Lucy Movie || Movie review 


          तुमचा मेंदू जर १०० टक्के काम करायला लागला तर तुम्ही काय कराल ? पडलात ना विचारात . तर मग हा चित्रपट तुम्ही नक्की पहायला हवा.  जगात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही. आपले शरीर हि तसेच आहे त्याच्याबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे. मानवी मेंदू म्हणाल तर एक संगणकाचा मदरबोर्ड असतो तसेच आहे. Lucy movie हा एक तर्क आणि संकल्पना असलेला चित्रपट आहे. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे या चित्रपटातून मिळतील. या लेखात आपण Lucy movie review पाहणार आहोत .

Lucy Movie || Movie review
Lucy Movie || Movie review  (source -quora )

          मी पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट हा २०१४ साली रिलीज झालेला " LUCY " ( लूसी ). भविष्याशी असणारी जोड या चित्रपटाला इतर चित्रपटांपासून वेगळे ठेवते . IMDB वर या चित्रपटाला ६.४ चे रेटिंग आहे. गूगल च्या अहवालनुसार हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या पैकी ९० टक्के लोकांना हा चित्रपट आवडला तर त्यांनी या चित्रपटाला ५ पैकी ४.५ चे रेटिंग दिले आहे. या चित्रपटाचे बजेट ४ करोड USD असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ४६.३४ करोड USD कमावले. चित्रपटात मुख्य नायिका स्कार्लेट जॉन्सन असून डायरेक्टर लूक बेसन आहेत . हा चित्रपट ऍक्शन आणि थ्रिलर प्रकारात मोडतो.


          चित्रपटात दाखवण्यात आले आहे कि साधारण मनुष्य हा त्याचा मेंदूचा १० टक्केच वापर करतो जर तुमचा मेंदू १०० टक्के वापरला गेला तर काय काय घडू शकत. खरच हा चित्रपट पाहताना पुढे काय होणार आहे याची मनाला उत्सुकता लागते तसेच आपल्या मनात कुतूहल निर्माण होते कि खरच असं घडू शकत का ? हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतील. चित्रपटातील नायिका हि त्याच्या मित्राची छोटीशी मदत करायला जाते आणि मादक पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या हाती लागते. ते लोक तिच्या शरीरात ते मादक पदार्थ लपवून तस्करी करताना आढळतात. मादक पदार्थ तस्करी करणारे इतके क्रूर असतात कि नायिकेला मारहाण करतात.  झटापटीत ते मादक पदार्थाचे पॅकेट नायिकेच्या शरीरात फुटते व तेथून या चित्रपटाची खरी सुरुवात होते. चित्रपट पाहताना आपण आश्चर्यचकित होऊन जातो. एकूणच हा चित्रपट १ तास ३० मिनिटांचा आहे .


          मादक पदार्थांमुळे नायिकेच्या शरीरात जे बदल घडतात ते अगदी उत्कृष्टरित्या मांडले आहे. जेव्हा जीवसृष्टीची उत्पत्ती झाली , प्राणी जीव त्यांच्या मेंदूचे २ ते ३ टक्केच वापर करत होते पण मनुष्य असा प्राणी आहे जो मेंदूचा १०% वापर करतो. चित्रपटात सांगितल्या प्रमाणे डॉल्फिन असा एकमात्र प्राणी आहे जो त्याचा मेंदूचा २० % वापर करतो आणि त्याने आपल्या शरीरात रडार सिस्टिम तयार केली. येथेच प्रचिती येते कि आपण मेंदूचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर काय काय घडू शकते नेमके हेच या चित्रपटात दाखवले गेले आहे. नायिका तिच्या मेंदूचा वापर २०% , ३०-४० % , ६०% , ८०% आणि शेवटी १०० % करते तेव्हा तिच्या सोबत ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचे नवलच वाटते.

Lucy Movie || Movie review
Lucy Movie || Movie review  ( source - quora )

          चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर असे प्रश्न पडतात कि देव अस्तित्वात असेल का ? देव हा मनुष्य असेल ज्याने त्याचा मेंदूचा १००% वापर केलेला असावा . असे अनेक सारे प्रश्न निर्माण होतात. ह्या चित्रपटाची कथा अनोखी आहे एका वेगळ्या विषयावर तयार केलेला हा चित्रपट पाहिल्यावर उगाच आपण वेळ खर्ची घालवला असे अजिबात वाटत नाही. विज्ञानाशी असलेली जोड या चित्रपटाला वरच्या स्थानावर पोहोचवते. मानवी शरीरात खूप सारे रहस्य दडलेले आहे ज्याची उत्तरे अजूनही मानवाजवळ नाही . उदाहरणार्थ जगातील सर्व खंडांची माहिती असलेला गूगल बॉय ,मानवी कॅल्क्युलेटर संबोधल्या गेलेल्या शकुंतला देवी.   


          लुसी या चित्रपटात मांडण्यात आलेली संकल्पना खूपच छान आहे. तुम्हाला पडलेल्या खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे या चित्रपटातून मिळतील असं मला वाटत. जसे कि शाहरुख खानने अभिनय केलेला चित्रपट चकदे इंडिया मध्ये दाखवले आहे आपण आपल्या मनातून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत संदेश पाठवू शकतो . या चित्रपटातून जी कल्पना मांडलेली आहे ती कितपत खरी असेल हे १००% मेंदूचा वापर करणाराच सांगू शकेल.

ओव्हरऑल चित्रपट सर्वानी पाहायला हवा या चित्रपटातून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळेल.


Rating By Shubham -  8/१०*


लेखन ~ शुभम सुतार          मित्र आणि मैत्रिणींनो आपण  Lucy movie review पाहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर  तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने