भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन



lata manageshakar death news
lata manageshakar death news
  

भारतरत्न लता मंगेशकरांचं यांचे ९२ व्या वर्षी निधन .


● गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला आहे.

● जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. 

● जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणाऱ्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. 

● नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. 

● संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने