मनी हिस्ट वेबसिरीज रिव्हिव्ह ।money heist webseries review 

moneyheist webseries
moneyheist webseries2017 ला आलेल्या मूळ La casa de papel नाव असलेल्या या Spanish Web Series चा खरा अर्थ House Of Paper असा होतो.... मात्र याचं इंग्रजी नामकरण Money Heist अर्थात पैशांची चोरी अस करण्यात आलं!!
Netflix वर आल्या नंतर भारतात प्रचंड हा शब्द सुद्धा फिक्का पडावा इतकी लोकप्रियता या सिरीज ने मिळवली होती.... 2017 पासून आजपर्यंत मला अनेक मित्रांनी एकदा तरी बघ म्हणून सुचविलेली... विशेष म्हणजे ज्यांना Hollywood movies आवडत नाहीत त्यांनी पण सुचवलेली...!
बघता बघता सिझन 01 पाहून झालं.... तसं ठरवलं तर एक दोन दिवसात पण चारही सिझन संपवू शकतो पण कधी कधी मंजिल से ज्यादा सफर हसीन होता है.... त्यामुळे ही सिरीज संपूच नये असं वाटतंय!
Breaking Bad, Death Note, Dark Knight अशा एक न अनेक World Class निर्मिती पैकी ही एक वाटतेय.... मी तर म्हणेल Marvel आणि Stan lee तात्यांच्या Avengers पेक्षा सुद्धा ही खूप वरचढ आहे...!
कथा, कथेतील एक एक पात्र , त्या प्रत्येक पात्रांच्या आयुष्यातील कथा, त्या प्रत्येक पात्राची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांचे गुण आणि दोष सुद्धा, भीती, प्रेम, नैराश्य, हाव, लोभ, मत्सर , द्वेष अशी Breaking Bad सारखीच प्रत्येक भावना आणि यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथापट उलगडून दाखवण्याची पद्धत.... प्रत्येक नवीन पानावर काहीतरी भन्नाट ...पाहता पाहता श्वास थांबून जावेत तरी ह्र्दय धडधडत रहावं ..... हे सगळं इतकं मनोरंजक आहे की शब्दात हे सगळं गुंतवणं अशक्यच आहे.... त्यामुळे यावर बरंच लिहायला आवडेल....!
अशी निर्मिती करण्यासाठी किती आयुष्याचा अनुभव लागत असेल देव जाणो....मला प्रश्न पडतो की प्रत्येक पात्रावर लिहायला हवं की प्रत्येक season वर....विचार करावा वाटतो की ही निर्मिती पाहिल्यानंतर जर त्यावर लिहायला इतका विचार करावा लागतो तर ती तयार करण्यासाठी त्यांनी किती डोकं लावलं असेल.... किती मेहनत घेतली असेल?? या निर्मितीसाठी प्लॅनिंग कशी केली असेल? आणि इतकं सगळं ते कशासाठी करत असतील??
बघा ना मी सगळं इतका वेळ देऊन इतकं विचार करून हे सगळ इथे लिहिल्यानंतर तुम्ही वाचलं तर मला काही यातून मिळतं का?? पैसा ? लोकप्रियता? प्रसिद्धी ?? मनाचं समाधान?? नाही राव माझं तर स्पष्ट मत झालंय.... ज्या निर्मिती मागे फक्त पैसा , प्रसिद्धी कसला तरी हेतू असतो ना ती क्षणभंगुर ठरते... अशा प्रत्येक Awesome निर्मितीसाठी फक्त व्यक्त होण्याची प्रेरणा लागते....त्यात जर लोभ हाव मोबदला अशा अपेक्षा आल्या तर ती इतकी जबरदस्त कधीच होऊ शकत नाही.....कारण अपेक्षा आल्या की अपेक्षा भंग सुद्धा येणारच.... त्यामुळे अशी निर्मिती म्हणजे निखळ , निरपेक्ष प्रेमच असतं ज्यात फक्त देणाऱ्याला द्यायचं असतं...!
Money Heist ही सिरीज फक्त चोरी असेल? की मग एखाद्या व्यक्तीला घ्यावयाचा बदला असेल?? हा एक समाजाला दिलेला संदेश असेल की मग फक्त खूप सारा पैसा मिळवणे इतकाच याचा उद्देश असेल?? श्रीमंत होऊन भविष्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ती करणे इतकंच या मागचा उद्देश असेल की मग हा एखाद्या देशाला दुसऱ्या देशाला द्यावयाचा संदेश असेल?? ही चोरी करणाऱ्याला याची रूपरेषा ठरवणार्याला इतिहास घडवायचं, नाव कमवायचं, लोकप्रिय व्हायचं असेल की मग यात पण त्याला ' क्रांती ' करून दाखवायची असेल??
अशा प्रकारे एक सिझन संपवून देखील अशी भन्नाट चोरीची कथा दाखवताना सुद्धा ही चोरी का केली जातेय हे पण एक गूढ ठेवलं गेलेलं आहे... इतका Suspense इतर कुठेच कधीच पाहिला नव्हता राव आपण...!!
तर तुम्ही म्हणाल तरच या लेखमालिकेच्या पुढील भागांत पाहूया कथानक , कथानकातील एक एक पात्र , त्यातून आपण काय घ्यायला हवं हे सुद्धा...नेहमीप्रमाणे लिहावं वाटलं, लिहायला जमलं तरच ते पण जमेल तसंच हां...!

moneyheist webseries सिझन ३ आणि ४ 

Money Heist च्या Season 01 आणि Season 02 ने जितक्या अपेक्षा उंचावल्या होत्या तितक्याच Season 03 आणि Season 04 ने त्यांचा अपेक्षाभंग केला...निदान माझातरी !
नको तितकी उगाच वाढवलेली कहाणी.... गरज नसताना घुसवलेली एक न अनेक पात्र ..... रोमान्स, प्रेम, अश्लीलता, शिव्या, भांडणं , एकेमकांतील वाद या सगळ्यात मुख्य कहाणी फार दूर कुठेतरी हरवून गेल्यासारखी वाटते....!!
Season 05 साठी जरी सस्पेन्स ठेवला गेला असला तरी त्यात सुद्धा इतकं जास्ती काही विशेष असेल असं वाटत नाही....!!
Money Heist ची खरी मजा फक्त आणि फक्त Season 01 आणि 02 मध्येच आहे... कहाणीची मांडणी, प्रोफेसर मधील Seriousness, कहाणी भोवतीच फिरणारी पात्रं, योग्य त्या ठिकाणी दिला गेलेला भूतकाळाचा संदर्भ अशा अनेक गोष्टी Season 03 आणि 04 मध्ये पूर्णपणे हरवलेल्या भासल्या...!
कुठे ना कुठे इतक्या कमी दिवसांत इतक्या अचानकपणे चक्क एखाद्याचं operation करण्याची दिली गेलेली ट्रेनिंग देखील बुद्धीला न पटणारी आहे... अनेक प्रसंगी तर प्रोफेसरची दाखवली गेलेली हुशारी देखील थोडीफार अति वाटते !
काही म्हणा निर्मात्यांनी फक्त एकाच कथेची , पात्रांची आणि भावनांच्या भाताची पुनरावृत्ती करण्याच्या नादात पूर्णपणे खिचडी करून टाकलेली आहे... खरंच मनापासून मेहनत घेतली असती तर या कथेला अतिशय प्रभावीपणे मांडता आलं असतं... असो, Season 01 आणि Season 02 ला मात्र तोड नाहीच हे नक्की...!
Money Heist म्हणजे फक्त Season 01 आणि Season 02 इतकंच समीकरण असतं तर फार छान वाटलं असतं बोले तो ना अशी कहाणी पुन्हा शक्य वाटते ना इतकी जबरदस्त निर्मिती.... !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने