गोरक्षा दलाच्या जिल्हा प्रमुखाच्या हत्येचा VIDEO वायरल || Marathi news


          गोरक्ष दलाचे जिल्हाप्रमुख रवी विश्वकर्मा ( Ravi Vishwakarma )भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रवी विश्वकर्मा यांच्या हत्येचा थरारक व्हिडीओ हि समोर आला आहे. ज्यामध्ये ७ ते ८ तरुण त्यांच्या कारवर हल्ला करून तोडफोड करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबारही केला. गोळीबारात गोरक्ष दलाचे जिल्हाप्रमुख रवी विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळत आहेत .
गोरक्षा दलाच्या जिल्हा प्रमुखाच्या हत्येचा VIDEO वायरल || Marathi news
गोरक्षा दलाच्या जिल्हा प्रमुखाच्या हत्येचा VIDEO वायरल || Marathi news

          रवी विश्वकर्मा शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या मित्रांसह जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा मार्ग रोखला. दगड - काठ्यांनी गाडीवर हल्ला चढवून कारच्या काचा फोडल्या व त्यानंतर रवी विश्वकर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि निघून गेले. विश्व हिंदू परिषदेनं असा आरोप  केला आहे की विश्वकर्मा यांना मारण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आलं. 


          मध्य प्रदेशातील होशंगाबाद इथे हि धक्कादायक घटना घडली आहे. रवी विश्वकर्मा होशंगाबादहून पिपरिया इथे जाण्यासाठी त्यांच्या मित्रांसमवेत निघाले होते त्यांची वाट अडवून हल्लेखोरांनी कारसह त्यांच्यावर हल्ला चढवला दरम्यान गोळीबार करण्यात आला. सतीश अंधवान जे पिपरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत यांच्या माहितीनुसार रवी विश्वकर्मा यांना गोळ्या लागल्या आहेत. कार यामध्ये असणारे त्यांचे दोन सोबती मित्र हि जखमी आहेत . या केस प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून  काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे.


वायरल झालेला विडिओ :

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने