महेंद्रसिह धोनी(mahendrasingh dhoni) भारताचा यशस्वी कर्णधार ।।Sports news


                                                      महेंद्रसिंग धोनीला आज एक चांगला क्रिकेटर  म्हणून ओळखले जाते. M S Dhoni या नावाने तो सुपरिचित आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सगळी कडे चमकविले आहे. लहान गावातून निघून एक महान क्रिकेटपटू  होण्यापर्यंत धोनी ला अनेक संघर्षामधून जावे लागले , या संघर्षामधून निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महेंद्रसिह धोनी भारताचा यशस्वी कर्णधार ।।Sports news,
महेंद्रसिह धोनी भारताचा यशस्वी कर्णधार ।।Sports news,



                            धोनी चे पूर्ण नाव महेंद्र सिंह धोनी आहे. त्याचा जन्म 7 जुलै 1981  साली रांची , बिहार  (भारत) मध्ये झाला, त्यांची उंची 5 फूट 9 इंच आहे एवढी आहे, धोनी च्या पत्नी चे नाव साक्षी धोनी आहे व त्यांच्या वडिलांचे नाव पान सिह धोनी आहे, आईचे नाव देवकी देवी आणि त्यांच्या मुली चे नाव जीवा आहे.

                                    सुरवातीच्या काळात महेंद्रसिंह धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेटविषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत  घेण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या म्हणून त्याने आज हे यश मिळविले आहे. आज धोनी भारतातील दिग्गज क्रिकेट खेळाडूच्या यादीत पोहचला आहे . एवढेच नाही तर भारतीय क्रिकेट संघात आपल्या कर्णधार पदाने कित्येकांची मने जिंकली शिवाय संघाला चांगले मार्गदर्शन देखील केले.

                                       शाळेत असतानाच धोनीने क्रिकेट खेळायला सुरवात केली होती परंतु भारतीय क्रिकेट संघाचा हिस्सा होण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागली.ज्यावेळी त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी या त्याने या संधीचे  अक्षरशः सोने केले व हळुहळु स्वतःला सिद्ध केले. एवढेच नाहीतर आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट वीरांमध्ये ' माही ' चे नाव घेतले जाते, त्याने मर्यादित षटकात ही  भारतीय संघाचे उत्तम नेतृत्व केले.

                                            11 सप्टेंबर 2007 पासून  4  जानेवारी 2017 पर्यंत महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पदावर होता व 2008 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. साहसी ,रोमांचक व्यक्तिमत्त्व व युनिक हेअरस्टाईल ठेवणारा धोनी भारताचा एक लोकप्रिय क्रिकेटर व मार्केटिंग आयकॉन देखील ठरला आहे.धोनी एक यशस्वी, आक्रमक, उजव्या हाताचा फलंदाज व यष्टीरक्षक आहे.

                                     माहिला आपल्या प्रतिभेचा थोडा सुद्धा गर्व नाही म्हणून देखील तो भारताचा आवडता क्रिकेट खेळाडू आहे.धोनी त्या कर्णधारापैकी एक आहे ज्यांनी ज्युनिअर आणि  भारतीय क्रिकेट संघाच्या  क्रमवारीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. माही एक " आदर्श"  आणि  पिन अप स्टार देखील आहे.


महेंद्र सिंग धोनीचे   Records

                महेंद्रसिंग धोनी असा  यष्टीरक्षक आहे ज्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार धावा बनविल्या आहेत, यापूर्वी कोणत्याही यष्टीरक्षकाने एवढया  धावा  बनविल्या नाहीत.हा विक्रम धोनीच्या नावावर नोंदला गेला आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदा दरम्यान एकूण 27 कसोटी  सामने झाले होते ज्यात सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असण्याचा विक्रम माहिच्या नावावर आहे.धोनीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात भारतीय संघाने खाली दिलेले विश्वचषक  जिंकले होते.यामुळे धोनी पहिला असा कर्णधार बनला ज्याने सर्व प्रकार च्या ICC स्पर्धा जिंकल्या आहेत.

  ■ ICC स्पर्धा 
  •   टी.स्पर्धा  2007
  •   ODI  विश्वचषक 2011
  •   चॅम्पियन ट्रॉफी 2013

सर्वात जास्त आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

आतंरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धोनीने 204 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम केलेला आहे आणि तो सर्वात जास्त  षटकार मारणारा  क्रिकेटर म्हणून देखील प्रसिद्ध आहे या शिवाय कर्णधार पदावरील सर्वात जास्त टी 20 सामने जिकण्याचा किर्तीमान देखील त्याच्याच नावावर आहे.




          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने