Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || Concept of soul || Psychology


          आपण भौतिक जगात राहतो, आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी असतात तेवढ्याच प्रमाण आहेत असं मानून आपण त्यांच्यानुसार आपले जीवन जगतो, पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या या भौतिक जगाव्यतिरिक्त आणखीही एक असं जग आहे जे चमत्कारिक गोष्टींनी ( concept of soul psychology ) परिपूर्ण आहे आणि जर तुम्हाला त्या जगात जाता आले तर..? चला जाणून घेऊया..


Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || Psychology
Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || Psychology

🔅   भाग १   🔅


          आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की हे शरीर नश्वर आहे, हे जग मिथ्या आहे, या गोष्टी permanent नाहीत, भौतिक सुखापेक्षा अध्यात्मिक सुख महत्वाचं असतं वगैरे वगैरे... मग अशावेळी प्रत्येक माणसाच्या डोक्यात हे प्रश्न येतात की जर हे शरीर नश्वरच आहे, तर मग माझं खरं स्वरूप काय ? मी कोण आहे ? मला कोणी तयार केलंय ? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर हे जग भौतिक असेल तर मग अध्यात्मिक जग ही असेल का ? असेल तर त्यात काय असेल असे अनेक कुतुहलपूर्ण विविध प्रश्न येतात आणि तेव्हा माणूस अध्यात्माकडे वळायला लागतो पण बऱ्याचदा असं होतं की माणसाला पाहिजे ते समाधान मिळत नाही कारण मानवी बुद्धीच्या पलीकडचं जग समजण्यासाठी माणसाला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख होणं आधी गरजेचं असतं आणि ती ओळख होण्यासाठी आधी माणसाला आपलं मन, आपलं शरीर या सर्वांच्या पलीकडे अशा जगात जावं लागतं जेथे त्याला त्याच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, पण असं जग असेलही तर ते जग आहे तरी कुठे आणि  असेल तर त्या जगात कसं जाता येईल? आणि जर जाता येत असेल तर त्याची काही पध्दत आहे का? तर या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे OBE ( Outer Body Experience ).*Concept of Soul*          तुमच्या पैकी काही लोकं आस्तिक असतील तर काही नास्तिक, पण जेव्हा तुम्ही OBE बद्दल समजून घ्यायला लागता तेव्हा तुम्हाला आत्म्याची संकल्पना ( concept of soul ) समजून घेणं महत्वाचं ठरतं. आपलं शरीर हे हाड मांस यांच्या पासून बनलेल्या अवयवांचा एक समूह आहे. आपल्या सभोवताली काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही अवयवांची मदत घ्यावी लागते त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्याच ज्ञानेंद्रियांच्या एकत्रीकरणामुळे एक शरीर तयार होतं, पण जोपर्यंत त्यात चेतना येत नाही तोपर्यंत त्याला फक्त body म्हणूनच ओळखल्या जाते, पण जेव्हा त्यात चेतना येते तेव्हा त्या शरीराला एक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते, या चेतनेलाच आपण आत्मा असं म्हणू शकतो. फरक फक्त संज्ञेचा आहे, विज्ञानवादी लोक त्याला Consciousness म्हणतील, अध्यात्मवादी त्याला आत्मा म्हणतील पण आपण त्याला तटस्थपणे भूमिका घेऊन सूक्ष्म शरीर (subtle body) म्हणूया.


Concept of Soul - एका अद्भुत दुनियेची ओळख

          OBE बद्दल माहिती घेताना सर्वात आधी आपलं सूक्ष्म शरीर काय असतं याबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलू पडतात. जसं की प्रत्येक गोष्टीची Positive / Negative side असते, तसंच आपलं एक भौतिक शरीर आणि एक सूक्ष्म शरीर असतं.आपलं भौतिक शरीर आपल्याला नेहमीच माहिती मिळवण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आपण उपयोगात आणतो आणि सूक्ष्म शरीर जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत करावी लागते.


          सूक्ष्म शरीराला समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला अंतर्मुख होऊन अवलोकन करावं लागतं. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा लक्षात येतं की हे शरीर आणि आपण वेगवेगळे आहोत. आपलं शरीर हे pleasure seeking attitude असणारं असतं आणि सूक्ष्म शरीर हे Pleasure Denial Attitude असणारं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या दारुड्या व्यक्तीला माहीत असतं की दारू घेणं वाईट आहे पण तरी तो घेतोच, याचं कारण की शरीर त्या मिळणाऱ्या नक्षेतून आनंद घेत असतं आणि सूक्ष्म शरीर आपल्याला त्यापासून होणाऱ्या नुकसानापासून सावध करत असतं, कारण त्याचं Pleasure Denial Attitude असतं, त्यालाच Spirituality मध्ये Intuition असं म्हणतात, पण त्यावर पुन्हा कधीतरी बोलूया..


सूक्ष्म शरीराचा प्रवास हा अतिशय अद्भुत असा अनुभव तुम्हाला देऊन जातो.तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण पूर्णतः बदलून जातो तुम्ही आधी जसे असाल तसे एकदा हा अनुभव घेतल्यावर राहत नाही.


         सांगण्याचं तात्पर्य हे की, तुम्हाला तुमचं सूक्ष्म शरीर तुमच्या भौतिक शरीरापासून विलग करता आलं की तेव्हा तुम्ही तुमचा OBE चा प्रवास सुरु केला असं समजावं. आता इतकं सगळं वाचल्यावर तुम्हाला वाटू शकते की हे जर एवढं Amazing आहे तर मग हे करावं तरी कसं तर त्याच्या काही Techniques आहेत त्यांची माहिती पुढील भागात पाहूया..


भाग २ वाचण्यासाठी इथे Click करा. 


लेखन✍ Tushar Gopnarayan   
            ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
              या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने