squid game webseries marathi review । स्क्विड गेम वेबसिरीज मराठी रिव्हिव्ह 

 netflix वर रिलीज झालेली  money heist नंतर पाहिलेली दुसरिच english ( कोरियन ) वेबसीरीज  SQUID GAME   Hwang Dong-hyuk या डायरेक्टर ने डायरेक्ट केलेली वेबसिरीज २००९ पासून सगळीकडे रिजेक्ट झालेली वेबसिरीज ,२०२१ मध्ये मध्ये १ महिन्यात १११ मिलियन लोकांनी पाहिलेली हि वेबसीरीज .१ वेळ या स्टोरी रायटरला स्वतःचा लॅपटॉप विकावा लागला होता त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत .



squid game webseries marathi review । स्क्विड गेम वेबसिरीज मराठी रिव्हिव्ह 



एखादी वेबसिरीज किंवा टिव्ही शो जेव्हा मेंदूत माहोल तयार करण्यात यशस्वी होतो तेव्हा ती बनवण्याचा हेतू सफल होतो.संवेदनशील व्यक्ती एकत्र पूर्ण बघू न शकणारी आणि संपल्यावरही आपला प्रभाव सोडणारी साऊथ कोरियन सिरीज 'स्क्विड गेम' अशाच प्रकारची आहे.नेटफ्लिक्सवर सध्या सर्वात जास्त पाहिली गेलेली ही सिरीज आहे.सर्व्हायवलचा मुद्दा रंजकपणे थरारनाट्य निर्माण करत ही चाळीस मिनिटे ते तासाभराचे नऊ एपिसोड असणारी सिरीज मांडते.
यापूर्वी या विषयावर चित्रपट, सिरीज आल्या नाहीत असं नाही.पण संबंधित सिरीज या विषयाला जसं मांडतं ते खूप महत्त्वाचं आहे.हंगर गेम्स सारख्या चित्रपटात तसेच 'सॉ' सारख्या चित्रपटात तसेच काही 'रॉग टर्न' सारख्या अनेक झोंबीपटातही सर्व्हायवलची कथा जबरदस्तपणे मांडली होती.परंतु लहानपणी खेळल्या गेलेल्या विषयाला 'मनी हाईस्ट' टच देण्याचा हा प्रकार सुखावह आहे.काही ठिकाणी सिरीज बघताना 'मनी हाईस्ट' , 'डार्क' अशा सिरीजचीही आठवण येते.परंतु ईथं एक फरक आहे ईथं एका भयकारी योजनेत प्रत्येक पात्राच्या आतलं खरं वास्तविक रूप ,जगण्याची आकांक्षा उत्कटपणे दिसून येते.आपल्या अस्तित्वासाठी प्रत्येक गोष्टीच्या विरोधात जाण्याची त्यांची तयारी आहे. मनी हाईस्टमध्ये मात्र प्रोफेसरच्या प्लॅनवर ग्रूपमधल्या लोकांची इतकी श्रद्धा आहे की त्याच्या विरोधात जाण्याची ईच्छा व धाडस कुणातच नाही.इथं मात्र असं 'गॉड' वाटणारा एकही सुपर पात्र नाही.इथं सगळीच सामान्य माणसं आहेत.अगदी मुख्य पात्रापासून ते सूत्रधार व्हिलनपर्यंत सगळीच ! म्हणून ही सिरीज अधिक वास्तविक ठरत विश्वसनीय आणि मनी हाईस्टपेक्षाही एक पाऊल पुढे जात परिपूर्ण वाटते.
काही कर्जबाजारी ,पैशांची गरज असलेल्या लोकांना निवड करून गुप्तपणे पैशांचा लोभ दाखवून हा गेम खेळायला प्रवृत्त केले जाते.यातले सर्वच खेळ स्थानिक भागात लहानपणी खेळले जाणारे आहेत.परंतु या खेळात हरलेल्या उमेदवारांना थेट जीवानिशी मारले जाते.त्यामुळे इथं जीव वाचवण्यासाठी खेळणं हेही महत्त्वाचं आहे.पैशासाठी जीव दाववर इथं लावायचा आहे.त्यामुळे हा खेळ अतिशय कठीण आहे. माणसांना जनावराप्रमाणे वागणूक देणारा हा खेळ अतिशय हिंसक आहे.कोरियन लोकांमध्ये कलाकौशल्य ,खेळ यांच्याप्रती प्रचंड प्रेम ,आवड असल्याने त्यांनी हा विषय निवडला असावा.
जर्मनीतूनही 'डार्क' सारखी सिरीज निघत असताना साऊथ कोरियानेही एमएक्स प्लेयर सोडून आपला जलवा दाखवण्यासाठी व थेट रणांगणात उतरण्यासाठी 'नेटफ्लिक्स'चं माध्यम निवडलंय.या माध्यमाने त्यांना अपेक्षित प्रेम ,यश ,प्रतिसाद सर्वच धडाक्यात मिळवून दिलं आहे. दिवाळीत एखाद्या बिग बजेट चित्रपटाला जसं वातावरण मिळावं तसंच वातावरण सिरीजला मिळालं आणि एका अर्थाने नेटफ्लिक्सची दिवाळीच साजरी झाली आहे.
सिरीजमध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिका ,दिग्दर्शन सर्वच अप्रतिम आहे.पाचव्या एपिसोडनंतर सिरीज काहीशी संथ झाली असली तरी ईमोशनल करून ही जागा त्यांनी भरून काढली आहे.कोरियन चित्रपटात भावनिकता व हिंसा यांचं सुंदर मिश्रण बघायला मिळतं इथंही ते बघायला मिळतं.अनेक ठिकाणी ट्विस्ट ,तणाव निर्माण होतो.बरेच प्रसंग कायम लक्षात राहावेत असे आहेत ,जसं क्लायमॅक्सची सिआँग आणि सांग वू यांच्यातली पावसातली फाईटिंग तसेच जेव्हा सिऑंग आपल्या मेलेल्या आईच्या पोटावर हात ठेवून झोपतो तेव्हाचा सीन बघा.
सिरीजमध्ये जितकी हिंसा आहे तितकीच ईमोशनलही आहे म्हणून सिरीज वेगळी आणि उत्कृष्ट ठरते.बाकी सिरीज संपल्यावरही तुमच्या मेंदूत माणुसकी नक्की जिवंत आहे का ? पैसा खरंच इतका मोठा आहे का ? पैसा आनंदापेक्षा मोठा आहे का ? नात्यांपेक्षा गरजा ,पैसा मोठ्या असतात का ? असे अनेक प्रश्न सुरूच राहतील.
- ऋषिकेश तेलंगे
_________________

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने