जीवनतंत्र - " बल बुद्धी " ।। वैचारिक ।। खासमराठी 


 जीवनतंत्र - " बल बुद्धी " ।। वैचारिक ।। खासमराठी 

#जीवनतंत्र - 2

              २. " बल बुद्धी "


          पहिल्या भागात सांगितल्या प्रमाणे जर तुम्हाला स्वतःची योग्य ओळख पटली असेल तरच पुढे जाण्यात अर्थ असेल.... कारण स्वतःची योग्य ओळख पटल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मर्यादा कोणत्या आहेत ते समजणार नाही !!          जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुम्ही अमर्याद आहात.... फक्त आपल्याला भेटलेली वेळ मर्यादित आहे तेव्हा तुमच्या दृष्टीकोनात एक आमूलाग्र बदल घडून येईल.... जो फक्त तुम्हाला स्वतःलाच जाणवेल !!


          आपल्या मनात आपणच अतिशय प्रेमाने वाढविलेले आजपर्यंत असलेल्या भ्रमाचे भोपळे फुटताना बघताना पण एक वेगळाच अनुभव असतो.... कोणाबद्दल असलेली तीव्र द्वेष भावना गळून पडताना कधी जाणवलं असेल तर तुम्ही हे समजू शकाल !!


          एखादा लहानपणा पासून कट्टर नास्तिक, सोबतच हिंदू विरोधी भावना मनात भरलेला व्यक्ती, जेव्हा एखाद्या मंदिरात जाऊन देवासमोर हात जोडून अगदी मनाभावातून उभा राहताना कसा वाटेल ?


          जीवन मृत्यू यामधलं अंतर,  आपल्यातील संपूर्ण क्षमतांची जाणीव झालेला व्यक्ती जेव्हा आतून बदलतो तेव्हा अगदी बाहेरून देखील त्या आमूलाग्र बदल झालेल्या नास्तिक व्यक्ती सारखाच भासेल !


          आता आपल्याला शाळेत तर खूप वेगळं काहीतरी शिकवलं जातं... आणि जितपत मला समजत आहे शाळेपेक्षा हल्ली मुलं कोचिंग क्लासेस मध्येच शिकत आहेत..


          बाकी विषय अभ्यासक्रमाचा घेतला तर मला तरी व्यावहारिक ज्ञानापासून शाळेचा अभ्यासक्रम कोसो दूर भासतो ... मोठमोठ्या लोकांना कामगारांची गरज भागवण्यासाठी आज शाळा कॉलेज दिवस रात्र काम करत आहेत हे तेव्हाच समजेल....


अधिक स्पष्टीकरणासाठी  एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो....


          आज शेतातमध्ये कोणताच शेतकरी फवारणी औषधांशिवाय कोणतं तरी पीक घेतो का ?


          आज बाजारपेठेचा विचार आणि अभ्यास केला तर कित्येक पट रसायनांची मागणी व वापर वाढला आहे हे समजेल !!

          मग जुन्या काळात शेतीत काही उत्पन्नच होत नसेल का? की मग जुन्या काळात पण असेच सगळे रसायनच वापरायचे  ??


          हल्ली प्रत्येक शेतकरी मग तो मी असो की कोणीही, गरज असो किंवा नसो, नैसर्गिकरित्या असलेली शेती करीत नाहीच..... कारण ' अज्ञान ' अथवा अतिज्ञान अथवा फक्त ' फायदा ' अथवा मग मी जे सांगत आहे तसा इतरांच्या मार्केटिंगचा आपल्यावर झालेला प्रभाव !


          आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच प्रत्येक क्षेत्रात व्हायला हवाच... मात्र त्याची गरज आणि योग्यता तपासल्या शिवाय नको !

          ट्रॅक्टर असून पण आपण बैलांनी नांगरणी करावी असं नव्हे पण आपल्याला जे शिकवलं जातं आहे.....आपल्यावर जे लादलं जात आहे निदान ते खरच योग्य आहे का ? कितपत गरजेचं आहे ? आणि खरच गरजेचं तरी आहे का हे एकदा तरी आपण स्वतः तपासून बघायला हवं....


          रासायनिक खत औषधांच्या शेतातील वापरासारखच कुठेतरी शाळेत कॉलेज मध्ये फक्त 'धंद्याच्या भाग म्हणून शिक्षण शिकवणे आणि शिक्षण घेणं पण सुरू आहे !!'


          हे सगळं सांगण्याची गरज आहे कारण जेव्हा आपला वापर होत आहे आणि अतिशय अयोग्य गोष्टी साठी होत आहे जे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपण स्वतःला यातून बाहेर काढण्याचा ...बदलायचा ....आपल्यातील क्षमतांचा आपल्या मर्जीने स्वतःसाठी  वापर करायचा विचार तरी करू !!


  आणि हा बदल स्वतःत जर कोणी करायचं  ठरवत असेल तर असं करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात....

१. बल


२. बुद्धी


ते पुढे सविस्तर पाहू  !!  :)


          मित्रानो हि पोस्ट आवडली असल्यास तुम्ही ती तुमच्या प्रियजणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 


~ लेखक : S.J.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने