The Power of Loneliness || Psychology


          नमस्कार मंडळी... !!  भारतीय इतिहासात अनेक असे लोकं होऊन गेलेत ज्यांनी अद्वितीय असं Creation करून ठेवलंय, मग ते आध्यात्मिक मार्गात असो किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असो.. त्यांनी एक अमीट अशी छाप सोडली ज्यामुळे ते त्यांच्या त्या जागेवरून कधीही Replace होऊ शकणार नाहीत. हे सर्व त्यांनी एका अशा शक्तीच्या जोरावर केलंय ज्या शक्तीचा वापर करून आपणही आपल्या आयुष्यात लक्षणीय बदल घडवून आणू शकतो. काय आहे ती शक्ती ? The Power of Loneliness चला जाणून घेऊया..
The Power of Loneliness || Psychology
The Power of Loneliness || Psychology

          Loneliness is a Power असं म्हणतात , फारच थोडे लोकं ती शक्ती वापरून यशस्वी होतात असं म्हणतात, पण ती Power किंवा तो काळ खरंच आपण आपल्या विकासासाठी वापरू शकतो का ? तर याचं उत्तर आहे हो ! वापरू शकतो. पण तुमचा तसा Mindset असणं महत्वाचं असतं.  तो Mind Set करण्यासाठी काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.



◾ एकांतवास :


          आजच्या युगात आपण अशा बऱ्याच गोष्टींशी Connected आहोत ज्यामुळे सतत आपली energy त्यावर खर्च होत जाते. आपण प्रयत्न करतो की जे काय घडतंय ते Control करावं पण तसं होत नाही आणि सातत्याने आपली Energy त्यावर खर्च होत राहते.


          सतत तसं झाल्याने एक वेळ अशी येते की आपल्याला काय करावं ते सुचत नाही. आपल्या भाषेत आपण Hang होतो ! बऱ्याचदा ही समस्या इतकी जास्त होते की याचे परिणाम आपल्या संबंधांवर, आपल्या कामावर आणि थोडक्यात आपल्या आयुष्यावर व्हायला लागतात. अशावेळी आपल्याला गरज असते ती एकांतवासाची.



◾ आपलं Remote दुसऱ्यांच्या हातात :


          आपण समाजशील प्राणी आहोत. आपल्याला कायम समाजात राहून आपल्या गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यामुळे आपली दुसऱ्यांच्या मताबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.


      जसं की बघा, तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असली तर तुम्ही तुम्हाला जी आवडेल ती घेण्यापेक्षा दुसऱ्यांना आवडेल या मताला महत्व देता. म्हणजे Basically आपण काय करतो की, दुसऱ्यांना Impress करायच्या प्रयत्नात आपली गरज काय आहे ते विसरून त्यांच्या मताला प्राधान्य देतो.


उदाहरणार्थ, गाडी ची फक्त गरज असते पण ती गाडी घेतल्यावर दुसऱ्यांनी जर Appreciate केलं तर आपल्याला एकप्रकारची आनंददायी Feeling येते.


          जर एखाद्याने आपली Choice चुकीची ठरवली तरी सुद्धा त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणजे तुम्ही तुमचं Emotional Remote दुसऱ्यांच्या हाती देत आहात आणि त्यामुळेच आपले अनेक प्रकारचे Conflicts उत्पन्न होतात आणि वारंवार आपण प्रयत्न करून लोकांशी आणि समाजाशी जुळतो. या सर्व कारणांमुळे आपली मानसिक प्रगती कुठेतरी Slow होते आणि आपल्याला वाटतं की आपली काही किंमतच नाहीये.



◾ निरीक्षणाची गरज :


          जेव्हा अति ताण यायला लागतो तेव्हा आपल्याला थोडं थांबून तो ताण का येतोय किंवा ती समस्या का निर्माण झाली आहे याचा विचार करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला निरीक्षण करता येणं अति महत्वाचं ठरतं.


          जेव्हा आपण Consciously एखादी गोष्ट करायला लागतो तेव्हा आपण कुठे आपली Energy घालवतोय हे आपल्याला कळायला लागतं आणि ते निरीक्षण Possible होतं. एकदा तुम्ही निरीक्षण करायला लागलात की अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो.



◾ आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग :


          तुम्हाला निरीक्षण करता आलं की तुमच्या बऱ्याचशा समस्यांना कसं Deal करावं हे तुम्हाला समजायला लागतं. त्यामुळे एक आत्मिक शांती तुमच्या मनात निर्माण व्हायला लागते आणि तुम्ही एक आत्मविश्वासू व्यक्ती बनता.


          या प्रक्रियेनंतर आपल्या लक्षात यायला लागतं की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या बऱ्याच अंशी निरर्थक आहेत आणि तो भाव उत्पन्न झाला की आध्यात्मिक प्रगती सुरू झालीच म्हणून समजा.



◾ आजची गरज :


          एकांत हवाहवासा वाटायला लागला की आपण अनेक गोष्टींपासून विरक्त व्हायला लागतो. आज बघितलं तर प्रत्येक व्यक्ती कोणावर ना कोणावर Depend आहे. मग ते Emotionally असो किंवा Physically..आणि त्यामुळेच आज बऱ्याच मानसिक समस्या उद्भवत आहेत. म्हणून आज प्रत्येक व्यक्तीला एकांतवासाची गरज आहे. यासाठी तुम्हाला कुठे तरी दूर हिमालयात जाऊन बसायची गरज नाहीये. फक्त तुम्ही जे काय करताय ते करत राहूनच त्यापासून दूर राहायची गरज आहे म्हणजे या भौतिक गोष्टींच्या मागे न लागता आंतरिक प्रगती कशी साधता येईल याकडे लक्ष देऊन आपलं आयुष्य समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा.
The Power of Loneliness || Psychology
The Power of Loneliness || Psychology

🔅 या एकांताचा वापर करण्यासाठी महत्वाच्या Tips :


1. स्वतःला वेळ द्या.


2. प्रत्येक गोष्टींचं चिंतन करण्याची सवय लावा म्हणजे तुम्हाला आत्मपरिक्षणाची सवय लागेल.


3. ध्यानधारणा सारख्या मन स्थिर करणाऱ्या गोष्टी समजून घ्या.


4. समस्या समजून घेऊन त्यावर स्वतः action घ्या.


5. एकांताचा उपयोग स्वतःला अधिक प्रगत अधिक उन्नत करण्यासाठी करा.


          आधी सांगितल्याप्रमाणे जे जे थोर पुरुष होऊन गेलेत त्यांनी एकांताचा वापर करून अनेक अशा गोष्टी केल्यात ज्यामुळे आज आपल्याला त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन एक प्रेरणा मिळते. तुम्हीही एकांताचा वापर करून आपल्या आयुष्यात हवा तसा बदल करून बघा !




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने