Toxic relations and self respect। टॉक्सिक रिलेशन आणि सेल्फ रिस्पेक्ट |PsychologyToxic relations and self respect
Toxic relations and self respectआपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा अशा काही घटना अनुभवत असतो जिथे आपल्याला हे कळत नाही की इथे आपण रहावं , जो अनुभव येतोय तो घेत रहावा की move on करावं...

हा प्रश्न बऱ्याचदा पडतो, पण समजत नाही की अशा अनुभवावर काय नेमकं करायला हवं आणि आपण द्विधा मनःस्थितीत रहायला लागतो  आणि आपल्याला एक प्रकारचा भावनिक आणि मानसिक त्रास व्हायला लागते अशावेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेऊन स्वतः ला पहिली priority देणं गरजेचं ठरतं,  याच संकल्पनेला "self respect" असं म्हणतात.


Toxic relationships 

सर्वांत आधी आपण toxic relationship म्हणजे काय हे जाणून घेऊया...

तुम्ही कोणत्याही नात्यात असाल, ते नातं मैत्री च असेल, प्रेमाचं असेल किंवा व्यावसायिक असेल त्या नात्यात काही काळानंतर एक नकळत असा दुरावा यायला लागतो.

 तुम्ही अतोनात प्रयत्न करूनही गोष्टी बिघडत जातात. काही प्रसंगी समोरचा व्यक्ती तुमची किंमत करणं बंद करतो.. तुम्हाला ही हे लक्षात यायला लागतं पण नात्यांची किंमत किंवा एक attachment झालेली असते म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला सोडत नाही किंवा त्या व्यक्तीच्या चुका लक्षात येत असूनही केवळ तो व्यक्ती सोबत रहावा किंवा ते नातं टिकावं म्हणून जर तुम्ही त्या नात्यात राहत असाल तर त्याला toxic relationship आपण म्हणू शकतो..


मानसिक परिणाम

कधी कधी आपल्याला विनाकारण चिंता, ताण आणि अतिविचार (overthinking) ह्या गोष्टी त्रासदायक ठरू लागतात आणि नेमकं कारण लक्षात घेतलं तर आपल्याला कळायला लागतं की आपण एखाद्या व्यक्ती बद्दल  किंवा नात्यांमध्ये असणाऱ्या समस्यांमुळे हे सर्व व्हायला लागतं.

आपण प्रयत्न करत जातो, कधी कधी तर असं होतं की, जेवढे प्रयत्न करतो तेवढाच तो व्यक्ती दूर होत जातो आणि आपलं कुठं चुकतंय ह्या विचारात आपण राहू लागतो. 

यातूनच anxiety, stress सारख्या गोष्टी उद्भवू लागतात.

मन कायम उद्विग्न राहू लागतं, चिडचिड व्हायला लागते, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता तेव्हढ्या intresting वाटत नाहीत..बरीच करणं सांगता येतील,

 आता उदाहरणार्थ- 

1.एखादा जाड असलेला व्यक्ती ज्याला स्वतःच्या शरीराची anxiety(चिंता) आहे तो त्याच्या मित्रांच्या group मध्ये जातो आणि तिथे त्याचे मित्र त्यांची जाड्या म्हणून टिंगल उडवतात, ह्याच्या मनाला त्यामुळे त्रास होतो, पण मित्रत्वाचं नातं म्हणून तो काही बोलत नाही.


आता याचा परिणाम तो जेव्हा एकटा असेल तेव्हा त्याच्या मनावर होतो एकटा असताना त्याला शरीराची चिड ही येऊ शकते किंवा त्याला न्यूनगंड निर्माण होऊ शकतो..


2. एखादा व्यक्ती एकतर्फी प्रेमात पडलेला आहे किंवा दोघेही प्रेमात आहेत पण , तो/ती समोरच्या व्यक्तीला नेहमी वेळ देतो कदाचित स्वतःपेक्षा समोरच्याला च देतो पण समोरून तसा response किंवा efforts येत नाहीत किंवा बऱ्याचदा granted घेतल्या जातं की आपण कसेही वागलो तरी हा व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही.


याचा परिणाम मनावर होऊन एकप्रकारच दडपण यायला लागतं, मन कशातच लागत नाही, समोरचा व्यक्ती काय करत असेल ? कसा असेल? याची चिंता व्हायला लागते आणि हळूहळू हा व्यक्ती जेवढं अधिक त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढाच तो व्यक्ती दूर जायला लागतो किंवा समोरचा व्यक्ती फक्त कामपूरता या व्यक्तीचा वापर करून घ्यायला लागतो आणि हे सर्व लक्षात येत असूनही तो/ती त्यात काही ही बदल करण्यासाठी तयार होत नाहीत कारण त्या व्यक्तीला गमावण्याची भीती असते..

वरील दोन उदाहरणांपैकी 2 र उदाहरण मुलामुलींना अधिक relatable वाटेल,  कारण प्रत्येक जण कधीतरी या अनुभवातून गेलेला असतोच..

आता प्रश्न हा पडतो की यामुळे एवढा त्रास होत असेल तर मग ह्या गोष्टी बदलाव्या तरी कशा? आणि बदल करायचाच असेल तर त्यामुळे आपलं नातं, तो व्यक्ती दुरावणार तर नाही ना? यासाठी self respect च महत्व जाणून घेऊया..


नात्यांची गुंतागुंतआणि मानसिक त्रास

प्रत्येक वेळी आपण self respect ठेवा..स्वतःची किंमत करणं शिका , असं ऐकतो.. बऱ्याचदा ह्या सर्व गोष्टी समजतातही, पण  फक्त तो व्यक्ती किंवा ते नातं टीकावं म्हणून आपण परिस्थिती आपल्या प्रतिकूल असली तरीही आपण पाहिजे तो प्रयत्न करत नाही.

पण जर तुम्हाला सांगितलं की, ह्या गोष्टी तुम्ही स्वतःची किंमत करत नाहीत म्हणूनच तुमच्या सोबत घडतात तर..?

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर वरील उदाहरणं लक्षात घ्या..

पहिल्या उदाहरणात जर त्या व्यक्तीने त्यांना त्याची गम्मत करूच दिली नसती किंवा गमतीमुळे त्याला त्रास होतोय हे लक्षात आणून दिलं असतं तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण थोडा तरी बदलला असता .

यात 2 गोष्टी घडल्या असत्या - 1. त्याला समजून घेऊन त्याच्या मित्रांनी ते बंद केलं असतं(खरे मित्र असतील तर)

2. त्याला त्यांना सोडावं लागलं असतं.

आता या दुसऱ्या condition मध्ये जर त्याला लोकांना सोडणं आणि move on करणं सोप्प वाटलं असतं तर त्याला मानसिक त्रास झाला नसता.

आता दुसरं उदाहरण लक्षात घ्या

यात बहुतांश वेळी एका व्यक्तीला त्रास होत असतो पण तो व्यक्ती समोरच्याला सोडून जाण्यास तयार नसतो किंवा समोरच्याला आपली किंमत कळावी इतका प्रयत्न करणं देखील त्याला अवघड वाटतं.

पण जर त्या व्यक्तीने प्रयत्न करून थोडी हिम्मत केली आणि स्वतःला थोडं त्या नात्यातून ओढून दूर केलं तर यात ही 2 गोष्टी घडतात.

1. समोरचा व्यक्ती समजून घेणारा असेल तर होत असलेला त्रास लक्षात घेऊन ते नातं पुन्हा बहरू शकतं.

2. ती व्यक्ती कायमची दूर होऊ शकते.

या वरून आपल्याला असं वाटू शकतं की असं करणं म्हणजे नातं तुटणार, पण हा विचार आणणं म्हणजेच स्वतःचं मानसिक खच्चीकरण करून घेण्यासारखं असतं.

 Self respect : स्वतःची किंमत करणं शिका

 वरील उदाहरणं वाचून तुमच्या हे लक्षात आलं असेलच की  आपणही जर अशा गोष्टींमध्ये अडकलेले असाल तर यातून बाहेर निघण्याचा मार्गही काढायला हवा. त्यासाठी काही पुढील उपाय-

1. सोडून देणं शिका.

आपण कितीही प्रयत्न केले तरी व्यक्ती मध्ये बदल होत नसेल तर त्याच्या पासून दूर राहिलेलंच बरं.

2. स्वतःवर काम करा.

व्यायाम , ध्यान स्वतःला आवडतील अशा गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला एखादा व्यक्ती आला काय न गेला काय याचा फरक पडणार नाही.

3. जे किंमत करतात त्यांना वेळ द्या.

एकटं असलो की आपण पुन्हा त्याच विचारात जाऊ लागतो म्हणून शक्य असेल तर जे लोकं खरंच आपली किंमत करतात त्यांना वेळ द्या.

4. नवीन गोष्टी शिका.

नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहिल्यास आपल्याला परावलंबी प्रवृत्ती पासून सुटका मिळते आणि नवीन कौशल्ये देखील विकसित होतात जे आपल्याला भविष्यात कामात येऊ शकतात.

5. पुस्तकं वाचा.

पुस्तकं हे मानवाचे सर्वात चांगले मित्र आहेत असं म्हणतात. जर नवनवीन गोष्टी जाणून घेऊन स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर पुस्तकांसारखा रामबाण इलाज दुसरा कोणताच नाही.

थोडक्यात सांगायचं झालं तर इतकंच की, स्वतःला एवढं busy ठेवा की तुमच्या आयुष्यात उगाचंच येणारे distractions दूर होतील आणि जेव्हा तुम्ही हे करणं सुरू कराल तेव्हा तुमची self value वाढून उगाचच येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची एक शक्ती तुमच्यात निर्माण होईल.

तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!


Prof.Tushar Gopnarayan

MA Psychology + NET
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने