Tumbaad Movie || Movie Review


          मित्र आणि मैत्रिणीनो या लेखात आपण पाहणार आहोत Tumbaad movie review खरतर Tumbaad हे एक गावाचं नाव आहे पण सादर केलेली कथा हि काल्पनिक आहे . Tumbaad movie बाबत असं बोललं जात कि या चित्रपटाची कथा हि नायकाच्या आजीने त्याला सांगितली होती. हा चित्रपट खूपच अनोखा आहे. tumbaad full movie तुम्हाला खूप साऱ्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

Tumbaad Movie || Movie Review ( सौर्स Quora )
Tumbaad Movie || Movie Review ( सौर्स Quora )

          तुंबाड हा एक अप्रतिम सिनेमा आहे . निर्मात्याची विचार करण्याची क्षमता आणि सोबतच VFX आणि Animation ची जोड या फिल्म ला सर्वोच्च स्थानावर पोहोचवते . IMDB वर या सिनेमाला ८.३ चे रेटिंग मिळाले असून हा सिनेमा हॉरर व ड्रॅमा प्रकारात मोडतो. हा सिनेमा अप्रतिम असला तरी सुरुवातीच्या म्हणजेच ज्यावेळी सीनेमा घरात (Release) केला तेव्हा तो फारसा गाजला नाही. असे खूप सारे सिनेमे आहेत जे अप्रतिम असून सुद्धा त्यांना नापसंती मिळाली  आणि त्या मागचे कारण आपणच आहोत आपल्याला फक्त प्रेमावरचे सिनेमे पाहायला आवडतात. असो तुंबाड हा सिनेमा काही काळानंतर प्रकाश झोतात आला.


          खरतर या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा मास्टर पीस आहे म्हणावं लागेल कारण यामध्ये जे VFX आणि Animation केलं गेलं आहे ते ह्या चित्रपटाला अगदी वास्तविकता बहाल करतात. या मधील कथा जणू खरीच वाटू लागते. तुंबाड हे चित्रपटातील नायकाचे गाव आहे , या गावावर होणारी पाऊसाची अतिवृष्टी हा देवीदेवतांनी दिलेला श्राप आहे. नायक जेव्हा लहान असतो तेव्हा त्याला वाटत असत कि वाड्यात मोठा खजिना दडलाय म्हणूनच तो त्याचा आज्जीला सारखे खजिन्याबद्दल विचारत असतो. या कथेतील नायकाच्या भावाचा खडकावर पडून मृत्यू होतो व त्याची आई तेव्हा तुंबाड सोडून जायचा निर्णय घेते तरी नायकाचे मन हे वाड्यातील खजिन्यावरच असते . नायक त्याच्या आईला परत जाऊन खजिना लुटण्याची विनंती करतो पण त्याची आई त्याला रोखते व या तुंबाड गावात परत पाऊल न ठेवण्याचं वचन घेते. इथून पुढेच या चित्रपटाची खरी सुरुवात होते.

Tumbaad Movie || Movie Review
Tumbaad Movie || Movie Review ( सौर्स Quora )

          या चित्रपटातील नायक कसा घडत जातो व कोणत्या चुकांमुळे त्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागते हे प्रकट करताना आणि एक एक रहस्य खुलत जाते ते पाहतानाच आपल्या हृदयाचे ठोके वाढतात .लहानाचा मोठे झाल्यावर कर्जबाजारी असलेला नायक खजिन्याचे रहस्य माहित झाल्याने खूप श्रीमंत होतो. आता नायकाला त्याच्या मुलाला खजिन्याचे रहस्य सांगायचे असते त्यावर नायक आपल्या मुलाला खजिना मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत तयारी करवून घेतो. ओव्हर ऑल हि कथा मला फोडायची नाहीये . हा चित्रपट पाहताना येणारा जो काही अनुभव आहे तो नगण्य आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे तसेच या चित्रपटातील नायकाने केलेल्या कामाला कशाचीच तोड नाही.

Tumbaad Movie || Movie Review
Tumbaad Movie || Movie Review ( सौर्स Quora )

          हा सिनेमा सस्पेन्स आणि थ्रिलर वाटतो . सिनेमा पाहताना थोड्या थोड्या वेळाने पुढे नक्की काय होणार याची उत्सुकता मनाला लागून राहते. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही त्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा . तसेच इथे मला सांगावेसे वाटते कि असे सिनेमे पहा ज्यातून तुम्हाला काही तरी शिकायला मिळेल. आता तुम्ही मला विचाराल कि या सिनेमातून काय शिकायला मिळालं - या सिनेमातून '' अति तेथे माती " हा संदेश मिळतो. खरच हा एक सुंदर सिनेमा आहे .


Rating By Shubham९/१०*


लेखन ~ शुभम सुतार . 



          मित्र आणि मैत्रिणींनो आपण Tumbaad movie review पाहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर  तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने