नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक || व्यक्तिविशेष || खासमराठी


नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक || व्यक्तिविशेष || खासमराठी
नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक || व्यक्तिविशेष || खासमराठी


               अनेक लोकं जशी या जगात येतात तशीच मरून देखील जातात. त्यांना या जगात काहीच चुकीचे दिसत नाही दिसले तरी ते त्यात बदल करीत नाहीत. काय करायचं आहे आपल्याला चालल आहे न कसे का असेना चालूद्या असच , इतकाच विचार करून आलो तसे निघून ही जातात.

                 मात्र, काही लोकांना जे चुकीचे दिसतं ते कधीच सहन करत नाहीत. कधी आपल्या शस्त्रांमधून कधी आपल्या लेखणीतून निर्माण होणाऱ्या पुस्तकांमधून. अशी मोजकी लोकं बदल सुचवत असतात. त्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत  लढत राहतात आणि शेवटी थोडी का असेना सर्वच समाजाला आपली दखल घ्यायला तो ती चूक मान्य करायला लावून तो बदल घडवायला भाग पाडतात.               

             खासमराठीच्या व्यक्तिविशेष विभागात आज अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून घेत आहोत. होय! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल .


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी झाला .

वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील  माहुली या गावी झाला. त्यांनी . इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला .


बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून मृत्यूपर्यंत संपादक होते .


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते .

           मात्र आपल्या कार्यामुळे ते अनेक धर्मांध व्यक्तींच्या निशाण्यावर होते. यामुळेच २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची निर्घणपणे हत्या करण्यात आली .

           महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला .


              अजूनही दाभोलकर हत्येचा तपास सुरूच आहे. हे विशेष ....! 



ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !



📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने