तुमचा व्यवसाय ऑनलाइन सेट करा या पद्धतीने | HOW TO SETUP BUSINESS ONLINE

तुमचा व्यवसाय ऑनलाइन सेट करा या पद्धतीने | HOW TO SETUP BUSINESS ONLINE
तुमचा व्यवसाय ऑनलाइन सेट करा या पद्धतीने | HOW TO SETUP BUSINESS ONLINE



कोणताही व्यवसाय करायचा झाला तर आपल्याला त्यासाठी नियोजन करावे लागते म्हणजेच कुठला प्रॉडक्ट किंवा सर्विसेस आपण देणार आहोत त्यासाठीचे मार्केट तसेच तो कसा विकला जातात म्हणजेच त्याची मार्केटिंग कशी केली जाणार याची सगळी आपल्याला माहिती घेतली पाहिजे तर आज आपण ऑनलाइन बिजनेस कसा सेट करता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत सुरुवात करताना काही स्टेप आपल्याला लक्षात घ्यावे लागतील त्या वापरून आपण आपला व्यवसाय ऑनलाइन सेट करू शकूता .

१)  तुमचा गुगल अकाउंट सेटप  करणे

 यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने गुगल अकाउंट क्रिएट करू शकता त्याद्वारे तुम्ही गुगलचे जे काही बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत म्हणजेच गुगल कॉन्टॅक्ट असो गुगल मीट असो किंवा तुम्हाला सोशल मीडिया अकाउंट काढण्यासाठी या गुगल अकाउंटचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे कंपनीच्या नावाने गुगल अकाउंट सेटप करणे गरजेचे आहे.

२) गुगल मॅप सेटिंग 

तुमचा व्यवसाय कुठल्या लोकेशनला किंवा कुठल्या ठिकाणी आहे कुठल्या शहरात आहे हे कस्टमरला माहीत असणे गरजेचे आहे कारण ग्राहक आपल्या आसपास असणाऱ्या  सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट बद्दल माहिती घेत राहतात व गुगल मॅप च्या आधारे ते जवळचे आसपासचे सर्विस सेंटर किंवा प्रोडक्ट सेल करणारे लोक पाहत असतात त्यामुळे तुमचा व्यवसाय गुगल मॅप वर असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही गुगल मॅप वर सेट करू शकता

३) सोशल मीडिया सेटप 

यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात संदर्भात सर्व सोशल मीडिया पेज असे काढू शकता जसे की फेसबुक पेज असो इंस्टाग्राम अकाउंट असेल लिंकडीन  पेज असेल याद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात बद्दल पूर्ण माहिती भरू शकता आज बरेच लोक सोशल मीडियाद्वारे खरेदी-विक्री करतात त्यामुळे तुम्हाला याद्वारे मदत होईल तसेच लिंकडीन  हा प्रोफेशनल प्लॅटफॉर्म असल्याने तुम्हाला तेथे  b2b व्यवसाय करण्यास मदत होईल

४) वेबसाईट बनवा

 कुठल्याही व्यवसायाची वेबसाईट असणे गरजेचे आहे कारण ऑनलाइन कस्टमर याद्वारे आपल्याला मिळू शकतात आपण पाहतो की कुठल्याही सर्विसेस साठी आपण सर्वप्रथम गुगल वर सर्च करतो व गुगलच्या फर्स्ट पेजवर येतात त्याची माहिती आपण घेतो म्हणजेच आपण वेबसाईटवर त्यांच्या लँड करतो त्यामुळे स्वतःची वेबसाईट असणे गरजेचे आहे त्याद्वारे आपण कस्टमर चे इंक्वायरी आणू शकतो तसेच गूगल ADS  साठी आपल्याला वेबसाईट असणे गरजेचे आहे

५) Analytics tools चा अभ्यास करावा 

आपला व्यवसाय कसा चाललाय तसेच आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईड कशी चालली आहे याची माहिती आपण वेगवेगळ्या Analytics tools मधून घेऊ शकतो कुठल्या प्रकारचे लोक आपल्या वेबसाईटला भेट देत आहेत व कुठल्या प्रॉडक्ट  किंवा सर्व्हिसेस मध्ये  इंटरेस्टेड आहेत यातून आपल्याला माहिती मिळू शकते त्यामध्ये गुगल सर्च कन्सोल  तसेच गुगल ANALYTICS  या प्रकारची टूल्स असतात यातूनच आधार घेऊन आपले सोशल मीडिया आणि वेबसाइटचे ANALYTICS  पण येऊ शकतो व त्याद्वारे आपण अभ्यास करून आणखीन बदल करून व्यवसाय वाढवू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने