" संज्या बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो " : निलेश राणे || Marathi news


          बदला घेण्यासाठी व विजयी डंका वाजवण्यासाठी फक्त पाकिस्तान राखीव ठेवला आहे का अशी टीका शिवसेनेचे संजय राऊत यांनी भारत चीन सीमावादावर केली त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे निलेश राणे म्हणतात  " संज्या बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो आणि घेतला ही जाईल. "


          गलवान खोऱ्यात झालेल्या चिनी सैन्यासोबत धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात असंतोष माजला आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा भाजपवर टीकास्त्र डागले आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फळ असून अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभं राहील? चीनच्या आक्रमणानं बाहुबली राजकारणाची हवा निघाली, भाजपा सरकारवर निशाणा साधला.

" संज्या बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो " : निलेश राणे || Marathi news
" संज्या बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो " : निलेश राणे || Marathi news

          भारत चीन सीमावाद निवळला असला तरी भारताच्या राजकारणात मात्र त्याचे पडसाद अजून उमटताना दिसत आहेत. भारतीय सैन्यासोबत उभे राहण्या व कोरोना सारख्या महामारी बनलेल्या रोगाशी सामना करण्या ऐवजी राजकारणी लोक मात्र एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.


          सर्जिकल स्ट्राइक करून बदला घेण्यासाठी , विजयी डंका पिटवण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे ? अशी टीका संजय राऊत यांनी केली, त्यावर भाजपचे निलेश राणे यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले , निलेश राणे म्हणतात " संज्या बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो आणि घेतला ही जाईल. बदला म्हणजे एका खोलीत बसून, दुसऱ्यांकडून मजकूर लिहून आणि दुसऱ्याच्या पैश्यावर रोज सामना पेपर छापण्यासारखा नसतो." 


निलेश राणे यांचे ट्विट :

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने