आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग  || वैचारिक || खासमराठी. 

आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग  || वैचारिक || खासमराठी
आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग  || वैचारिक || खासमराठी 



                एका सुंदर अशा दिवशी लातूर मधील दयानंद महाविद्यालयात डॉक्टर अभय बंग  यांच भाषण ऐकण्याचा सुवर्ण योग 2015 मध्ये आला होता, ते ऐकल्यानंतर संपूर्ण इंटरनेट पालथं घातलं तरी कुठेच ते भाषण न ऐकायला मिळालं न पाहायला ...... मग त्याच रात्री जितकं मनावर कोरलं गेलं तेच एका कागदावर उतरवलं मात्र नंतर चुकून एका दिवाळी अंकात ते वाचायला मिळालं ते भाषण इतकं अप्रतिम आहे की मी ते भाषण  ऐकलं त्या रात्री रात्रभर झोपू शकलो नव्हतो....... हा आनंद " या जीवनाचं काय करू " या प्रत्येकालाच पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शक्य तितकी मेहनत घेऊन तुमच्यासमोर सादर करीत आहे.........सर्वच मित्र मैत्रिणींबरोबर नक्की Share करालच ही अपेक्षा !



#या_जीवनाच_काय_करु_?



माझ्या युवा मित्रांनो ,

     तुमचा जन्म 1990 च्या आसपास झाला. त्याच वेळी GLOBALIZATION आलं. भारतात उदारीकरण झालं. तुमच्यासोबत सोबतच हे नवं परिवर्तन वाढलं. आज त्याचे अनेक चांगले परिणामही दिसत आहेत . पूर्वी महाराष्ट्रातल्या तरूणांना भाकरी आणि नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती . एकदा B.A. , B. COM , झालं की कुठे तरी शिक्षक होणं, बँकेत किँवा पोस्टात क्लार्क होणं आणि रिटायर झाल्यावर पुण्यात 2 खोल्यांचा फ्लँट घेणं, पेन्शन घेणं अन पर्वतीला चकरा मारता मारता एक दिवस मरुन जाणं महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाच हे स्वप्न होतं.

     आज तुम्हाला माधुकरी मागावी लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन , असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्या खिशात मोबाईल आहे, कानात हेडफोन आहे अन तुमच्या हातात लँपटाँप आहे. जगात कुठेही जाण्याचा तुमच्यात आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास तुम्हालाच नाही, तर 12000 Km पार करुन अमेरिकेपर्यंत तुमचा दरारा पसरला आहे. थाँमस फ्रीडमनने लिहिलं आहे , ''आज अमेरिकेतील आई वडिलांना आपल्या मुलांना सांगावं लागतं  . . . . . .अरे, मुलांनो अभ्यास करा, नाही तर भारतातली मुलं तुमचे जॉब्स घेऊन जातील. "

आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग  || वैचारिक || खासमराठी
आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग  || वैचारिक || खासमराठी 

जागतिक सुपरपॉवर तुम्हाला घाबरते, एवढा बदल गेल्या 20 वर्षात झाला आहे. ही महाराष्ट्रातली भारतातली नवी सुपरपॉवर कशी जगते आहे ?

     INDIAN EXPRESS च्या पहिल्याच पानावर त्रिवेँद्रमची एक ठळक बातमी आली होती. सुजित  कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा व त्याची आई या दोघांचा हसरा फोटो अन बातमीची हेडलाईन -

"Kept in Dark about his Father's Death , He Race to Win"

     त्रिवेँद्रममध्ये प्रांतपातळीच्या शर्यती आयोजित केल्या आहेत . सुजित हा धावपटू आहे. तो जिंकण्यासाठी तयारी करतोय त्याचे वडील हार्ट अटॅकने हाँस्पिटलमध्ये भरती केले गेले आहेत. शर्यतीदरम्यान मन विचलित होऊ नये म्हणून त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली नाही. तो रेसमध्ये धावला आणि त्याने रेस जिँकली. विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहिला आणि मला प्रश्न पडला- SUJIT कुट्टनचे वडील ICU मध्ये जेव्हा एकटे मरत असतील तेव्हा त्यांना काय वाटलं असेल ? सुजीतने कुठं असायला हवं होतं ? तो कशासाठी धावत होता ? ते पदक जिँकून त्याने काय मिळवलं . ?

आपण सगळेच सुजित कुट्टन आहोत. आपलं काही तरी मरतयं आणि आपण मात्र रेस धावतो आहोत.

 कशासाठी?


" राजू को कितने मिले ?"

      आपलं जीवन कसं झालं आहे ? मूल जन्माला येतं. दोन तीन वर्षाँच नाही झालं, तर चांगल्या केजीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरु होते. तिथे निवडप्रकिया आहे. लहान मूल पुरेसं हुशार आहे की नाही याची खात्री करायला मुलाची परीक्षा होते. चांगल्या रीतीने त्याने परीक्षा द्यावी , म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या 2 वर्षाँच्या मुलाला ट्युशन लावली. इथून स्पर्धा सुरु होते. चांगली शाळा, चांगले मार्क , चांगली नोकरी . . . .T.V. वर एक जाहिरात पाहिली.

मुलगा धावत घरी येतो. म्हणतो, '' आई, आई, आज परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले!"

ती म्हणते, "लेकिन राजू को कितने मिले ?"

त्या आईला मुलाच्या आनंदाचा मागमूसही नाही.
'या स्पर्धेत तू कितवा आहेस ?'  एवढाच तिचा प्रश्न . आज ही स्पर्धा आपल्या मागे कायमची लागली आहे.

     जी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते, तिला स्पर्धा असे म्हणतात. जी 'मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे' असं म्हणते , तिला स्पर्धा असे म्हणतात. आपल जन्मापासून मृत्यूपर्यँतच जगण स्पर्धामय झालंय. पुढे चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार व प्रमोशन मिळाल पाहिजे. चांगला पगार मिळाला की चांगल 2 मजली घर मिळालं पाहिजे. यश मिळाल की एक बायकोदेखील हवी. एक चांगली बायको किँवा चांगला नवरादेखील कमवावा लागतो. तेदेखील एक पझेशन. हे करता आलं की, एखादी फाँरेन टूर करावी वाटते. काँम्पिटिशन / कन्झमशन हेच जर सगळ जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ उरला?
अस झालं, तर जीवन एक सजा ठरेल.

पुढची 40 वर्ष तुमची आहेत.
आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की आजच हे जग मला मान्य नाही.

" जशा जगात मी जन्माला आलो,
तशा जगात मी मरणार नाही !"

हे जग मी बदलून जाईन.
माझं आयुष्य खूप अमूल्य आहे.

पैशांसाठी मी माझ आयुष्य विकणार नाही,
मी भोगला जाणार नाही.

मी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो.

मी माझ्या जीवनाला एक हेतू , एक प्रयोजन प्रदान करेन.
जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन .
जिथे गरज नाही तिथे गर्दी करुन मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही.

#जीवनाचं_प्रयोजन

     व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोगतज्ज्ञ होता. तो जर्मन होता, ज्यू होता. म्हणून तो जर्मनीच्या काँन्सन्ट्रेशन कँम्पमध्ये कैदी होता. तिथे भयंकर छळ चालायचा. सुटण्याची आशा नाही. त्या छळाला त्रासून दर दोन चार दिवसांनी एखादा कैदी आत्महत्या करायचा. त्याच्या लक्षात यायला लागलं की, आपल्या मनात आत्महत्येच विचार हळूहळू यायला लागलेत. तो शोधायला लागला की, हा विचार कसा थांबवू? इतर कैद्यांचे पण विचार कसे थांबवू ?

व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की - जगण्यासाठी एक अपूर्ण स्वप्न, करायचं जीवनकार्य शोधलं- फुलवलं की जगण्याला प्रयोजन प्राप्त होऊन आत्महत्येचा विचार दूर होतो.

त्याचं , " मँन्स सर्च फाँर मीनिँग " हे सुंदर पुस्तक आहे.
त्यात तो एक कळीच वाक्य लिहितो -

" THOSE WHO KNOW THE WHY OF LIVING HAVE NO PROBLEMS ABOUT THE  HOW OF LIVING. "

     मी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं , त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही. तो प्रश्न सोपा होऊन जातो. मला 2 कपडे हवेत की 4 हवेत ? मला घर 2खोल्यांच हवं की  4 ? हे सगळे प्रश्न गैरलागू होऊन जातात. बिनमहत्त्वाचे वाटतात.

~S.J.

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने