किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special


          ध्येय प्राप्तीचे वेडेपण आणि त्यातून साकार केलेलं स्वप्न असाच काहीसा प्रवास आहे सॅमसंग कंपनीचा ,अगदी किराणा मालाचे दुकान ते जग प्रसिद्ध कंपनी विश्वास बसत नाही ना... !!! या लेखात आपण पाहणार आहोत Samsung Company ने कसे शून्यातून जग निर्माण केले ? , कसा प्रवास केला ते पाहताना आपल्याला आश्चर्य वाटल्या खेरीज राहणार नाही , चला तर मग पाहुयात सॅमसंग कंपनीचे किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी होण्यामागचा इतिहास (History of Samsung Company).... !

किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special
किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special

          साऊथ कोरियाची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक यंत्र साहित्य आणि यंत्रे बनवणारी सॅमसंग कंपनीचे (Samsung company) निर्माण आणि शोध मार्च १ ,१९३८ रोजी झाला . त्यावेळी सॅमसंग एक किराणा मालाचे दुकान होते जे मॅग्गी , नुड्ड्ल्स , मासे ,साखर  लोकल मार्केट मध्ये विकत होती. महायुद्धाच्या परिस्थितीत सर्वच देशांची स्तिथी खूप बिकट अशी झाली होती. कोणालाच काही कल्पना नव्हती कि कधी कोणत्या देशावर आक्रमण होईल व कोण जगेल कोण मरेल..


          साऊथ कोरियाच्या लोकांना खायच्या, पिण्याच्या आणि राहायच्या गोष्टीचे हाल होऊ लागले , सर्वत्र हाहाकार माजला होता. आपल्या देशाची अशी परिस्तिथी पाहून एक २९ वर्षाचा तरुण खूप नाराज होता . त्याला आपल्या देशासाठी काही तरी करून दाखवायचे होते. म्हणून त्यांनी आपल्या कंपनीद्वारे लोकांना मदत करण्याचे ठरवले , आणि त्याची पूर्ती हि केली त्यांनी देशातील लोकांना खाण्याच्या , पिण्याच्या आणि राहायच्या गोष्टीचे व्यवस्थापन केले. ली युंग चूल सांगतात कि " मला माझ्या देशातील गरिबी हटवायची आहे आणि हेच माझे स्वप्न आहे ... ! "  इथेच आपल्याला प्रचिती येते कि एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्या देशाविषयी किती देशभक्ती असू शकते.

किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special
किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special


         महायुद्धानंतर ली युंग चूल यांनी आपल्या कंपनीचा व्यवहार वाढवण्याचे ठरवले आणि त्यांनी Woolen (लोकर) कंपनीची स्थापना केली आणि सोबतच कपड्यांच्या कारखान्याचा विस्तार केला आणि इथूनच त्यांच्या सफल कार्याचा प्रवास सुरु होतो. अशीच त्यांची प्रगती होत गेली. रिटेल खाद्य प्रसंस्करण , विमा , सुरक्षा प्रणाली , कच्चा माल प्रक्रिया  या क्षेत्रांमध्ये आपला छाप उमटवण्याचा प्रयत्न व खूप मेहनत करू लागले.

किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special
किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special

         महायुध्यात लोकांना केलेल्या मदतीचा फायदा त्यांना होऊ लागला आणि हेच त्यांच्या प्रगती मागचे कारण होते , पुढे सॅमसंग कंपनी प्रत्येक क्षेत्रात आपले नवनवीन उत्पादन घेऊन येत राहिली लोकांच्या विश्वासामुळे त्यांचे प्रत्येक उत्पादनाचे महाकाय विक्री व्हायची . अशा तर्हेने सॅमसंग कंपनीने कधी मागे वळून न पाहायचे ठरवले आणि त्यांची प्रगती कधीच थांबली नाही.  १९६९ साली सॅमसंग कंपनीने इलेकट्रोनिक क्षेत्रात आपले पाउल टाकले आणि पहिला ब्लॅक अँड व्हाईट  टेलेव्हीजन  (TV)  बाजारात दाखल केला , जवळजवळ एका वर्षानंतर कंपनीचा व्यापार साऊथ कोरिया मध्ये वेगाने विस्तारू लागला.

किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special
किराणा मालाचे दुकान ते जगप्रसिद्ध कंपनी || Marathi special

         सन १९८५ नंतर सॅमसंग कंपनीने इलेकट्रोनिक्स , सेमी कंडक्टर्स , टेलीकॉम्म्युनिकेशन , नॅनोटेकनॉलॉजि , ऐरोस्पेस , केमिकल क्षेत्रांमध्ये काम करायला सुरुवात केली . १९८६ साल च्या सुरुवातीचा काळ हा सॅमसंग कंपनी करता फायदे मंद ठरला नाही . त्यांना अपशय पाहावे लागले. याच काळात त्यांनी पहिला मोबाइल फोन बनवला SH-१०० असे त्याचे नाव होते पण हा मोबाइल बाजारात फार काळ पर्यंत टिकला नाही . १९८७ साली ली यांचे निधन झाले आणि त्याच बरोबर सॅमसंग कंपनी चार व्यवसायी विभागात विभागली गेली ज्या मध्ये  ८० पेक्षा जास्त लहान मोठ्या कंपन्या काम करतात. हे खरच नवे रोजगार निर्मितीचे  व  तरुणांसाठी संधीचे पर्याय उपलब्ध होत राहिले.


          १९९० या साली सॅमसंग कॉन्स्ट्रक्षन ब्रांच ने पेट्रोनास टॉवर निर्मिती केली जो की मलेशिया मध्ये स्थित आहे  तसेच  जगातील सर्वात उंच टॉवर पैकी एक बुर्ज खलिफा , सौदी अरेबिया मध्ये स्तिथ आहे त्याचे निर्माण केले.


         सन २००० साली सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सयी सिरीज चे मोबाइलला फोन बाजारात आणले त्यानंतर तर कंपनीने आकाशाला गवसणी घातली. २००६ मध्ये सॅमसंग कंपनीने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजवली तसेच २०१० साला नंतर संगणकीय क्षेत्र आणि स्मार्ट फोन , टॅबलेट फोन निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले.


सॅमसंग कंपनी विषयी काही रोचक तथ्य (Facts about Samsung Company):


१) सॅमसंग हा शब्द कोरियन भाषेतून (Korean Language) आला आहे. इंग्रजी भाषेत याचा अर्थ तीन तारे असा (Three Stars) आहे.


२) Samsung Company ने 1938 पासून 80 विविध प्रकारच्या व्यवसायात नशीब आजमावले आहेत.


३) सॅमसंग कंपनीने केवळ 40 लोकांच्या कर्मचाऱ्यांसह सुरुवात केली परंतु आता 3,75,000 लोक कार्यरत आहेत. त्याच  Apple Company मध्ये केवळ 80,300 कर्मचारी (Employees) आहेत.


४) 1993 पासून, सॅमसंग कंपनी जगातील सर्वात मोठी चिप (Memory Chip or RAM) बनविणार्‍या कंपन्यांपैकी एक आहे. बातमीनुसार Apple iPhone 7 ची चिप सॅमसंग कंपनीने बनविली आहे.


५) सॅमसंग कंपनीने प्रथम 1996 मध्ये सीडीएमए (CDMA), 1998 मध्ये डिजिटल टीव्ही (Digital Television), 1999 मध्ये वॅट फोन आणि 1999 मध्ये एमपी 3 फोन (MP३ Phone) लॉन्च केले.


६) आजच्या काळात, जगात विकला जाणारा प्रत्येक तिसरा फोन सॅमसंगचा आहे.


७) जगातील 70 टक्के स्मार्टफोन (Smart Phone) सॅमसंगने बनविलेल्या रॅमचा वापर करतात.


८) सॅमसंगने 2004-2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील (Electronics Market) लोकप्रिय ब्रँड सोनीला (SONY Company) मागे टाकले आणि जगावर वर्चस्व गाजवले.


९) दर मिनिटाला जगभरात 100 सॅमसंग टीव्ही (Samsung Television) विकले जातात.


१०) Apple iPad’s Retina Display प्रत्यक्षात सॅमसंग द्वारे बनविला गेला आहे.


११) आपल्याला हे मजेशीर वाटेल, परंतु सत्य हे आहे की सॅमसंग भाजीपाला (Vegetables), नूडल्स (Noodles) आणि मासे (Fish) देखील विकत असे.


१२) सॅमसंग ग्रुप आपल्या विनाअनुदान संस्था (Non-Profitable Organization) सॅमसंग मेडिकल सेंटरला (Samsung Medical Center) दरवर्षी $ 100 दशलक्ष देणगी देते.


          ज्या कंपनीचा उद्देश फक्त लोकांना खाण्या पिण्याचा व राहण्याच्या गोष्टी पुरविणे हा होता , जी कंपनी आपल्या देशाची गरिबी हटवण्यासाटी कार्य करता राहिली  तीच सॅमसंग कंपनी आज  यशाच्या शिखरावर स्तिथ आहे हे आपण सर्वच जाणतो. जवळ पास तिशी गाठणाऱ्या तरुणाने पाहिलेले स्वप्न निश्चितच आज खरे झाले असावे असे म्हणले पाहिजे.


~  लेखन  : शुभम सुतार .
          मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? आणि पुढचे आर्टिकल तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान असतो . हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते धन्यवाद... !! . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने