गौरव मोरे ऊर्फ MC THC कोण आहे हा  रॅपर ।Khasmarathi Special

    गौरव मोरे ऊर्फ MC THC कोण आहे हा  रॅपर ।Khasmarathi Special


            गौरव मोरे ऊर्फ MC THC हा अलीकडेच ऐकण्यात आलेला उत्कृष्ट रॅपर.पूर्वी तो रॅपर Mc stan चा जिगरी मित्र होता.बऱ्याच वर्षापूर्वी या दोघांनी Trippin गाणंही काढलं पण मधल्या काळात मतभेद झाले.दोघंही वेगळे झाले.स्टॅनचं 'इत्ती सी आस' हे गाणं THC ने चोरलं असा आरोप लावला आणि ही जोडी फुटली.मागे एका शोमध्ये स्टॅन पुण्यातल्या काही चांगल्या रॅपरचं नाव घेताना त्या यादीत THC चं पण नाव घेतलं यावरून अजूनही दोघांत कुठंतरी मैत्री होण्याची शक्यता आहे असं दिसून येतं.

        THC चं फुल फॉर्म आहे The Hard casette असं आहे.गेल्या एक दोन वर्षात त्याचे साताठ गाणे आले.ज्यात स्टॅनला डिस केलेलं 'MR.Peace' तसेच नमस्कार ,हिज स्टोरी ,इत्ती सी आस ,पुणेरी स्लँग ,माणूस ,पुणे ट्रिप ,आणि काल आलेलं 'शेमडे रिकॉर्ड्स' हे गाणे आहेत.त्याच्या प्रत्येक गाण्याला चेतन आळवणे बीट्स देतो ज्या उत्कृष्ट असतात.

      THC ची काही वैशिष्ट्ये म्हणजे त्याची स्टाईल ही बाकीच्या रॅपर्सपेक्षा खूप हटके आहे.ती इतर रॅपरसारखी फॉरेन रॅपर्सकडून बॉरो केलेली असली तरी त्यातले पुणेरी स्लँगचे लिरिक्स दमदार असतात.'Mr peace' हे आतापर्यंत ऐकलेलं उत्कृष्ट हिंदी डिस ट्रॅक आहे. त्यात प्रचंड शिव्या असूनही ते ऐकावं वाटतं.त्याच्या गाण्यात तो स्टॅनसारखं गल्लीतल्या गोष्टी बरोबर पकडतो.स्टॅनसोबत भांडणं झाल्यावर 'MR.Peace' गाण्यात त्याला डिस केलं म्हणून हिंदुस्तानी भाऊने त्याला व्हिडीओ बनवून भरपूर शिव्या दिल्या.स्टॅनचे काही मित्र त्याला जाब विचारण्यासाठी त्याला भेटायलाही गेले.एक लाईव्ह व्हिडिओ बनवत ते धमकावत होते.अजूनही तो व्हिडिओ युट्यूबवर आहे ज्यात ते THC ला स्टॅनच्या नावावर शो का मागतो म्हणतात आणि THC मला याची गरज नाही ,इतके वाईट दिवस नाही आले असं म्हणतो.

        THC गाण्यात जरी विचित्र वाटला ,इन्स्टा लाईव्हमध्येही विदेशी रॅपर्ससारखं त्याचं बेफिक्रे वर्तन असलं तरीही तो एक उत्कृष्ट रॅपर आहे.त्याच्या गाण्यात बरेच इंग्लिश वाक्य आहेत.त्याचं इंग्लिशवर प्रभुत्व आणि अभ्यास भयंकर आहे.Mr peace मध्ये तो स्टॅनला 'चीप लवडे के ट्रॅविस स्कॉट म्हणतो.स्टॅन आणि ट्रॅविसमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत.अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तो निग्रो लोकांसारखा हूबेहूब आवाज तेही उच्चार आणि हावभावासकट काढतो.शशी थरूरनंतर तोच यात इतका परफेक्ट वाटतो.इन्स्टा लाईव्हवर त्याने काही वेळा काढून दाखवलाय.गाण्यातही त्याच्या ते बघायला मिळतं.

      त्याच्या लाईव्हमध्ये शिव्या देत हसत बोलणं ,गांजा ओढत बोलणं हे दिसून येतं.स्टॅनपेक्षाही तो बराच गँगस्टर टाईप आहे.कदाचित यामुळेच या दोघांचे भांडणं झाले असावेत.पूर्वी दोघांनी सोबतच रॅपिंग सुरू केली.कदाचित THC कडून स्टॅन काही गोष्टी शिकलाही असेल अशी शक्यता नाकारता येत नाही कारण गुरूपेक्षा चेला पुढं निघून गेल्याचे अनेक उदाहरणे बघायला मिळतात.असो हे खात्रीशीर नाही फक्त एक शक्यता मी मांडली माझ्या मनातली.एका लाईव्हमध्ये तो 'मेरा गांजा किधर गया रे' म्हणून डब्यात शोधत असतो आणि तसंच येणाऱ्या रिप्लायला उत्तरंही देतो.मुळात रॅपर्स लोकं बरेचसे असेच असतात त्यामुळे यात काही नवं नाही फक्त अनुकरण कुणीही करू नये.स्टॅनपेक्षा काही तांत्रिक बाबी रॅपमध्ये तो जबरदस्तच करतो जसं उच्चार आणि फ्लो बघा त्याचा.अलीकडेच MC THC vs MC STAN असा मॅशपही आलाय.दोघांतले संबंध सुधारून भविष्यात उत्तम गाणी ऐकायला मिळावीत म्हणून हिपहॉप प्रेमींकडून झालेला हा एक छोटासा प्रयत्न असावा.मराठी ,गल्लीतली स्लँग ( स्थानिक भाषेत टपोरी भाषा ) हे सगळं तो स्पष्ट आवाजात म्हणतो.

      नमस्कार गाण्यामध्ये तो 'माणसं नको ,जातपात मारा' असं म्हणतो तसंच 'मर गया इन्सान तू कहानी अब लारा' असंही म्हणतो.इत्ती सी आस मध्ये 'बचपन में सोचा की मिला ऐसा बाप फ्युचर को देख पापा बोले पैसा छाप ,लगती थी मुझे वो किरकिरी वाली बात'. लिरिक्सवाईज अशा बऱ्याच जागा दाखवता येतील पण त्यानंतर त्याचे गाणे ऐकण्यात अर्थ उरणार नाही तेव्हा स्वतः ऐकूनच काय ते ठरवा.तर स्टॅन आणि THC मधले मतभेद लवकर संपावेत आणि भविष्यात या दोघांचे सोलो आणि एकत्र उत्कृष्ट कोलॅब ऐकायला मिळावेत अशी सदिच्छा बाळगतो.

             - ऋषिकेश तेलंगे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने