ती कोण असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे..... !  | वैचारिक || खासमराठी   

 

ती कोण असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे..... ! | वैचारिक || खासमराठी
ती कोण असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे..... ! | वैचारिक || खासमराठी


          ती कोण असते ? या घडीला पडलेला प्रश्न आणि त्याला कारण हि तसेच आहे ... तीच ती असते लहान पणापासून आपल्याला सांभाळते , मोठं करते , हाताला चटके खाऊन आपल्या शिक्षणाचे धागे जोडते , स्वतः मात्र फाटकी चादर घेऊन उपाशी झोपेल पण आपल्या पिल्लाना भरपेठ जेवण कसे मिळेल याचीच  कायम  काळजी करेल. आपल्या शिक्षणाचे धागे जोडताना आपल्या हातापायांची काडी करून घेईल , " बाळ तुला आणखी कशाची कमी नाही ना ?" आवर्जून विचारेल . किती त्या असह्य यातना झेलणारी तीच ती स्त्रीच असते. स्त्री शाप कि वरदान आता या घडीला म्हणावेसे वाटते. वंशाचा दिवा देणारी ती , त्याला मोठं करते . पण तोच वंशाचा दिवा दुसऱ्या घरातील ती ला संपवून टाकतो , म्हणूनच ती च्यातील स्त्रीत्वाला जाणून घ्यायची गरज आहे. 


          अख्या महाराष्ट्राचे  दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  चरित्रात देखील याचा संदर्भ पाहावयास मिळतो , महाराजांचे विचार सांगतात कि पर स्त्री माते समान असते. असे भरपूर उदाहरणे आपल्याला माहित आहेत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. खरच या स्त्री मध्ये किती शक्ती सामावलीय हे नगण्य आहे. विश्वाच्या उत्पत्ती मध्ये हि स्त्री चा जो भाग आहे तो नसताच तर आता तुम्ही आम्ही नसतोच कदाचित.  आणि बघाणा त्याच स्त्रीच्या नशिबी किती मोठ्या यातना...!   स्त्री हि कोणाची तरी आई, मुलगी, बहीण ,बायको, आज्जी असते . पुरुषाच्या जीवनात स्त्री ला खूप महत्व आहे. 


          स्त्री हि कोणच्या तरी पोटी मुलगी म्हणून जन्म घेते व घराला लक्ष्मी लाभते , स्त्री हि बहिणीच्या रूपाने आपल्या भावाला राखी बांधते, ती स्त्री पुरुषाचे अर्धे अंग बनून अर्धांगिनी होते.  देवाने स्त्री ची केलेली रचना अतुलनीय आहे. आजच्या समाजात एका स्त्री ची स्तिस्थी पूर्ण रूपाने तिच्या विचारांवर अवलंबून आहे.

   
          आजच्या २१ व्या शतकातील स्त्री सबल आहे तिने स्वतः मधील शक्ती ओळखली आहे , ती आपल्या हक्कांसाठी आवाजही उठवताना दिसते . या पिढीला तिने जाणलय त्या एकमेकींच्या शत्रू नसून सहकारी आहेत आणि असे असून सुद्धा समाजात बलात्काराच्या घटना घडताना दिसत आहेत ,यामध्ये तरुण वर्गातील मुलांच प्रमाण जास्त आहे ज्यांना अजून आयुष्य म्हणजे काय हे देखील माहित नसत. इथे असा विषय नाहीये कि तरुण वर्गातीलच मुले आहेत तर अगदी सुडाची भावना , गुन्हेगार जे असे कांड करतात . अशी मानसिकता येते तरी कुठून ? इतकी क्रूरता कि बलात्कार करून त्या चिमुकल्या जीवाला ठार मारण्यात येते, अशी हिम्मत तरी कशी होते यांची ? या मानवशिल समाजात राहण्याचा काहीच अधिकार नाहीये असल्या राक्षसांना . आता काहीजण ज्ञान सांगत फिरतील कि महिला वर्गाने असे वागले पाहिजे तसे राहिले पाहिजे , अशी कपडे घातली पाहिजेत असा स्वभाव असला पाहिजे , अरे पण  त्या स्त्रीला तुम्ही दोष देता त्यापेक्षा तुही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाना तिला हि तुमच्या सारखेच दोन हात दोन पाय आहेत .


ती कोण असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे..... ! | वैचारिक || खासमराठी
ती कोण असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे..... ! | वैचारिक || खासमराठी


          २७ नोव्हेंबर रोजी घडलेलं हैद्राबाद रेप केस  , निर्भया केस , उणाव केस  अशा किती तरी केसेस आहेत ज्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत . तसेच असेही प्रकार आहेत जे लोकांसमोर येतच नाहीत त्यांना आतल्या आत च दबाव टाकला जातो , अशा किती तरी केसेस आहेत ज्या कोर्टात सालोसाल लटकत ठेवलेल्या आहेत . खर तर याला जबाबदार कोण आहे ? तुम्ही आम्ही ? बलात्कारी ? न्यायव्यवस्था  कि पोलीस ? कि रेप होणारी पीडित महिला ? आपल्याला फक्त निषेध व्यक्त करता येतो , कँडल मार्च कडून सेल्फी काढता येते अरे जरा शरम बाळगा . जनता काय करते , जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा आवाज उठते असे प्रकार घडू नयेत याचा विचारच कोणी करताना दिसत नाही. ज्या गटारीतून असे वासनांध राक्षस बाहेर पडत आहेत त्यांना जनता ठार करू पाहतेय  आणि ते बरोबरच आहे म्हणा पण त्या गटाराला बंद करून किंवा उडवून टाकण्याचं काम कोणीच करत नाहीये. त्यात आपली न्यायव्यवस्था इतकं चांगलं काम करते की अशा केसेस १०-१२ वर्ष लटकत ठेवतात .

          अशा प्रवृत्तीच्या लोकांना थांबवायचं असेल तर त्यांना मुळापासून उखडले पाहिजे नाही कि महिला वर्गालाच दोष दिला पाहिजे. प्रत्येक घरातील पालकांनी आपल्या पाल्याला योग्य शिक्षण देऊन समृद्ध केले पाहिजे त्याला माणुसकीचे धडे दिले पाहिजेत. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून सांगितलं पाहिजेत . आपल्या माता भगिनींचे महत्व त्याला हि कळले पाहिजे , तो समाजातील सज्जन सुशिक्षित घटक बनला पाहिजे . महिला वर्गाने देखील स्व संरक्षणाचे महत्व जाणले पाहिजे.

             " चला एकजूट होऊया , नवा भारत घडवूया.....! "   
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने