तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला ?:सुजय विखे पाटील || Marathi news


शिर्डी, 18 ऑगस्ट :      भाजपचे (Bhartiy Janata Party) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी 'राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणं चुकीचं असून जर केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?' असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही सुजय विखे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला.
तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला ?, सुजय विखे पाटील || Marathi news
तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला ?: सुजय विखे पाटील || Marathi news

          आज दूधदरवाढीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांना अहमदनगर जिल्ह्यातून पाठवण्यात आलं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज लोणी गावात एल्गार आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले होते.


          सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे कि 'राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे..जनतेने नाकारलेलं असताना तीन पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा. ' 


          डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणार्या डॉक्टरांचा संजय राऊत यांनी अपमान केला आहे. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही खासदार सुजय विखेंनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही ? असा सवाल खासदार सुजय विखे यांनी केला.





➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi


➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने