महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.

महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.
महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.

                 13 जून 2014 रोजी महाराष्ट्र राज्यात एका नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. सागरी डोंगरी आणि होय नागरी अंग असलेला महाराष्ट्रातील या 36 व्या जिल्ह्याबाबत तसे जाणून घेईल तितके कमीच आहे, कारण सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.

                या नवीन जिल्ह्यातील जव्हार , तलासरी आणि मोखाडा हे तीन तालुके 100 टक्के आदिवासी बहुल आहेत.

सर्वात नवीन जिल्हा -

महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.
महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.

                  पालघर या जिल्ह्याची निर्मिती 13 जून 2014 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. ठाणे या जिल्ह्यातून पालघर ची निर्मिती झाली. पालघर हा जिल्हा महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. तसेच पालघर जिल्हा परिषदेची संख्या धरून महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची संख्या आता 34  इतकी झाली आहे . पालघर हे जिल्याचे मुख्यालय आहे पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5344 चौरस किलोमीटर इतके आहे .
तर स्थान व विस्तार याचा विचार करता पालघरच्या उत्तरेस गुजरात मधील बलसा जिल्हा तसेच दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागतो. तर आग्नेय बाजूस ठाणे जिल्हा तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या सीमा लागतात तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे .

जिल्ह्यातील तालुके -

पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत.  ते कोणते ?

1) पालघर,
2) वाडा,
3) विक्रमगड,
4) जव्हार,
4) मोखाडा,
5) डहाणू,
6) तलासरी,
7) वसई
8) विरार हे एकूण आठ तालुके आहेत.

पालघर जिल्ह्यात एकच महानगरपालिका आहे ती म्हणजे वसई-विरार.

पालघर मध्ये एकूण 3 नगरपालिका आहेत त्या पुढीलप्रमाणे

1) डहाणू ,
2) पालघर,
3) जव्हार .

पालघर जिल्ह्यातील नद्या - या जिल्ह्यातील वैतरणा ही मुख्य नदी आहे.

 तर बारवी, भातसा ,पिंजल ,सूर्या दहेर्जा, तानसा तर दक्षिणेस उल्हास नदीचे खोरे आहे .

पालघर जिल्ह्यात दोन धरणे आहेत एक म्हणजे वांद्री धरण आणि दुसरे मनोरधरण.

           वांद्रे धरण वांद्री नदीवर आहे

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे -

महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.
महाराष्ट्रात असून पालघर बद्दल माहिती नाही ? मग नक्की या गोष्टी जाणून घ्या ! | भटकंती ||  खासमराठी.

                 पालघर मधील जव्हार हे पालघरचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते, तर सातपाटी येथे मच्छीमारी प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच पालघरमध्ये वसई किल्ला आहे जो 1739 मध्ये चिमाजीअप्पांनी  पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला होता, तसेच अर्नाळा किल्ला ,कळवा बीच, माहीम बीच ,वाघोबा धबधबा ,शितलादेवी मंदिर  ,विरार ची जीवदानी देवी ही पर्यटन स्थळे लोकप्रिय आहेत.

                 तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प हासुद्धा पालघर जिल्ह्यातच आहे.

             वसई येथे  चिंचोटी धबधबा आहे तर जव्हार येथे लेंडी नदी वर दाबोसा धबधबा आहे तर कसाऱ्याजवळ विहिगाव धबधबा आहे . असा आहे पालघर जिल्हा !

 ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वासोबत  'SHARE' करायला विसरू नका. !

     📌🚩  खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp  वर मिळवण्यासाठी आजच  📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे  संपूर्ण नाव पाठवून " JOIN ME " असा  WHATSAPP MESSAGE पाठवा. ! Post a Comment

थोडे नवीन जरा जुने