Mind Reading : अंतर्मनाचा वेध घेणारी जादू || Psychology


          मंडळी एखाद्या व्यक्तीला भेटून तुम्हाला एकदा तरी असं वाटलं असेलच की यांच्या मनात काय चाललंय ? जेव्हा असा विचार येतो तेव्हा असं वाटतं की एखादी तरी अशी जादू असावी ज्याचा उपयोग करून दुसऱ्याच्या मनातलं जाणून घेता यावं. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं कोणाला आवडणार नाही ? आणि तेव्हाच तुम्हाला समजलं, की तशी एक जादू खरंच अस्तित्वात आहे Mind Reading आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता तर ? चला जाणून घेऊया...!🔅 Mind Reading 🔅


          आपलं अंतर्मन हे अनेक विचारांचं भांडार आहे. त्यात असंख्य विचार आहेत जे आपल्याला जाणून घ्यावेसे वाटतात. म्हणून ते विचार कुठून येतात, यावर संशोधन करणं सुरू झालं आणि असा निष्कर्ष काढण्यात आला की आपल्याला दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि त्यावरची आपली Reaction याद्वारे ते विचार येऊन आपल्या अंतर्मनात कुठेतरी घर करतात आणि वेळोवेळी आपल्याला गरज असेल तेव्हा आपला मेंदू त्या विचारांद्वारे आपल्याला एखाद्या मार्गदर्शकासारखं Guide करतो. जेव्हा आपण अनेक विचार साठवत जातो तेव्हा त्यांचा परिणाम हा आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. म्हणून मानवी मनाचा आणि विचारांचा अभ्यास करताना काही वैज्ञानिक लोकांनी असं एक तंत्र विकसित केलं ज्यामुळे त्यांना अत्यंत गूढ असलेल्या मानवी मनाचा एक अंदाज बांधता येणे शक्य झालं, त्याला Mind Reading Technique असं म्हणतात.


          आधी सांगितल्या प्रमाणे ही जादू वगैरे नसून एक शास्त्र शुद्ध अशी पद्धत आहे. ज्याद्वारे आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय किंवा तो कसा आहे याबाबत एक अंदाज बंधू शकतो. पण हे ही एखाद्या जादू पेक्षा कमी नाहीच!


          तुम्ही Sherlock Holmes बद्दल ऐकलं / वाचलं असेल तर तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की Mind Reading खरंच करता येऊ शकत का? Sherlock हा एक Detective असतो जो आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करून अनेक अशा Cases सोडवतो ज्या असामान्य वाटतात. जेव्हा त्याच्याबद्दल आपण जाणून घ्यायला लागतो तेव्हा कळतं की तो अचूकरित्या माणसं वाचतो.


Mind Reading : अंतर्मनाचा वेध घेणारी जादू || Psychology
Mind Reading : अंतर्मनाचा वेध घेणारी जादू || Psychology


          बरं ते जाऊद्या, X Men चित्रपट बघितला असेल तर त्यातलं एक पात्र आहे जे लोकांचा Mind Read ही करू शकतं आणि Control ही करू शकतं...

          थोडं चमत्कारिक वाटतं ना ! पण विज्ञानाच्या साह्याने आज हे शक्य झालंय Telepathy, Mind Reading, बॉडी Language अशा अनेक Techniques आहेत ज्यांचा वापर करून व्यक्ती चा Mind आणि त्यांचे Thoughts आपण जाणून घेऊ शकतो..


यावरील काही वैज्ञानिक पैलू पुढीलप्रमाणे..


◾ Mind Reading : वैज्ञानिक पैलू


          याबाबत बऱ्यापैकी संशोधन सुरू आहे. आज जगात काही असेही वैज्ञानिक आहेत, ज्यांनी Mind Reader Devices तयार केलेले आहेत त्यात प्रामुख्याने Caltech चा उल्लेख करावा लागेल.

1 .      California Institute of Technology च्या संशोधकांनी असं एक Device तयार केलंय जे आपल्या Mind मधल्या Activities चं चित्रीकरण करून ते photo च्या स्वरूपात दाखवतं. सध्या जरी ते basic level वर असलं तरी भविष्यात त्यात बरेच संशोधन होणे अपेक्षित आहे.

2 .     थोडं Advanced Level वर जेव्हा संशोधन होतं तेव्हा आपल्याला अनेक असे Outcomes त्यातून मिळतात. असंच एक संशोधन Japan University चे Professor युकी यांनी केलंय. त्यांनी असं एक Device तयार केलंय जे आपले स्वप्न Record करू शकते. यामुळे आपल्या सुप्त मनात चालणाऱ्या सर्व गोष्टी आता चित्रांच्या स्वरूपात आपल्या समोर येत आहेत.

3 .     Machine Learning च्या साह्याने आज आपल्या Mind च Reading करून बऱ्यापैकी आपल्या सुप्त मनातील रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात यात आणखी सुधारणा होऊन संपूर्ण मानवी मनाच्या रहस्यांचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे. पण हे कितपत योग्य आहे हा एक मोठा प्रश्न च आहे.


◾ अध्यात्म काय म्हणतं ?


          आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यातून आपण Mind Reading होऊ शकतं असा निष्कर्ष आपण लावू शकतो. जसं की रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या..


          असं म्हणतात कि रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांसोबत एक ही शब्द बोलले नाहीत, पण त्यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून जे काय त्यांचं ध्येय होतं ते मिळवण्यात मदत केली. ने बोलताही ते एकमेकांशी संवाद साधू शकत होते, या संकल्पनेला Telepathy असं नाव आहे. हा देखील Mind Reading चाच एक भाग आहे.


          आजकाल काही पद्धती देखील आहेत ज्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यासाठी उपयोगी ठरतात आणि त्या पद्धतींचा अवलंब करणारे लोकं जे असतात ते Psychic म्हणून ओळखले जातात, पण ते कितपत खरं आहे आणि त्यांचे निष्कर्ष किती खरे ठरतात हा विचार करण्याचा एक भाग आहे.


◾ अज्ञाचक्र / Third eye/ Sixth sense


          अध्यात्मात आज्ञाचक्राची एक Concept आहे. बऱ्याच ठिकाणी या संल्पनेबाबत लोकांनी लिहून ठेवलंय. तुम्ही आमचं Sixth Sense वरच Article वाचलं असेल तर तुम्हाला याबद्दल थोडी तरी कल्पना असेलच. तर असं म्हणतात की ज्यांचा Sixth Sense जागृत असतो त्यांना दुसऱ्याच्या मनातलं कळायला लागतं. आता तुम्हाला जर हे काही अंधश्रद्धा असल्याचं वाटत असेल तर एकदा तरी याबद्दल थोडं वाचून बघा आणि जमत असल्यास प्रयत्न करून बघा. हा जरा गुढतेकडे नेणारा विषय आहे.
◾ भविष्याचा वेध


          आज Psychological आणि Spiritual क्षेत्रांमध्ये अनेक संशोधन होत आहे. आज विज्ञान इतकं प्रगत झालंय की मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू काय? मन कसं काम करतं? आपला शक्तीस्रोत काय? अशा असंख्य अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला मिळणं सुरू झालंय आणि भविष्यात अशाही काही गोष्टींचा शोध लागेल जे आज आपल्याला अशक्य वाटताहेत.


          भविष्यात आपला Brain आणि त्याची राहस्यमयी रचना याबाबत अनेक रहस्यांचा उलगडा होणे सुरू होईल आणि त्याचबरोबर येणारी पिढी आणि त्यांचा Awareness हा बराच वेगळा असेल , ज्यामुळे एक Advance Civilization म्हणून मानव प्रगती करेल.


          अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आधी गूढ होत्या, त्या आज आपल्याला सामान्य वाटत आहेत आणि भविष्यातही अशा अनेक अनुत्तरित गोष्टींचे रहस्य आपल्याला समजायला लागेल. पण हे सर्व करणं कितपत योग्य राहील हा एक प्रश्नच आहे !

लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने