेमाचा शेवटचा एक तास पाहून 🙏
एवढ्या सुंदर पद्धतीने व तोडीस तोड visuals create केल्याबद्दल व एवढी अप्रतिम कलाकृती आम्हा रसिकांना , नवीन पिढीला दिल्याबद्दल या चित्रपटाशी निगडित असणाऱ्या प्रत्येकाचे शतशः आभार 🙏

एक माणूस म्हणून माझं छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे समस्त मावळे यांच्याप्रतीच मत व दृष्टिकोन आणखीन सबळ, घट्ट व दृढ करायला मदत केल्याबद्दल आभार 🙌
अशाच एकाहून एक कलाकृती मराठीत व सर्व प्रादेशिक भाषेत येत राहाव्यात जे आम्हाला जास्तीत जास्त inspire करतील हीच प्रार्थना. 😊
खूप भावना आहेत मनात आत्ता पण आतापुरता तरी एवढाच उतरवू शकतो. आशा आहे तुम्हाला आवडेल 🙏
धन्यवाद 😊


आणखी चित्रपटाचे आणि वेब्सिरीजचे रिव्हिव्ह वाचा : https://www.khasmarathi.com/search/label/Movies

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने