NDRF ची स्थापना आणि कार्य संपूर्ण माहिती ।HOW WORK NDRF|INFOTAINMENT

(NDRF)  National Disaster Response Force
(NDRF)  National Disaster Response Force
 नमस्कार मित्रानो सध्या राज्यात आणि विशेषतः कोकण आणि परिसरात रायगड सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात संसतधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती आणि महाड मधील तळिये गावात दरड कोसळल्याने भीषण दुर्घटना झाली आहे. यासाठी एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (NDRF)  National Disaster Response Force. बचावकार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
                              या सर्वामध्ये बचाव करायला तत्पर असलेले एनडीआरएफ हे महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र आपल्यातील अनेकांना  एनडीआरएफ आणि त्याची कार्य कसे असते हे माहित नसते यासाठीच काय आहे एनडीआरएफ? ते कसे कार्य करते? सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ   
      देशातील नैसर्गिक व इतर आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला होता . त्याअंतर्गत 2006 मध्ये  एनडीआरएफची (NDRF)  National Disaster Response Force स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी एनडीआरएफ (NDRF) कडे असते. 

(NDRF)  तुकडी पथकात कोण कोण असत ?

                                       हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक यासर्व  पातळीवर असते. एनडीआरएफची स्थापना झाली तेव्हा त्याचे देशात आठ बटालियन होते नंतर ही संख्या १२ वर गेली. एका बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

● महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. यामध्ये एकूण 18 तुकड्या आहेत. यापैकी मुंबईत ३ पुण्यात १४ तर नागपूरमध्ये १ तुकडी आहे. सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र एनडीआरएफचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.


 NDRF मधील जवानांची निवड कशी होते ?


               एनडीआरएफमध्ये दाखल होण्यासाठी तुम्ही बीएसएफ सीआरपीएफ सिआयएसएफ आयटीबीपी आणि एसएसबी यांसारख्या पॅरामिलिटरीचे जवान असणे आवश्यक आहे कारण यामध्ये  प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून जवानांची नियुक्ती केली जाते. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. त्यांना १९ आठवड्यांचे आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.


 NDRF चे आतापर्यंतचे कार्य  ?


                एनडीआरएफ 'आपदा सेवा सदैव' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतं याच उदाहरण म्हणजे आता पर्यंतचा एनडीआरएफच्या बचाव कार्याचा यशस्वी इतिहास सांगता येईल यामध्ये नुकत्याच झालेल्या पूरस्थिती आणि महाड मधील तळिये गावात दरड कोसळल्याने भीषण दुर्घटनेतील बचाव कार्य तसेच महाराष्ट्रातील तिवरे धरणफुटी, मुंब्रा इमारत दुर्घटना, सावित्री पूल दुर्घटना, माळीण भूस्खलन यांसारख्या दुर्घटनांमध्ये एनडीआरएफने अनेकांना जीवनदान दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने