“तो आमचाही मुलगा होता, मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवावा ”; संजय राऊत || Marathi news


          बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू बाबत अनेक दिवस सोसिअल मीडिया आणि राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा होताना दिसत होत्या त्या मध्ये सुशांतने खरेच आत्महत्या केली होती का ? कि तो पूर्व नियोजित खून होता ? याची आशंका वर्तवली जात होती. त्यातच मुंबई पोलिसांकडून खूप दिवस झाले तरी त्यांना लीड मिळत नसल्याने सोसिअल मीडिया व अनेक बडे राजकीय नेते सीबीआय चौकशीची मागणी करत होते.           सुशांतच्या या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “ सुशांत आमचा देखील मुलगा होता. मुंबई पोलीस सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहेत. ” असं त्यांनी म्हटलं आहे.


          संजय राऊत यांनी सुशांत प्रकरणावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले, “ सुशांत आमचा देखील मुलगा होता. तो मुंबईत राहात होता. सुशांतसोबत आमचं काही वैर नाही. त्याच्या मृत्यूमागचं खरं कारण बाहेर पडावं, त्याला न्याय मिळावा अशी आमची देखील इच्छा आहे. फक्त सुशांतच्या चाहत्यांनी थोडा संयम बाळगावा आणि मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवावा. ” अशी विनंती संजय राऊत यांनी केली आहे.


          “ मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा असून मुंबई पोलीस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती, पण पोलिसांनी सगळय़ांना तुरुंगात पाठवले. मुंबई पोलिसांनीच २६/११ चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे. ” असे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातून खूप सारे प्रश्न उपस्थित केले होते.


           सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत , सोशिअल मीडिया व राजकीय वर्तुळात मात्र अफवा व चर्चांना उधाण येताना दिसत आहे यात खरे काय व खोटे काय हे मात्र पडताळणे गरजेचे आहे. 


एएनआयचे ट्विट :
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने